मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त २६ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २६ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ मृत्तिकास्‍नानम्‌.

‘‘जमदग्‍निः’’ अश्र्वक्रांते रथक्रांतेति वै शुद्धां मृत्तिका माहरे च्छनैः। नमो मित्रस्‍येत्‍यादित्‍याय दर्शयेत्‍समृदौ करौ।
गंधद्वारामितिजप्त्‍वा स्‍वान्यंगान्यनुलेपयेत्‌। ‘‘शिवपुराणे’’ अवश्र्वक्रांत इति स्‍मृत्‍वा मंत्रेणामंत्र्य मृतिकां।
उद्धरेदुध्दृतासीति मंत्रेण सुसमाहितः। नमो मित्रस्‍येतिॠचा दर्शयित्‍वा च भानवे। आरुह्येति च गात्राणि समालभ्‍य द्विराचमेत्‌। ‘अनुलेपने मंत्रातरमाह ‘‘योगी’’ आलभेत मृदागांनि इदं विष्‍णुइतिॠचा।
‘‘मृत्‍परिमाणं कौर्मे’’ मृत्तिका च समुद्दिष्‍टा त्‍वार्द्रामलकमात्रिकेति।
‘‘क्रम उक्तोनारदेन’’ आयुष्‍कामः शिरोलेपं मृदा कुर्या द्विज पुरा। श्रीकामः पादयोः शौचं मृदा पूर्वं समाचरेत्‌।
‘‘पारस्‍करः’’ एकया तु शिरः क्षाल्‍यं द्वाभ्‍यांनाभेस्‍तथोपरि। मृद्भिश्र्च तिसृभिः कार्य षङ्भि पायुं तथैव च।
कटिबस्‍त्‍यूरुजंघाश्र्च पादौ च तिसृभिस्‍ततः। तथा हस्‍तौ परिक्षाल्‍य द्विराचामेत्‍समाहितः।
‘‘योगी’’ मृद्भिरद्भिश्र्च गात्राणि क्रमशस्‍त्‍ववनेजयेत। शीर्षाद्यानीति सर्वाणि स्‍मरन्‌ विष्‍णुमनामयं। कटिबस्‍त्‍यूरुजंघाश्र्चचरणै च त्रिभिस्त्रिभिः। तथैव हस्‍तावाचम्‍य नमस्‍कृत्‍य जलं ततः। यत्‍किंचेदमितिमंत्रेण नमस्‍येत्‍प्रयतांजलिः। अत्र विरुद्धानां मृत्‍संख्यादीनां यथासंख्यं व्यवस्‍थेति ‘‘हेमादिः’’॥

इति मृत्‍स्‍नानविधिः
मातीचें स्‍नान.
मातीच्या स्नानाचा विधि.
‘‘जमदग्‍नि’’ -‘अश्र्वक्रांते रथक्रांते’ या मंत्रानें स्‍वच्छ अशी माती सावकाश घेऊन नंतर ती दोन हातांत घेऊन ‘‘नमोमित्रस्‍य’’ या मंत्रानें सूर्यास दाखवून ‘‘गंधद्वारा’’ हा मंत्र म्‍हणून आपल्‍या अंगास चोळावी. ‘‘शिवपुराणांत’’ मन स्‍वस्‍थ ठेवून ‘‘अश्र्वक्रांते.’’ हा मंत्र म्‍हणून त्‍यानें मातीस अभिमंत्रण करून ‘‘उध्दृतासि०’’ या मंत्राने घेऊन नंतर ‘‘नमोमित्रस्‍य’’ या मंत्रानें सूर्यास दाखवून ‘‘आरुह्य’’ या मंत्रानें सर्व अंगास चोळून नंतर दोनदां आचमन करावे. ‘‘योगी’’ (माती) चोळण्याविषयी दुसरा मंत्र सांगतो-‘‘इदं विष्‍णुः’’ या मंत्रानें माती सर्व अंगांस चोळावी. ‘‘कूर्मपुराणांतल मातीचें प्रमाण’८ ओल्‍या आवळ्या एवढी माती असावी. ‘‘नारदानें क्रम सांगितला तो असा’’ आयुष्‍याची इच्छा करणार्‍या ब्राह्मणानें पूर्वी मस्‍तकास माती लावावी. संपत्तीची इच्छा करणार्‍यानें मातीनें दोन पायांची शुद्धि शुद्धि करावी. ‘‘पारस्‍कर’’ - मृत्तिका स्‍नान करणारानें मन स्‍वस्‍थ ठेऊन मस्‍तकास एकदां माती लावावी. बेंबीस दोनदां लावावी. बेंबीच्या वरच्या भागास चारदां माती लावावी. गुदास सहा वेळ, कमर, बस्‍ति (ओटी पोट), मांड्या, पोटर्‍या व पाय यांस तीनदां लावावी. नंतर दोन हातांस याप्रमाणें माती लावून दोनदां आचमन करावे. ‘‘योगी’’-अनामय (कल्‍मषरहित) अशा विष्‍णूचें स्‍मरण करीत असतां मस्‍तक इत्‍यादि सर्व अवयवांस माती व पाणी यांचा लेप करावा. कमर, ओटीपोट, मांड्या, पोटर्‍या व पाय यांस तीनदां माती व पाणी लावावे. त्‍याच प्रमाणें दोन हातांस लावून आचमन करून पुढील मंत्रानें पाण्यास नमस्‍कार करावा. तो मंत्र-हात जोडून ‘‘यत्‍किंचेद’’ हा मंत्र म्‍हणून पाण्यास नमस्‍कार करावा.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP