मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ६६ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६६ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘यमः’’ काष्‍ठलोष्‍ठादिभिर्गावः शस्त्रैर्वा निहता यदि। प्रायश्चि=तं कथं तत्र शस्त्रे शस्त्रे विधीयते।
काष्‍ठे सांतपनं कुर्यात्‍प्राजापत्‍यं तु लोष्‍ठके। तप्तकृच्छ्रं च पाषाणे शस्त्रे वाप्यतिकृच्छ्रकं। प्रायश्चित्ते ततश्र्चीर्णे कुर्याद्ब्रह्मणभोजनतं।
त्रिंशद्गा वृषभं चैकं दद्यात्तेभ्‍यश्र्च दक्षिणामिति।‘‘संवर्तः’’ एका चेद्बहुभिः काचिद्दैवाव्द्यापादिता यदि।
पादं पादं तु हत्त्यायाश्र्चरेयुस्‍ते पृथक्‌ पृथक्‌ इति। यादृक्‌विधगोहत्त्यायां यद्व्रतमुपदिष्‍टं तस्‍य पादमित्‍यर्थः।
‘‘आपस्‍तंबः’’ षाणाणैर्लकुटैर्वापिशस्त्रेणान्येन वा बलात्‌। विपातयंति ये गास्‍तु कृत्‍सनं कुर्युर्व्रतं हि ते।
तथैव बाहुजंघोरूपार्श्र्वग्रीवादिमोटनैरिति लकुटं दंडः। ‘‘स एव’’ अंगुष्‍ठमात्रस्‍थूलस्‍तु बाहुमात्रप्रमाणतः।
आर्द्रस्‍तु सपलाशश्र्च दंड इत्‍यभिधीयत इति पराशरोक्ताधिकप्रमाणोऽस्‍यापि स्‍थलविशेषे दोषहेतुत्‍वमस्‍त्‍येव। ‘‘पराशरः’’ दंडादूर्ध्वं यदन्येन प्रहराद्यदि घातयेत्‌। प्रायश्चित्तं तदा प्रोक्तं द्विगुणं गोवधे चरेदिति.

लाकूड, ढेंकूळ वगैरेंनी गाय मारली असतां प्रायश्चित्त काठीचें प्रमाण.

‘‘यम’’---जर लाकूड, ढेंकूळ इत्‍यादिकांनीं किंवा शस्त्रांनीं गाईंचा वध केला असतां, त्‍या ठिकाणीं शस्त्राशस्त्राचें ठिकाणीं प्रायश्चित्त करसें करावें? जर लाकडानें गाय मारली तर सांतपन प्रायश्चित्त करावे. ढेंकळानें मारली तर प्राजापत्‍य, दगडानें मारली तर तप्तकृच्छ्र व शस्त्रानें मारली असतां अतिकृच्छ्र प्रायश्चित्त करावे. याप्रमाणें प्रायश्चित्त केल्‍यानंतर ब्राम्‍हणभोजन करावें, आणि ब्राह्मणांस तीस गाई व एक बैल दक्षिणा द्यावी. ‘‘संवर्त’’---जर कदाचित्‌ दैवयोगानें एखादी गाय पुष्‍कळांनीं मिळून मारली तर ज्‍या गाईच्या हत्त्येंत जें व्रत सांगितलें असेल त्‍याच्या चतुर्थांशा इतकें प्रायश्चित्त प्रत्‍येकानें निरनिराळें करावे. ‘‘आपस्‍तंब’’---घोडें, काठ्या किंवा एखादें शस्त्र यांच्या योगानें जे बलात्‍कारानें गाईंस मारतील, त्‍यांनी संपूर्ण प्रायश्चित्त करावे. बाहु (पाय,) जंघा, गुडघे, पार्श्र्व (बरगड्या), मान इत्‍यादिकांच्या मोटनाच्या योगानें जर गाय मारण्यांत आली तर त्‍याचप्रमाणें प्रायश्चित्त करावें. ‘‘तोच’’ आंगठ्या एवढा जाड, एक हात लांब, पानांनीं युक्त असून ओला याला दंड असें म्‍हटलें आहे.’’ याप्रमाणें पराशरानें सांगितलेल्‍या पेक्षांही अधिक प्रमाणाच्या दंडास (काठीस) ही स्‍थल विशेषीं दोषाचें कारणत्‍व आहे. ‘‘पराशर’’---सांगितलेल्‍या दंडापेक्षां अधिक प्रमाणाच्या दुसर्‍या दंडानें जर प्रहार केला तर प्रायश्चित्त सांगितलें आहे. अशा प्रकारच्या दंडानें गाईचा वध केला असतां दुप्पट प्रायश्चित्त करावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP