मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ८६ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८६ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘वैधमरणमध्यवसाय त्‍यजतां तु पराशरः’’ जलाग्‍निपतने चैव प्रव्रज्‍यानशने तथा। अध्यवस्‍य निवृत्तानां प्रायश्चित्तं कथं भवेत्‌।
ब्राह्मणानां प्रसादेनं तीर्थानुसरणेन च। गवांचशतदानेन वर्णाः शुध्यंति तेत्रयः। ब्राह्मणस्‍य प्रवक्ष्यामि गत्‍वारण्यं चतुष्‍पथं।
सशिखं वपनं कृत्‍वा त्रिसंध्यमवगाहनं। गायत्र्यष्‍टसहस्रं तु जपेच्चैव दिने दिने। मुच्यते सर्वपापेभ्‍यो ब्राह्मणत्‍वं च गच्छति।
भिक्षार्थी प्रविशेद्ग्रामं गृहान्‌ सप्तवने वसन्‌। धौतभिक्षां समश्र्नीयादद्बार्धेन विशुध्यतीति

पाणी वगैरेंत विधीनें मरण्याची खुषी दाखवून तसें न केलें तर प्रायश्चित्त.

‘‘पाणी इत्‍यादिकांत विधीनें युक्त मरण्याचा उत्‍साह (खुषी) दाखवून तसें न करणारांस पराशर’’---पाणी, अग्‍नि व पर्वताचें शिखर यावरून उडी घेणें, संन्यास व उपास यांविषयी उद्युक्त होऊन निवृत्त झालेल्‍यांस प्रायश्चित्त कसें असावें? ते तीन वर्ण ब्राह्मणांच्या सेवेनें, तीर्थास जाण्यानें व शंभर गाईंचें दान केल्‍यानें शुद्ध होतात. ब्राह्मणास (प्रायश्चित्त) सांगतों---त्‍यानें जेथे चार रस्‍ते फुटत असतील अशा अरण्यांत जाऊन तेथें शेंडीसकट क्षौर करून दररोज तीन काळीं स्‍नान करावें आणि गायत्रीमंत्राचा एक हजार आठ जप करावा म्‍हणजे तो सर्व पापांपासून मुक्त होऊन ब्राह्मण्यास पावेल शिवाय त्‍यानें रानांत राहून भिक्षेच्या उद्देशानें गावांत जाऊन सात घरें भिक्षा मागून ती धुऊन खावी. याप्रमाणें सहा महिने केलें असतां तो शुद्ध होईल.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP