मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १४४ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४४ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ सुवर्णस्‍तेये.

‘‘आपस्‍तंबः’’ ब्राह्मणसुवर्णापहरणं महापातमिति ते सुवर्णस्‍तु षोडशेति याज्ञवल्‍क्‍योक्तेः सुवर्णशब्‍दः षोऽशमाषोन्मितहेमवचनः।
एवं च ततोन्यूनहरणे न महापातकं। ‘‘प्रायश्चित्तमाह याज्ञवल्‍क्‍यः’’ अनिवेद्य नृपे शुध्येत्‍सुरापव्रतमाचरन्निति सुरापव्रतं द्वादशाद्बं। सुवर्णस्‍तेयानुवृत्तौ महाव्रतं वा द्वादशाद्बानि कुर्यादिति कल्‍पतरौ विष्‍णूक्तेः। द्वादशभिर्वर्षैर्महापातकिनः पूयंत इति हारीतोक्तेश्र्च। युगपदनेकसुवर्णहरणेप्येकमेव प्रायश्चित्तं नावृत्तिः हरणक्रियाया एकत्‍वात्‌ ब्रह्मवधादौ तु हननक्रियाभेदात्‌ आवृत्तमेव प्रायश्चित्तं। प्रायश्चित्तांतरमाह स एव’’ आत्‍मतुल्‍यं सुवर्णं वा दद्याद्वा विप्रतुष्‍टिकृत्‌ अत्रात्‍मसमस्‍वर्णदानं धनवद्विषयं।
तत्राशक्तस्‍तु विप्रतुष्‍टिकृत्‍सुवर्णं दद्यात्‌।  ‘‘यत्तु व्यासः’’ एतदेवव्रतं स्‍तेनः पादन्यूनं समाचरेदिति तन्निर्गुणस्‍वामिकसुवर्णापहारविषयमिति निबंधकृतः। वयं तु पादोनसुवर्णापहारविषयमिति प्रतीमः।
‘‘यद्यप्यपरार्केऽ’’ त्रिःषडद्बं वा चरेत्‍कृच्छ्रं यजेद्वा क्रतुना द्विजः।
तीर्थानि वा भ्रमन्विप्रस्‍ततस्‍तेया द्विमुच्यत इति तु क्षुत्‍क्षामकुटुंबभरणाय निर्गुणस्‍वामिकसुवर्णापहारविषयमिति केचित्‌ युक्तं तु पूर्वरीत्‍यार्धसुवर्णापहार विषयत्‍वं साम्‍यातिदेशविषयीभूताश्र्वरत्‍नाद्यपहारविषयत्‍वं वा क्रतुरत्र स्‍वर्जिदादिः। तीर्थभ्रमणं चाशीत्‍यधिकशतयोजनगमनं द्रष्‍टव्यं


सोन्याच्या चोरी विषयीं.

ब्राह्मणाचें सोनें चोरलें तर प्रायश्चित्त. सोन्याचें परिमाण. प्रायश्चित्ताविषयीं दुसर्‍यांची मते.

‘‘आपस्‍तंब’’---ब्राह्मणाचें सोनें चोरणें हें महापातक सोळा माशांचा एक सुवर्ण असें ‘‘याज्ञवल्‍क्‍यानें’’ सांगितलें त्‍यावरून ‘‘सुवर्ण्’’ हा शब्‍द सोळा माशा एवढ्या सोन्याचा वाचक आहे. यावरून त्‍यापेक्षां कमी अशा सोन्याच्या चोरी विषयीं मोठें पातक नाही. ‘‘याज्ञवल्‍क्‍य प्रायश्चित्त सांगतो’’ सोन्याची चोरी करणारानें राजास निवेदन केल्‍यावाचूनही जर मद्यप्याचें व्रत केलें तर तो शुद्ध होईल. मद्यप्याचें व्रत म्‍हणजे द्वादशाब्‍द. कारण ‘‘सोन्याच्या चोरीची निष्‍कृति होण्याकरितां मोठे व्रत किंवा द्वादशाब्‍दें करावी’’ असें ‘‘कल्‍पतरूंत’’ विष्‍णूचें वचन आहे, आणि ‘‘बारा वर्षांनीं महापातकें शुद्ध होतात’’ असें हारीताचें वचन आहे. एकेच वेळीं पुष्‍कळ सोन्याची चोरी केली तरी एकच प्रायश्चित्त, आवृत्ति नाही. कारण हरणक्रिया ही एकच आहे. ब्राह्मणाचा वध करणें इत्‍यादिकाविषयीं तर मारण्याच्या क्रियेचा भेद आहे, म्‍हणून प्रायश्चित्ताची आवृत्तिच करावी. ‘‘तोच दुसरें प्रायश्चित्त सांगतो.’’ आपल्‍या वजनाएवढें किंवा ब्राह्मणाचा संतोष होईल एवढें सोनें द्यावें. या वाक्‍यांत आपल्‍या वजनावढें सोनें देणें तें श्रीमंताविषयीं जाणावें. एवढें देण्यास असमर्थ असेल त्‍यानें ब्राह्मणाचा संतोष होईल एवढें सोनें द्यावें. ‘‘जें तर व्यास’’ चोरानें हेंच व्रत तीन चतुर्थांशा एवढें करावें’’ असें म्‍हणतो, तें गुणरहित असा ज्‍याचा मालक आहे अशा सोन्याविषयी जाणावें असें निबंधकार म्‍हणतात. आम्‍हीं तर तीन चतुर्थांशा एवढ्या सोन्याच्या चोरीविषयी असावें असा तर्क करतो. ‘‘अपरार्कांतही अत्रि’’ ‘‘द्विजानें षडद्ब प्रायश्चित्त करावें, किंवा स्‍वर्गजित्‌ इत्‍यादि यज्ञ करावे, अथवा एकशें ऐंशी योजनांवर असणार्‍या तीर्थास जावें. म्‍हणजे तो चौर्यापासून मुक्त होईल.’’ असें म्‍हणतो तें तर क्षुधेच्या योगानें पीडित झालेल्‍या कुटुंबाच्या पोषणाकरितां ज्‍याचा मालक गुणरहित आहे अशा सोन्याच्या चोरीविषयी जाणावें असें कित्‍येक म्‍हणतात. पूर्वीच्या रीतीनें अर्ध्या सोन्याच्या चोरीविषयींचे किंवा साम्‍यातिदेशा विषयीं असलेल्‍या घोडे, रत्‍नें इत्‍यादिकांच्या चोरीविषयीचें असावें असें वाटतें तें योग्‍य होय.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP