मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ८१ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८१ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘माधवीये कश्यपः’’ मृगमहिषवराहकुंजरगंडशशरभतरक्षुवानरसिंहव्याघ्रवृषवत्‍सशल्‍यकादीनामन्येषां च वधेऽहोरात्रोषितश्र्चीर्णांते घृतं दद्यात्‌। ‘‘व्यासः’’ सर्वांश्र्च प्राणिनः स्‍थूलन्मंडूकलकुलेष्‍वहिमिति इदमज्ञानतः सकृद्वधे।
ज्ञानतस्‍तु ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ मार्जारगोधानकुलमंडूकांश्र्च पतत्‍त्रिणः। हत्‍वा त्र्यहं पिबेत्‍क्षीरं कृच्छ्रं वा पादिकं चरेत्‌।
‘‘विष्‍णुः’’ गोधोलूकचाषकाकवधे त्रिरात्रमुपवसेत्‌। ‘‘व्यासः’’ सूकरोष्‍ट्रखरान्हत्‍वा त्र्यहमेद्व्रतं चरेत्‌।
‘‘यत्तु वसिष्‍ठः’’ श्र्वमार्जार मंडूकनकुलसर्पदहरमुषकान्‌ हत्‍वा कृच्छ्रं द्वादशरात्रं चरेत्‌ इति तदकामतोऽभ्‍यासविषयं दहरोऽल्‍पमूषकः।
‘‘यत्तु मनुः’’ मार्जारनकुलौ हत्‍वा चाषं मंडूकमेव च।
श्र्वगोधोलूककाकांश्र्च शूद्रहत्त्याव्रतं चरेत्‌ इति तत्‍समुदितवधविषय शूद्रहत्‍याव्रतं षाण्मासिकं।
‘‘यमः’’ पयः पिबेत्‍त्रिरात्रं वा योजने वाध्वनोव्रजेत्‌। उपस्‍पृशेत्‌ स्रवंत्‍या वा सूक्तं वाद्बैवतं जपेत्‌।
‘‘पराशरः’’ वृककाककपोतानां सारीतित्तिरघातकः। अंतर्जले उभे संध्ये प्राणायामेन शुद्धयति।
वृकःपक्षि विशेषः संध्ये इत्‍यत्‍यंतसंयोगे द्वितीया। अतो यावद्भिः प्राणायामैः संध्याद्वयं समाप्यते तावतः कुर्यात्‌।
प्राणायामेनेत्‍येकवचनमविवक्षितमिति माधवः इदमकामतः सकृद्वधे

हरण, रेडा, डुकर वगैरेंच्या वधाविषयीं प्रायश्चित्त.

‘‘माधवीयांत कश्यप’’---हरण, रेडा, डुकर, हत्ती, गेंडा, ससा, शरभ, तरस, वानर, सिंह, वाघ, बैल, वासरूं, साळई वगैरेंचा व दुसर्‍यांचा वध केला तर एक दिवस उपास करून शेवटी (दुसर्‍या दिवशी) तूप द्यावे ‘‘व्यास’’ ‘‘सर्व प्रकारचे मोठे प्राणी, बेडूक, ममुंगुस व सर्प यांस (मारलें असतां) असे सांगतात’’ तें अज्ञानानें एक वेळ वध केला असतां त्‍याविषयी जाणावे. ‘‘ज्ञानानें (वध केला तर) याज्ञवल्‍क्‍य’’---मांजर, घोरपड, मुंगुस, बेडूक, व पक्षी यांस मारलें असतां तीन दिवस पाणी प्यावें किंवा पादकृच्छ्र करावें. ‘‘विष्‍णु’’---घोरपड, घुबड, चाष, व कावळा यांचा वध केला तर तीन दिवस उपास करावा. ‘‘व्यास’’---डुकर, उंट व गाढव यांचा वध केला तर तीन दिवसपर्यंत हे व्रत करावे. ‘‘जें तर वसिष्‍ठ’’ ‘‘कुत्रें, मांजर, बेडूक, मुंगुस, साप, लहान उंदीर व मोठे उंदीर यांस मारलें तर बारा दिवसांचें कृच्छ्र (प्राजापत्‍य) करावें’’ असें म्‍हणतो, तें अज्ञानानें अभ्‍यासाविषयीं जाणावें. ‘‘जें तर मनु’’ मांजर, मुंगुस, चाष, बेडूक, कुत्रें, घोरपड, घुबड व कावळा यांस मारलें तर सहा महिन्यांचें शूद्रहत्त्येचें व्रत करावें.’’ असें म्‍हणतो तें समुदायाच्या (वचनांत सांगितलेल्‍या सर्वांच्या) वधाविषयी जाणावें. ‘‘यम’’---तीन दिवसपर्यंत पाणी प्यावें किंवा एक योजनपर्यंत रस्‍ता चालावें, किंवा नदीत स्‍नान करावें, अथवा पाणी ज्‍याची देवता आहे असें सूक्त (आपोहिष्‍ठा०) म्‍हणावे. ‘‘पराशर’’-वृक (एका जातीचा पक्षी), कावळा, पारवा, साळुंकी व तित्तिर यांचा वध केला तर दोन्ही संध्यांत पाण्याच्या आत उभे राहून प्राणायाम करावे म्‍हणजे शुद्धि होईल. ‘‘संध्ये’’ ही अत्‍यंत संयोगाविषयी द्वितीया आहे, म्‍हणून जितक्‍या प्राणायामांनीं दोन्ही संध्या समाप्त होतील तितके प्राणायाम करावे. ‘‘प्राणायामेन’’ हे एकवचन अविवक्षित आहे असें माधव म्‍हणतो. हें अज्ञानानें एक वेळ केलेल्‍या वधाविषयी जाणावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP