मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त २४ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २४ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथोतिकर्तव्यताः

‘‘विष्‍णुः’’ सर्वपापेषु सर्वेषां व्रतानां विधिपूर्वकं। ग्रहणं संप्रवक्ष्यामि प्रायश्चित्ते। दिनांते नखरोमादीन्प्रवाप्य स्‍नानमाचरेत्‌।
भस्‍मगोमयमृद्वारिपंचगव्यविकल्‍पितैः। मलापकर्षणं कार्य ब्राह्मशौचविवृद्धये। दंतधावनपूर्वेण पंचगव्येन संयुतं।
व्रतं निशामुखे ग्राह्यं बहिस्‍तारकदर्शने। आचम्‍यातः परं मौनी ध्यायन्दुष्‍कृतमात्‍मनः।
मनः संतापनात्तीब्रमुद्वहेच्छोकमंतत इति रोम श्मश्रु आदिना केशग्रहणं। ब्राह्मशौचं पापनिर्हरणं।
पंचगव्येनेति भस्‍मादिसमस्‍तस्‍यैव पंचगव्यादरेनुवादात्‌ भस्‍मादिस्‍नानापेक्षयापि दंतधावनस्‍य पूर्वसिद्धिः आचारोप्येवं ‘‘पितामहचरणाश्र्च’’ व्रतं होमावशिष्‍टपंचगव्यप्राशनमिति ‘‘महार्णवादौ’’। प्रायश्चित्तसंकल्‍प इति ‘‘माधवशूलपाणी’’। धृतप्राशनमिति ‘‘कल्‍पतरुः।
न्युप्यकेशनखान्‌ पूर्वं घृतं प्राश्य विशुध्यतीति ‘‘शंखलिखितोक्तेः’’ पूर्वमित्‍यस्‍याग्रेनद्यां स्‍नात्‍वा विशुघ्‍यतीति वा पाठः तदा न घृतप्राशनं। बहिर्ग्रामात्‌। ‘‘जाबालिः’’ आरंभे सर्वकृच्छ्राणां समाप्तौ च विशेषतः। आज्‍यैनैव हि शालाग्‍नौ जुहुयात्‌व्याहृतीः पृथक्‌।
श्राद्धं कुर्याद्व्रतांते च गोहिरण्यादिदक्षिणां। स्त्रीणां होमोन दातव्यः पंचगव्यं तथैव च। श्राद्धं वैष्‍णवं।
विधाय वैष्‍णवं श्राद्धं साकल्‍यं निजकाम्‍यया। धेनुं दद्याद्दिजेभ्‍योऽथ दक्षिणां च स्‍वशक्तित इति ‘‘शातातपोक्तेः’’।
व्रतांते प्रायश्चित्तांते गोहिरण्यादिदक्षिणा देयेति संबंधः। अत्र विष्‍णुदेवताया पित्रादिदेवताबाधः। साकल्‍यत्‍वाच्चार्‍घ्‍यावाहनाग्‍नौकरणावनेजनपिंडस्‍वधावाचनानां बाध इत्‍युक्तमस्‍मत्‍कृते ‘‘श्राद्धमयूखे’’ समाप्तौवेति श्राद्धं कुर्यादित्‍यत्राप्यन्वेति। ‘‘शूलपाणिस्‍तु’’ गोहिरण्यादिदक्षिणामिति। ‘‘शूलपाणिस्‍तु’’ गोहिरण्यादिदक्षिणामिति पपाठ।
तदा प्रायश्चित्तांते एव हिरण्यादिदक्षिणं श्राद्धं कार्य नादावित्‍यर्थः। स्त्रीणां शालाग्‍निहोम एव न भवति तस्‍यैव प्रकृत्‍वात्‌।
लौकिकेऽग्‍नौ तु भवेत्‍येव। स च विप्रद्वारा इति केचित्‌। उपसासोव्रतं होमस्‍तीर्थस्‍नानजपादिकं।
विप्रैः संपादितं यस्‍य संपन्नं तस्‍य तत्‍फलमिति  ‘‘पराशरोक्तेः’’ तत्र अस्‍य पाप्तेषु जपहोमादिषु अशक्तौ विप्ररूप्रतिनिधिनियम मात्रार्थत्‍वात्‌। प्रायश्चित्तांगजपहोमयोस्‍तु निषेधादेवाप्राप्तैस्‍तत्र तस्‍याप्रवृत्तिः।
यदपि ‘‘वाराहे’’ अमंत्रस्‍य तु शूद्रस्‍य विप्रोमंत्रेण गृह्यत इति तस्‍यापि परिभाषात्‍वेऽपि प्राप्तयोरेव जपहोमयोः प्रवृत्तिः।
एतेन ‘‘यन्मदनरत्‍नमहार्णवयोः’’ स्त्रीशूद्रादेव्रिप्रद्वारा समंत्रकौ जपहोमौ भवत इति तत्‍परास्‍तं।
‘‘पराशरः’’ स्त्रीशूद्रस्‍य शुध्यर्थं प्राजापत्‍यं समाचरेत्‌। पंचगव्यं च कुर्वीत स्‍नात्‍वा पीत्‍वा शुचिर्भवेत्‌।
स्त्रीणां पंचगव्यस्‍य विहितप्रतिषिद्धत्‍वाद्विकल्‍पः। शूद्राणां तु नित्‍यं भवत्‍येव।
शूद्रस्‍यापि विकल्‍प इति ‘‘महार्णवे’’ तन्न तस्‍य स्त्रीपदगर्भनिषेधाप्रवृत्तेः।
यत्तु स्त्रीशूद्रास्‍तु सधर्माण इति तद्विशेषाभावे स्त्रीशूद्रयोः समानधर्मत्‍वप्रतिपादनार्थं। अस्‍ति चात्र शूद्रे पंचगव्यस्‍य विशेषविधिः।
यत्तु ‘‘पंचगव्यं पिबेच्छ्रूद्रो ब्राह्मणस्‍तु सुरां पिबेत्‌। उभौ तौ तुल्‍यकर्माणौ पूयाख्ये नरके वसेत्‌’’ इति अत्रिवचस्‍तद्रागप्राप्तप्राशननिषेधपरं

वपने विशेषमाह ‘‘वशिष्‍टः’’ कृच्छ्राणां व्रतरूपाणां श्मश्रुकेशादि वापयेत्‌। अक्षिरोमशिखावर्‍ज्‍यमिति।
काम्‍यकृच्छादौ वपनं नेति ‘‘मदनपारिजाते’’। गोवधे तु ‘‘पराशरः’’ प्राजापत्‍यं चरेत्‍कृच्छ्रं गोघाती व्रतमुत्तमं।
सशिखं वपनं कार्य त्रिसंध्यमवगाहनमिति। विशेषमाह ‘‘संवर्तः’’ पादेंगरोमवपनं द्विपादे श्मश्रुणोऽपिच।
त्रिपादे तु शिखावर्ज्यं सशिखं निपातन इति। सधवानां विशेषमाह ‘‘वसिष्‍ठः’’ केशानां नास्‍ति नारीणां वपनं व्रतयज्ञयोः।
गोवधादिषु सर्वेषु छेदयेदंगुलद्वयं। साधवानां तु नारीणामलंकाराय सर्वदा।
केशसंधारण प्रोक्तं प्रायश्चित्ते द्विजोत्तमैरिति अंगुलत्रयमिति क्वचित्‍पाठः। अत्र सधवापदाद्विधवानां सर्वं वपनं।
अत्र विशेषमाह ‘‘पराशरः’’ वपनं नैव नारीणां नानुव्रज्‍या जपादिकं। न गोष्‍ठे शयनं तासां न वसीरन्‌ गवाजिनं।
सर्वान्‌ केशान्‌ समृदृत्‍य छेदयेदंगुलद्वयं। सर्वत्रैवं हि नारीणां शिरसो मुंडनं स्‍मृतं। वासिष्‍ठे आदिपदं प्रायश्चित्तांतरपरं।
तेन ‘‘प्रयागादौ’’ मुंडनं चोपवासश्र्च सर्वतीर्थेष्‍वयं विधिरिति ‘‘देवलाद्युक्तेः’’ सर्वमुंडनमेव। वेण्यां वेणीप्रदानेनेति लिंगादाचाराच्च।
तीर्थांतरे न भवतीत्‍यन्यदेतत्‌। ‘‘अपरार्के’’ उदङ्युखः प्राङ्‌मुखोवा वपनं कारयेत्‍सुधीः। केशश्मश्रुलोमनखान्युदक्‌संस्‍थानि वापयेत्‌।
दक्षिणं कर्णमारभ्‍यकर्मार्थं पापसंचये। शिखाद्यं नवसंस्‍कारे शिखाद्यंतं शिरोवपेत्‌। पापसंचये तन्निमित्ते प्रायश्चित्ते।
‘‘तैत्तिरीयके’’ आसुरं वपनं निंदित्‍वा दैवे क्रम उक्तः। देवान्प्रक्रम्‍य उपपक्षावग्रेवपंत। अथ ष्‍मश्रूण्यथ केशानिति।
मानुष्‍येऽपि तत्रैव मनुं प्रकम्‍य श्मश्रूण्यग्रेवपंत अथोपपक्षावय केशानिति। अग्‍्याधानेष्‍टिसोमेषु दैवं तस्‍य विधानात्‌।
प्रायश्चित्ते तु दैवमानुषे विकल्‍पेन। तत्राप्युदक्‌ संस्‍थितायै दक्षिणश्मश्रूपपक्षौ वप्त्‍वा वामाविति।
इदं च वपनं निषिद्धकालेऽपि कार्य ‘‘क्षौरं नैमित्तिकं कार्य निषेधे सत्‍यपि ध्रुवं। पित्रादिमृतियात्रासु प्रायश्चित्ते च तीर्थक इति ‘‘स्‍मृतेः’’

निषेधांश्र्च ‘‘वृद्धगार्ग्यः’’ रव्यारसौरिवारेषु रात्रौ पाते व्रतेहनि। श्राद्धाहः प्रतिपद्रिक्ताभद्राः क्षौरेषु वर्जयेत्‌।
भद्राः द्वितीयाद्याः न करणं तिथिसाहचर्यात्‌। ‘‘व्यासः’’ नक्षत्रे तु न कुर्वीत यस्‍मिन्जातोभवेन्नरः।
न प्रौष्‍टपदयोः कार्य नैवाग्‍नेये तु भारत। दारुणेषु तु सर्वेषु दुष्‍टतारां तु वर्जयेत्‌।
‘‘बादरायणः’’ सिंह धनुषि मीने च स्‍थिते सप्ततुरंगमे। यात्रोद्वाहगृहसंभक्षौरकार्याणि वर्जयेत्‌ ‘‘व्यासः’’ विवाहमौंजीचूडासु वर्षमर्धं तदर्धकं।
अंतर्वत्‍न्‍यां च जायायां नेष्‍यते केशवापनमित्‍याद्यनेकनिषेधाः ‘६ समयमयूखे’’ उक्ताः।
तथा जीवत्‍पितृकेणापि न कार्यें ‘‘मुंडनं पिंडदानं च प्रेतकर्म च सर्वशः।
न जीवत्‍पितृकः कुर्यात् गुर्विणीपतिरेव चेति दक्षीयनिषेधस्‍य रागप्राप्तविषयत्‍वाद्विधिस्‍पृष्‍टेऽनवकाशात्‌।
वस्‍तुतस्‍त्‍विदं ‘‘दक्षस्‍मृतौ’’ निबंधे वानुपलंभान्निर्मूलं। ‘‘शंखः’’ राजा वा राजपुत्रौ वा ब्राह्मणो वा बहुश्रुतः।
केशानां वपनं कृत्‍वा प्रायश्चित्तं समाचरेत्‌। केशानां रक्षणार्थं तु द्विगुणं व्रतमाचरेत्‌। द्विगुणे व्रत आचीर्णे दक्षिणा द्विगुणा भवेत्‌।
‘‘यत्तु’’ विद्वद्विप्रनृपस्त्रीणां नेष्‍यते केशवापनं। ॠते महापातकिनो गोहंतुश्र्चावकीर्णिनं इति तत्र ‘‘विज्ञानेश्र्वरः’’ महापातकादिव्यतिरिक्ते राजादीनां वपनं नात्‍स्‍त्‍येव। महापातकादौ तु तेषां वपनानिच्छायां द्विगुणदक्षिणासहितं व्रतद्वैगुण्यमिति।
अन्ये तु महापातकादौ नित्‍यं राजादेरपि वपनमेवान्यत्र तु वपनानिच्छायां व्रतद्वैगुण्यविधिरित्‍याहुः।
इयं च वपनाद्येतिकर्तव्यता प्राजापत्‍यप्रभृतिष्‍वेव भवति न ततोऽल्‍पेषु। तथा च ‘‘पैठीनसिः। द्वादशाहे संपूर्णे वपनमिति वपनग्रहणं चेतिकर्तव्यतांतरस्‍याप्युलक्षणं। तथा च ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ कुर्यात्‍त्रिषवणस्‍नायी कृच्छ्रं चाद्रायणं तथा।
पवित्राणि जपेत्‍पिंडान्‌ गायत्र्या चाभिमंत्रयेदिति। निवर्तमानवपनसाहचर्यात्‌ पंचगव्यादेरपि निवृत्तिः। अत एव न्यूने पादव्रते वस्त्रमिति वैष्‍णवे वस्त्रादिमात्रदानोक्तेरपीदमवगम्‍यते।

इतिकर्तव्यता.
प्रायश्चिताच्या संबंधानें एकंदर करावयाचें कृत्‍य.
‘‘विष्‍णु सर्व पातकांत सर्व व्रतांचें (प्राजापत्‍यादिकांचें) विविपूर्वक ग्रहण सांगतो’’ प्रायश्चित्त करण्याचें ठरल्‍यावर संध्याकाळी नखें, डोक्‍यावरील केश, व दाढी मिशी वगैरे ठिकाणचे केश काढून नंतर स्‍नान करावे. तें असे-‘‘पंचगव्येन’’ यावरून भस्‍म आहे पूर्वी ज्‍यांत अशा सर्वांस पंचगव्यादिकाचा अनुवाद आहे म्‍हणून भस्‍मादि स्‍नानांच्या पूर्वीच दांत घासणें करावें असें सिद्ध होतें, आचार देखील असाच आहे. आमचे ‘‘आजोबा’’ देखील असेच म्‍हणतात, म्‍हणून पूर्वी दात घासून नंतर पापाचा नाश होण्याकरितां भस्‍म, गाईचें शेण, माती, पाणी व पंचगव्य यांनी स्‍नान करावे. नंतर संध्याकाळी गांवाच्या बाहेर जाऊन नक्षत्रें दिसण्याच्या वेळी व्रत धारण करावें. व्रत म्‍हणजे होमा पैकी शेष राहिलेल्‍या पंचगव्याचें प्राशन असें ‘‘महार्णवादिकांत’’ आहे. प्रायश्चित्ताचा संकल्‍प असें ‘‘माधव व शूलपाणि’’ म्‍हणतात. ‘‘न्युप्य केशनखान्‌ पूर्वं घृतं प्राश्य विशुघ्‍यति’’ (पूर्वी केंस व नखें काढवून तूप प्यावें म्‍हणजे शुद्ध होतो) असें ‘‘शंख’’ व ‘‘लिखित’’ यांचे म्‍हणणें आहे त्‍यावरून तूप प्यावें असें ‘‘कल्‍पतरूंत’’ आहे. अथवा ‘‘पूर्वं’’ याच्या पुढें ‘‘नद्यां स्‍नात्‍वा विशुध्यति’’ असा पाठ मानला तर तूप पिऊं नये. ‘‘जाबालि’’-सर्व कृच्छ्रांच्या आरंभी व शेवटीं विशेषें करून शालाग्‍नीवर तुपानें व्याहृतींचा निरनिराळा होम करावा व श्राद्ध करावे. शेवटी ब्राह्मणांस गाय सोने वगैरे दक्षिणा द्यावी. स्त्रियांनी होम देऊं नये, तसेंच पंचगव्यही घेऊं नये. श्राद्ध म्‍हणजे ‘‘विष्‍णु श्राद्ध’’ कारण ‘आपल्‍या इच्छे प्रमाणें संपूर्ण विष्‍णु श्राद्ध करून ब्राह्मणांस आपल्‍या शक्तिप्रमाणें गाय व दक्षिणा द्यावी’ असें ‘‘शातातपाचें’’ म्‍हणणें आहे. या श्राद्धांत विष्‍णु ही देवता असल्‍यानें पितरादि देवता घेऊं नयेत. ‘‘सकल्‍य’’ असें पद असल्‍यानें
अर्घ्य आवाहन, अग्‍नौकरण, अवनेजन, पिंड व स्‍वधावाचन यांस बाध आहे असें मी केलेल्‍या ‘‘श्राद्धमयूखांत’’ सांगितलें आहे. ‘‘समाप्तौवा’’ या पदाचा ‘‘श्राद्धं कुर्यात्‌’’ येथें ही अन्वय होतो. ‘‘शूलपाणि’’ तर ‘‘गोहिरण्यादि दक्षिणां’’ असा पाठ करतो तेव्हां प्रायश्चित्ताच्या शेवटी गाय सोनें वगैरे दक्षिणा द्यावी, अगोदर देऊं नये. स्त्रियांचा शालाग्‍नीवर होमच होत नाहीं, तो पुरुषाच लागु आहे. लौकिकाग्‍नीवर तर तो होतोच, पण तो ब्राह्मणाच्या द्वारानें होतो असें कित्‍येक म्‍हणतात. कारण उपास ‘‘व्रत (एकादशी वगैरे), होम, तीर्थांत स्‍नान करणें व जप करणें हे ब्राह्मणांकडून ज्‍याचें करण्यांत येईल त्‍याला त्‍या कर्माचें फळ मिळेल असें’’ ‘‘पराशराचें’’ म्‍हणणें आहे, पण तें बरोबर नाही. कारण हें (पराशराचें) वचन प्राप्त झालेली जप होम वगैरे करण्यास अशक्त असणार्‍या विषयीं ब्राह्मणरूप प्रतिनिधीच्या नियमा करितांच आहे. प्रायश्चित्ताच्या अंगभूत असणार्‍या जप व होम यांस निषेध असल्‍यानें त्‍यांची प्राप्ति येत नाही. म्‍हणून त्‍या ठिकाणी त्‍याची (त्‍या वचनाची) प्रवृत्ति नाही. जें ही ‘‘वराहपुराणांत’’ मंत्ररहित अशा शूद्राचे ब्राह्मणानें मंत्राच्या योगानें घ्‍यावे’’ असें वचन आहे, त्‍याला जरी परिभाषात्‍व आहे तरी त्‍या वचनाची प्राप्त झालेल्‍या जप व होम यांच्या ठिकाणीच प्रवृत्ति आहे. यावरून जें ‘‘मदनरत्‍न’’ व ‘‘महार्णव’’ यांत स्त्री, शूद्र वगैरे यांचे जप होम ब्राह्मणाकडून समंत्रक होतात असें सांगितलें आहे तें व्यर्थ होय. ‘‘पराशर’’ -स्त्री व शूद्र यांच्या शुद्धी करितां प्राजापत्‍य करावें व पंचगव्य करावे. त्‍यांचे स्‍नान व पान केलें असतां ते शुद्ध होतील. स्त्रियांस पंचगव्याचा विधि व निषेध असल्‍यानें विकल्‍प आहे. शूद्रांनीं तर पंचगव्य घ्‍यावेच. शूद्रालाही विकल्‍प आहे असें ‘‘महार्णवांत’’ आहे ते बरोबर  नाही. कारण स्त्री या पदाच्या पोटी शूद्रपद असल्‍यानें त्‍याला निषेधाची प्रवृति येत नाही.
जें तर ‘‘स्त्री व शूद्र हे समानधर्म आहेत’’ असें वचन त्‍यांच्या समानत्‍वाविषयीं आहे तें स्त्री व शूद्र यांच्या समान धर्माच्या प्रतिपादना करितां आहे. आणखी येथें शूद्राविषयीं पंचगव्याचा विशेष विधि आहे. जें तर ‘‘जो शूद्र पंचगव्य पिईल व जो ब्राह्मण मद्य पिईल ते दोघे सारखें ज्‍यांचे कर्म आहे असे होत्‍साते पूय या नांवाच्या (पुवाच्या) नरकांत वास करतील’’ असें ‘अत्रीचें’’ वचन आहे तें इच्छेनें प्राप्त होणार्‍या प्राशानाच्या निषेधा बद्दलचे आहे.

क्षौराचे नियम. स्त्रियांविषयी विशेष नियम.

‘‘वसिष्‍ठ वपना विषयी विशेष सांगतो’’ -व्रतरूप अशा कृच्छ्रांमध्ये पापण्या, भिवया व शेंडी वर्ज्य करून दाढी वगैरे ठिकाणचे केस काढवावे. काम्‍यकृच्छ्रादिकांत क्षौर नाहीं असे ‘‘मदनपारिजातांत’’ आहे. ‘‘गाईच्या वधा विषयी पराशर’’ -गाईचा वध करणारानें उत्तम असें प्राजापत्‍य कृच्छ्र नांवाचें व्रत करावे, शेंडीसकट क्षौर करवावें व त्रिकाळ स्‍नान करावे. ‘‘संवर्त विशेष सांगतो’’-चतुर्थांश व्रतांत शरीरावरील केंसांचें वपन करावे. अर्ध्या व्रतांत दाढीचें वपन करवावें. तीन चतुर्थांशांत शेंडी वाचून बाकीच्या ठिकाणचे केंस काढवावे. संपूर्ण व्रतांत शेंडी सकट सर्व केसांचे वपन करावे. ‘‘वसिष्‍ठ सुवासिनींस विशेष सांगतो’’ -व्रत व यज्ञ यांत स्त्रियांच्या केसांचे वपन होत नाही. गाईचा वध इत्‍यादि घडलें असतां दोन अंगंलें पावेंतों केस कापवावें. सुवासिनी स्त्रियांस ते (केस) निरंतर अलंकारांच्या ठिकाणी आहेत, म्‍हणून श्रेष्‍ठ ब्राह्मणांनीं प्रायश्चित्तांत त्‍यांनी (स्त्रियांनी) केस ठेवावे असें सांगितलें. ‘‘अगुलत्रयं’’ (तीन अंगुळें) असा क्‍वचित्‌स्‍थळी पाठ आहे. या वाक्‍यांत सधवा असें पद आहे त्‍यावरून विधवांस सगळें वपन आहे. ‘‘पराशर याविषयी विशेष सांगतो’’ -स्त्रियांस क्षौर नाही, अनुव्रज्‍या नाहीं, जप वगैरे नाही, त्‍यांस गाईच्या गोठ्यांत शयन (निजणें) नाहीं,  व त्‍यांनी गोचर्म (गाईचें चामडें) पांघरू नये. सर्व केस सोडून त्‍यांचे दोन अंगुहैं पावेतों वपन करावे. याप्रमाणे सर्व ठिकाणी स्त्रियांच्या डोकीवरील केसांचें वपन (क्षौर) सांगितले ‘‘वसिष्‍ठाच्या’’ वचनांत आदिपद आहे तें दुसर्‍या प्रायश्चित्ता बद्दलचे आहे. त्‍यावरून प्रयागादितीर्थांच्या ठिकाणीं ‘‘क्षौर व उपास हा सर्व तीर्थांच्या ठिकाणीं विधि होय’’ अशा ‘‘देवलादिकांच्या’’ वचनावरून स्त्रियांचें सर्व क्षौरच करावावे. आणि ‘‘त्रिवेणीच्या ठिकाणीं वेणीच्या दानानें’’ अशा ‘‘लिंगपुराणा’’ वरून व असा आचार आहे त्‍यावरून दुसर्‍या तीर्थांत क्षौर होत नाही.

क्षोरा विषयीं दिशेचा नियम व क्षौराचा प्रकार.

‘‘अपरार्कांत’’ ज्ञात्‍यानें उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून क्षौर करवावे. केस (डोकींवरील), दाढीचे केस, शरीरावरील केस व नखें हीं उदक्‌संस्‍थ काढवावी. कर्माच्या उद्देशानें क्षौर करवावयाचें असल्‍यास उजव्या कानापासून आरंभ करून करवावे. पापाचा नाश होण्याकरितां प्रायश्चित्त करावयाचें झाल्‍यास शेंडी पासून आरंभ करून क्षौर करवावे. चूडासंस्‍कारांत पूर्वीं शेंडीं पासून आरंभ करून समाप्तिही तेथेंच होईल अशा रीतीनें डोकीवरील केसांचें वपन करवावें. ‘‘तैत्तिरीयकांत’’ राक्षसी क्षौराची निंदा करून दैविक क्षौरा विषयीं क्रम सांगितला आहे तो असा - दैविक क्षौरांत पूर्वीं उपपक्षांकडील केसांचें वपन करावे. नंतर दाढीवरील केस (डोकीवरील दुसर्‍या भागावरचे) काढवावे. ‘‘मानवक्षौरा विषयींही त्‍यांतच’’ -मानवक्षौरांत पूर्वीं दाढीवरले केस काढवावे. नंतर उपपक्षांवरील केस व दुसर्‍या भागावरील केस काढवावे. अग्‍निहोत्र, इष्‍टि, व सोम यांत दैविक क्षौर करवावे. कारण त्‍यांत त्‍याचा विधि सांगितला आहे. प्रायश्चित्तांत तर दैव व मानुष यांचा विकल्‍प समजावा. त्‍यांतही उदक्‌संस्‍थता होण्याकरितां उजवेकडील दाढीवरचे केस व उपपक्ष हे कापवून नंतर डावी कडले काढवावे. हें क्षौर निषिद्ध कालीही करवावे. कारण ‘‘बाप इत्‍यादिकांचे मरण, यात्रा, प्रायश्चित्त व तीर्थं यांच्या ठिकाणी निंद्य तिथ्‍यादि जरी असलें तरी क्षौर करावे’’ अशी ‘‘स्‍मृति’’ आहे.

क्षौरा विषयीं निंद्य वार, तिथि वगैरे, क्षौरा विषयी दुसरे निषेध.

‘‘वृद्धगार्ग्य’’ क्षौरा विषयीं निंद्य वारादि सांगतो-रवि, मंगळ व शनि हे वार, रात्र, व्यतिपात, व्रताचा दिवस (एकादशी इत्‍यादि), श्राद्धाचा दिवस, प्रतिपदा, चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, द्वितीया, सप्तमी व द्वादशी या तिथि हे क्षौरा विषयी वर्ज्य करावे. ‘‘व्यास’’ - हे भारता (धर्मा) ! ज्‍या नक्षत्रावर मनुष्‍य उत्‍पन्न होईल त्‍यावर क्षौर करूं नये. तसेंच कृतिका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व सर्व दुष्‍ट व्यतिपातादि योग यांवर क्षौर करूं नये. तसेंच क्षौरांत दुष्‍टतारा वर्ज करावी.
‘‘बादरायण’’-सिंह, धन व मीन या राशींवर सूर्य असतां यात्रा, विवाह, घराचा आरंभ व क्षौर हीं कृत्‍यें वर्ज्य करावी. ‘‘व्यास’’---विवाह, मुंज व चौल ही झाल्‍यापासून क्रमानें सर्व, सहा महिने व तीन महिने पावेतों क्षौर इष्‍ट नाही. तसेच स्त्री गर्भार असतांही क्षौर करूं नये इत्‍यादि अनेक निषेध ‘‘समयमयूखांत’’ सांगितल आहेत. तसेंच ज्‍याचा बाप व आई जिवंत असेल त्‍यानेंही क्षौर करूं नये. क्षौर, पिंडदान व प्रेताचें कर्म ही ज्‍याचा बाप व आई जिवंत असेल त्‍यानें व ज्‍याची बायको गर्भार आहे त्‍यानें अवश्य करूं नये. हें ‘‘दक्षाचें’’ निषेधपर वचन इच्छेनें होणार्‍या (क्षौरा) विषयीं असल्‍यामुळें विधीनें प्राप्त होणार्‍या स्‍थळीं त्‍याचा समावेश होत नाही. वास्‍तविक विचार करितां हे वचन ‘‘दक्षस्‍मृतींत’’ किंवा (दुसर्‍या) निबंधांत आढळयांत न आल्‍यानें निर्मूल आहे.

राजा, विद्वान्‌, ब्राह्मण व स्त्री यांच्या क्षौराचा निर्णय. क्षौर न केलेतर त्‍या विषयी

‘‘शंख’’---राजा, राजाचा पुत्र किंवा बहुश्रुत ब्राह्मण यानें वपन करून प्रायश्चित्त करावे. जर केस ठेवावयाचे असतील तर दुप्पट प्रायश्चित्त करावे. दुप्पट प्रायश्चित्त केले तर दक्षिणा दुप्पट असावी. जें तर ‘‘महापातकी, गाईचा वध करणारा व अवकीर्णी यां वाचून विद्वान ब्राह्मण, राजा व स्त्री यांस केसांचें वपन इष्‍ट नाही’’ असें वचन आहे. त्‍याविषयी ‘‘विज्ञानेश्र्वर’’---महापातकादिकां शिवाय दुसर्‍या पातकांत राजादिकांस क्षौर नाहीच. महापातकादिकांत क्षौर करण्याविषयीं त्‍यांची इच्छा नसल्‍यास दुप्पट दक्षिणेनें युक्त असें दुप्पट प्रायश्चित्त करावे असें म्‍हणतो ‘‘दुसरे’’ तर महापातकादिकांत राजादिकास वपन आवश्यक आहेच दुसर्‍या पातकांत वपनाची इच्छा नसतां दुप्पट व्रत करावें असें म्‍हणात. ही वपनादिकाची इतिकर्तव्यता प्राजापत्‍यादिकां विषयींच आहे, त्‍यांहून अल्‍पांमध्ये नाही. त्‍याप्रमाणें ‘‘पैठीनसि’’ बारावा दिवस संपल्‍यानंतर क्षौर असें म्‍हणतो, हें वपनाचें ग्रहण दुसर्‍या कर्तव्यतेचे उपलक्षण आहे. तसेंच ‘‘याज्ञवल्‍क्‍य’’---तीन वेळां स्‍नान करणारानें प्राजापत्‍यादि कृच्छ्र व चांद्रायण करावे, अधमर्षणादि मंत्र म्‍हणावे आणि पिंडांचें गायत्री मंत्राने अभिमंत्रण करावे.’’ त्‍यावरून निवृत्त होणार्‍या वपनाच्या संबंधावरून पंचगव्यादिकाचीही निवृत्ति होते, म्‍हणूनच कमती अशा चतुर्थांश व्रतांत वस्त्र (द्यावें) अशा ‘‘विष्‍णुच्या’’ वचनांत केवळ वस्त्रादिकाच्या दानाची उक्ति आहे त्‍यावरून देखील हे समजण्यांत येते.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP