मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १०२ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०२ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ विशेषतः। ‘‘तत्र जातितोदुष्‍टे पलांड्वादौ अज्ञानात्‍सकृद्भुक्ते बृहस्‍पतिः’’ लशुनं कवकं चैव पलांडुं गृंजनं तथा।
चत्‍वार्यज्ञानतोजग्‍ध्‍वा तप्तकृच्छ्रं चरेद्विज इति। ‘‘ज्ञानतस्‍तु याज्ञवल्‍क्‍यः’’ पलांडुं विड्वराहं च छत्राकं ग्रामकुक्‍कुटं।
लशुनं गृंजनं चैव जग्‍ध्‍वा चांद्रायणं चरेत्‌ गृंजनं लशुनतुल्‍यः कंद इति विज्ञानेश्र्वरः।
यदीयं चूर्णं गायकाः कंठशुध्यै विटाश्र्च मदार्थमश्र्नंति स पत्रविशेष इति माधवः। ‘‘विषदिग्‍धेन शल्‍येन योमृगः परिहन्यते।
अभक्ष्यं तस्‍य तन्मांसं तद्धि गृंजन मिष्‍यत इत्‍यपरार्कः।
‘‘यत्तु हेमाद्रिमाधवौ गाजराख्यमूलमिति तन्न हेमाद्रावेव गृंजनं चुक्रिकां चुक्रं गाजरं पोतिकां तेथति ब्राह्मे पृथक्‌ निर्देशात्‌।
‘‘शातातपः’’ लशुनं गृंजनं जग्‍ध्‍वा पलांडुं च तथा शुनीमित्‍ययुक्‍त्‍वा उपायनं पुनः कुर्यात्तप्तकृच्छ्रं चरेन्मुहुरिति।
‘‘चांद्रायणानुवृत्तौ विष्‍णुः’’ लशुन पलांडुगृंजनविड्वराहग्रामकुक्‍कुटनरगोमांसभक्षणे सर्वेष्‍वेतेषु द्विजातीनां प्रायश्चित्तांते पुनःसंस्‍कारं कुर्यादिति। ‘‘यत्तु मनुः’’ छत्राकं विड्वराहं च लशुनं ग्रामकुक्‍कुटं।
पलांडुं गृंजनं चैव मत्‍या जग्‍ध्‍वा पतेन्नरः अमत्‍यैतानि षट्‌ जग्‍ध्‍वा कृच्छ्रं सांतपनं चरेत्‌। यतिचांद्रायणं वापि शेषेषूपवसेदहरिति। अत्र कामतोऽभ्‍यासे पतनं। अज्ञानत औषधार्थं सकृद्भक्षणे सांतपनं। औषधार्थमेव ज्ञानतः सकृदज्ञानतोऽभ्‍यासे च चांद्रं।
पलांड्वाद्येकनाश्यरोगे तु नैव दोषः। ‘‘तथाच पलांड्वाद्यनुवृत्तौ सुमंतुः’’ एतान्येवातुरस्‍य भिषक्‌क्रियायामप्रतिषिद्धानीति

लसूण, कवक, कांदा, गृंजन वगैरे पदार्थ ज्ञानानें व अज्ञानानें खाल्‍ले तर प्रायश्चित्त. तसेंच औषधासाठी खाल्‍ले तर प्रायश्चित्त.

‘‘आतां विशेषें करून (अभक्ष्य भक्षणाविषयीं) सांगण्यांत येते. ‘‘त्‍यांत जातीनें दृष्‍ट असलेला कांदा वगैरे  अज्ञानानें खाल्‍ला असतां बृहस्‍पति’’---लसूण, कवक, कांदा, व गृंजन हे चार पदार्थ जो द्विज अज्ञानानें खाईल त्‍यानें तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त करावे. ‘‘बुद्धिपूर्वक (खाल्‍ले) तर याज्ञवल्‍क्‍य’’---कांदा, गावडुकर, छत्राक, गांवठी कोंबडा, लसूण व गृंजन हे पदार्थ खाल्‍ले तर चांद्रायण प्रायश्चित्त करावें. ‘‘गृंजन’’ म्‍हणजे लसणासारखा एक कंद असें विज्ञानेश्र्वर म्‍हणतो. ज्‍यांचें चूर्ण गाणारे (लोक) गळा साफ रहाण्याकरितां व विट कैफ येण्याकरितां खातात, ती एका जातीचीं पत्रें (पानें) असें माधव म्‍हणतो. ‘‘विषानें चोपडलेला बाण इत्‍यादिकानें जो हरिण मारण्यांत येतो, त्‍याचें मांस भक्षण करण्यास अयोग्‍य होय. त्‍याला गृंजन असें म्‍हटलें आहे’’ असें अपरार्क म्‍हणतो. ‘‘जें तर हेमाद्रि व माधव गाजर या नांवाचें मूळ असें म्‍हणतात, ते बराबर नाहीं. कारण, हेमाद्रींतच ‘‘गृंजन, आम्‍लवेतस, चुका, गाजर व पोतिका’’ याप्रमाणें ब्रह्मपुराणांतून निराळें सांगण्यांत आलें. ‘‘शातातप’’ लसूण, गृंजन कांदा व शुनी हे पदार्थ खाल्‍ले असतां’’ याप्रमाणें सांगून पुनरुपनयन करावें व वारंवार तप्तकृच्छ्र करावें असें सांगतों. ‘‘चांद्रायणास अनुसरण्याविषयीं विष्‍णु’’---लसूण, कांदा, गुंजन, गांवडुकर, गावठी कोंबडें व मनुष्‍य आणि गाय यांचें मांस यांचे भक्षण केलें असतां या सर्वांविषयी द्विजांचें प्रायश्चित्त झाल्‍यानंतर पुनरुपनयन करावे. ‘‘जें तर मनु’’ छत्राक, गांवठी डुकर, लसूण, गांवठी कोंबडें, कांदा व गृंजन हे पदार्थ मनुष्‍यानें बुद्धिपूर्वक खाल्‍ले असतां तो पतित होईल. अज्ञानानें हे सहा पदार्थ खाल्‍ले तर सांतपनकृच्छ्र करावें, अथवा यतिचांद्रायण करावें. बाकी राहिलेल्‍या निषिद्ध पदार्थांच्या भक्षणाविषयीं एक दिवस उपोषण करावें. याविषयी जर बुद्धिपूर्वक अभ्‍यास असेल तर पतन (पातित्‍य) समजावें अज्ञानानें औषधाकरितां एक वेळां भक्षण केलें तर सांतपन, औषधासाठीच ज्ञानानें एक वेळां व अज्ञानानें अभ्‍यास असेल तर चांद्रायण करावे. कांदा वगैरे यांच्या योगानेंच नाहींशा होणार्‍या रोगाविषयी तर दोष नाहींच. ‘‘तसेंच कांदा वगैरे पदार्थ घेण्याविषयीं सुमंतु’’---हींच रोग्‍यास वैद्याच्या क्रियेविषयीं (औषधाविषयीं) निषिद्ध नाहींत.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP