मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त २९ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २९ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ साधारण प्रयोगः

तत्र प्रायश्चित्तं तावत्‍स्‍त्रीरोगीवृद्धबालादिष्‍वर्धं पंचवर्षात्‍पूर्वंपादः। षोडशवर्षाधिकब्रह्मचारिणि द्विगुणें। यतौ च चतुर्गुणं।
क्षत्रविट्‌शूद्राणां पादपादहानिः निमित्तनः पादः। अनुलोमानां मातृतुल्‍यं। प्रतिलोमानां शूद्रतुल्‍यं। स्त्रीशूद्रयोः प्रधान जपोहोममंत्ररहितं।
प्रत्‍याम्‍नायाश्र्च प्राजाप्रत्‍ये धेनुरेका देया तन्मूल्‍यं वा तच्च चत्‍वारिंशन्माषास्‍तदर्धं वा हेमरूप्यं वै तावत्‌ पंचपुराणं त्रिपुराणं वा द्वात्रिंशद्गुंजः पुराणः द्वादशविप्रभो जनं। अयुतगायत्रीजपः। गायत्र्या सहस्रं तिलाहुतयः। संहितापारायणंपभ्‍द्यां तीर्थसंबंधियोजनगमनांशुष्‍ककेशस्‍य द्वादश स्‍नानानि। प्राणायामशतद्वयं। पावकेष्‍टिः पावमानीचेति।
एक स्‍मिंश्र्चांद्रायणे प्राजापत्‍यप्रत्‍याम्‍नायास्त्रिगुणाः। अतिकृच्छ्रे द्विगुणाः। त्रिंशत्‍प्राजापत्‍यसममद्बमित्‍यादि।
प्रायश्चित्ती सदायाराद्रिक्रायां तिथौ दिनांतेऽपराण्हेपि वा द्वौत्रींश्र्चतुरः पंच सप्तदश वा विप्रानाहिताग्‍नीनन्यान्वा एकमेवाथात्‍मविदं पर्षत्‍वेनोपवेश्य तेभ्‍यो गोवृषौ तन्निष्‍क्रयं वा दत्‍वा साष्‍टांगं भूमौ प्रणिपत्‍य प्रदक्षिणीकृत्‍य-सर्वे धर्मविवेक्तारो गोप्तारः सकला द्विजाः। मम देहस्‍य संशुद्धिं कुर्वंतु द्विजसत्तमाः। मयाकृतं महाघोरं ज्ञातमज्ञातकिल्‍बिषं। प्रसादः क्रियतां मह्यं शुभानुज्ञां प्रयच्छथ। पूज्‍यैः कृतपवित्रोऽहं भवेयं द्विजसत्तमैरिति मंत्राभ्‍यां प्रार्थयेत्तानाचारात्‌। ततः सभ्‍यास्‍तच्छक्तिं विचार्य संमत्‍या तत्तत्‍प्रायश्चित्तविधिवाक्‍यमुक्‍त्‍वा अशक्तस्त्रीबालवृद्धरोग्‍यादिषु अनुग्रहं कृत्‍वा सभ्‍यान्यानुवादकविप्रद्वारमुककर्मजन्यपापनाशार्थमिदं प्रायश्चित्तमशक्तौ अमुकप्रत्‍याम्‍नायेन त्‍वया कार्य तेन त्‍वं शुद्धोभविष्‍यसीति। सर्वप्रायश्चित्ते तु तव जन्मप्रभृति अद्ययावत्‌ ज्ञानाज्ञानकामाकमसकृदसकृत्‌कृतकायिकवाचिकमानसिक संसर्गिकातिपातकलघुपातकसंकलीकरणमलिनीकरणापात्रीकरणजातिभ्रंशकरप्रकीर्णकपापानां मध्ये संभावितानां नाशार्थं षडद्वमशक्तौत्र्यद्बं सार्धद्बं वा प्रायश्चित्तं त्‍वं कुर्विति अयंचोदेशो व्रतकुर्तः पुस्‍तकपूजने सभ्‍येभ्‍यश्र्च तदुद्देशेन गोदाने च कृते वारत्रयं कार्य इति संप्रदायः।
ततः कर्ता मासपक्षादि स्‍मृत्‍वा मम जन्मप्रभृत्‍यद्ययादित्‍यादिप्रायश्चित्तामित्‍यंतं पूर्वोक्तमुक्‍त्‍वा अहं करिष्‍ये इति संकल्‍प्‍य।
यानि कानि च पापानि ब्रह्महत्या समानि च।
केशानाश्रित्‍य तिष्‍ठंति तस्‍मात्‍केशान्वपाम्‍यहमिति मंत्रमुक्‍त्‍वा कक्षोपस्‍थशिखावर्ज्य क्रमेण श्मश्रूपक्षकेशानुदक्‌संस्‍थान्‌ वापयेत्‌। यतिविधवादीनां सशिखं ब्रह्महत्‍यादिष्‍वपि सशिखं सर्वांगलोम्‍ना च साधवानां व्द्यंगुलं केशाग्रछेदनं राजतत्‍पुत्रबहुश्रुत विप्राणामिच्छया वपनाभावः तदा च द्विगुणं व्रतं दक्षिणा द्विगुणा इत्‍थं वापयित्‍वायुर्बलमित्‍यादिना च दंतधावनं कृत्‍वा दश स्‍नानानि कुर्यात्‌।
तत्र भस्‍मस्‍नानं ईशानः सर्वविद्याना मिति शिरसि। तत्‍पुरुषायेति मुखे। अघोरेभ्‍योऽथ घोरेभ्‍य इति हृदि। वामदेवाय नमो गुह्ये।
सद्योजात मिति पादयोः। प्रणवेन सर्वांगे। यद्वा ॐ ईशानायनमः शिरसि। तत्‍पुरुषायनमो मुखे। अघोराय नमो हृदि।
वामदेवाय नमो गुह्ये। सद्योजाताय वै नमः पादयोः। प्रणवेन सर्वांगे। अग्‍निरिति भस्‍म। जलमिति भस्‍म। स्‍थलमिति भस्‍म।
व्योमेति भस्‍म। सर्व हवा इदं भस्‍मेति मंत्रैः क्रमाच्छिरआदिषु।
ततोगोमयमादाय त्रेधा कृत्‍वा सूर्याय प्रदर्श्याग्रमग्रं चरंतीनामोषधीनां वने वने। तासामृषभपत्‍नीनां पवित्रं कायशोधनं।
तन्मे रोगांश्र्च शोकांश्र्च नुद गोमय सर्वदेति मंत्रेणैकेन भागेन नाभेरधः। परेण नाभेरूर्ध्वमाकंठमन्येन च शिरः क्षालयेत्‌। मानस्‍तोकेति वा मंत्रः।

ततोऽश्र्वक्रांते रथक्रांते विष्‍णुक्रांते वसुधरे। मृतिके हरमे पापं यन्मया दुष्‍कृतं कृतमिति मृत्तिकामभिमंत्र्य।
उध्दृतासि वराहेण कृष्‍णेन शतबाहुना। मृत्तिके ब्रह्मदत्तासि। काश्यपेनाभिमंत्रिता। मृतिके हर तत्‍सर्वं यन्मया दुष्‍कृतं कृतं।
मृतिके देहि मे पुष्‍टिं त्‍वयि सर्व प्रतिष्‍ठितं। त्‍वया हृतेन पापेन जीवामि शरदां शतमिति ब्रह्मांडीयमंत्रेण खनित्‍वा नमो मित्रस्‍येति सूर्य प्रदर्श्य त्रिधा कृत्‍वैकस्‍माद्भागात्‌ षट्‌ चतस्‍त्त्रो वा मृदः पादयोः। जंघोरुकटिबस्‍तिषु प्रत्‍येकं चतस्रः। गुह्ये षट्‌।
उदरकुक्षिपृष्‍ठवक्षोहस्‍तकंठेषु द्वेद्वे। शिरस्‍येका। मृत्‍परिमाण मार्द्रामलकमात्रं। ततः ‘आपो अस्‍मान्मातरः’ इदं विष्‍णुरित्‍येताभ्‍यां देवस्‍यत्‍वेत्‍यनेन वा स्‍नात्‍वा

गायत्र्या गोमूत्रेण। गंधद्वारेति गोमयेन। आप्यायस्‍वेति दुग्‍धेन। दधिक्राण्व इति दघ्‍ना।
तेजोसि शुक्रमस्‍यमृतमसि धामनामासि प्रियं देवानामनाधृष्‍यं देवयजनमित्‍याज्‍येन।
देवस्‍यत्‍वेति च कुशोदकेन स्‍नायात्‌। यद्वैतानि दशापि स्‍नानान्यमंत्रकाण्येव कार्याणि।

ततो हिरण्यशृंग वरुणं प्रपद्ये तीर्थं मे देहि याचितः। यन्मया भुक्तमसाधूनां पापेभ्‍यश्र्च प्रतिग्रहः।
यन्मया मनसा वाचा कर्मणा वा दुष्‍कृतं कृतं। तन्न इंद्रो वरुणो बृहस्‍पतिः सविता च पुनंतु पुनः पुनरित्‍येताभ्‍यां तीर्थं प्रार्थ्य ॐ नमो नारायणायेत्‍यष्‍टाक्षरेण तीर्थं प्रकल्‍प्‍य ॐ भूर्भुवः स्‍वरिति त्रिराचम्‍य सकृन्निमज्‍ज्‍यापः प्रवत इत्‍येतया व्याहृतिभिर्गायत्र्या भिमंत्र्यापामार्गदूर्वाकुशैः कांडादिति द्वाभ्‍यां प्रणवव्याहृति गायत्रीआपोहिष्‍ठादिभिर्मार्जयित्‍वांतर्जले ॠतंचेति तृचं जपित्‍वा त्रिर्निमज्‍जय देवर्षिपितृन्संतर्प्य शुष्‍कं वासो धृत्‍वा त्र्यधिकैर्विप्रैरावाहनाग्‍नौकरणस्‍वधावाचनरहितं पार्वणविधिना श्राद्धं कुर्यात्‌।
तत्र सर्वेष्‍वपि विप्रेषु विष्‍णोरेव पूजा

तत एकां गां हिरण्यं च दत्‍वा व्याहृतिभिः शलाग्‍नौ अष्‍टाष्‍टाविंशतिसंख्ययाज्‍यं क्रमादग्‍निवायुसूर्यप्रजापतिदैवत्‍यं हुत्‍वा ब्रह्मकूर्चहोममपि कुर्यादाचारात्‌। तत्र ताम्रे पालाशे पाद्मे वा पात्रेऽरुग्‍णायाः कृष्‍णाया वा गोमूत्रं पलमितमष्‍टामाषमितं वा गायत्र्यादाय श्र्वेताया अंगुष्‍टार्धमितं षोडशमाषमितं वा गोमयं गंधद्वारामिति ताम्राया हेमवर्णाया वा पयः सप्तपलं द्वादशमाषमितं गोमयाष्‍टगुणं गोमूत्रत्रिगुणं वाऽऽप्यायस्‍वेतिरक्तायाः कृष्‍णाया वा दधि त्रिपलं दशमाषमितं गोमयात्‍पंचगुणं गोमूत्राद्द्विगुणं वा दधिक्राण्व इति कपिलाया नीलाया धृतमेकपलमष्‍टमाषमितं गोमयाच्चतुर्गुणं वा तेजोसिशुक्रमिति कुभोदकं च पलमितं चतुर्माषमितंवा देवस्‍येति गृण्हीयात्‌। गोमूत्रादि कापिलं वा ग्राह्यं। अलाभे गव्यमात्रं एतन्मंत्रांते गण्हामीति वाक्‍यशेषः।
तत आपोहिष्‍ठेति हस्‍तेनालोड्य मानस्‍तोक इति यज्ञियकाष्‍ठेन निर्मथ्‍य सप्तावरैः कुशैः त्रिभिः पलाशपत्रैर्वा जुहुयात्‌ ‘‘मत्रास्‍तु’’ ॐ इरावती धेनुमती हि भूतं पृथिव्या इदं न ममेति त्‍यागः। इदं विष्‍णुः विष्‍णव इदं। मानस्‍तोके० रुद्राय०। शन्नोदेवी० अभ्‍द्यः।
अग्‍नये स्‍वाहा। सोमाय स्‍वाहा इंद्रवते स्‍वाहा। गायत्र्या सवित्रे०।
प्रजापते नत्‍वदेतान्यन्यो विश्र्वा० ॐ प्रजापतये स्‍वाहा प्रजापतय इदं न मम। अयं च ब्रह्मकूर्चहोमोंऽते प्रमाणवान्‌।

ततः खिष्‍टकृदादिहोमशेषं समाप्य तारकोदये होमावशिष्‍टं पंचगव्यं प्रणवेनालोढ्य प्रणवेन निर्मथ्‍य प्रणवेन पीत्‍वा सभ्‍योपदिष्‍टं संकल्‍पितं प्रायश्चित्तं साक्षाद्यथासंभवं प्रत्‍याम्‍नायेन वा कृत्‍वा पूर्मवव्द्याहृतिभिराज्‍यहोमं ब्रह्मकूर्चहोमं विष्‍णुश्राद्धं च कृत्‍वा गोहिरण्यादि दक्षिणां च दत्‍वा शिरसा तृणभारमानीय गोभ्‍यो ताभिर्भक्षिते शुद्धयेत

इतिश्रीमीमांसकशंकरभट्टात्‍मजभट्टनीलकंठकृते भास्‍करे प्रायश्चित्तमयूखे साधारणः प्रायश्चित्तप्रयोगः

प्रायश्चित्ताचा साधारण प्रयोग.
प्रायश्चित्ताचा निर्णय.
स्त्री, रोगी, म्‍हातारा व बाळक इत्‍यादिकांस प्रायश्चित्त अर्धे सांगावे. पांच वर्षांच्या पूर्वी एक चतुर्थांश सांगावे. सोळा वर्षांहून अधिक वयाच्या ब्रह्मचार्‍यास दुप्पट, यतीस चौपट सांगावे. क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांस क्रमानें चतुर्थांशानें कमी (प्रायश्चित्त) असावे. निमित्तीस चतुर्थांश, अनुलोमांस मातेप्रमाणें (माता ज्‍या वर्णाची असेल त्‍या वर्णास जें प्रायश्चित्त सांगितले असेल ते), प्रतिलोमांस शूद्राप्रमाणें प्रायश्चित्त सांगावे. स्त्री व शूद्र यांचे प्रायश्चित्त प्रधानजप, होम व मंत्र यांनी रहित असावे.

प्रायश्चित्ताचे प्रतिनिधि.
‘‘प्रत्‍याम्‍नाय’’---प्राजापत्‍याचा प्रत्‍याम्‍नाय (प्रतिनिधि) एक गाय द्यावी, किंवा तिची किंमत द्यावी. ती किंमत चाळीस मासे किंवा वीस मासे सोनें किंवा एवढेंच रूपें द्यावे. पांच पुराण किंवा तीन पुराण एवढें रूपें द्यावें, बत्तीस गुजांचा एक पुराण होतो. किंवा बारा ब्राह्मणांस भोजन द्यावें, किंवा गायत्रीचा दहा हजार जप करावा, अथवा गायत्रीमंत्रानें हजारवेळा तिळांचा होम करावा. संहितेचें पारायण किंवा पायांनी तीर्थाच्या उद्देशानें एक योजन गमन करावे. ज्‍याचें केस विरळ असतील त्‍यानें बारा स्‍नानें करावी. दोनशे प्राणायाम, पावकेष्‍टि व पावमानी याप्रमाणें प्राजापत्‍याचे प्रतिनिधि होत. एका चांद्रायणांत प्राजापत्त्याचा तिप्पट प्रत्‍यम्‍नाय जाणावे. अतिकृच्छ्रांत दुप्पट (प्रत्‍याम्‍नाय) समजावे. तीस प्राजापत्‍यांचे एक अद्ब (वर्ष) होय.

प्रायश्चित्ताचा दिवस, काळ व कर्तव्यविधि.
प्रायश्चित्त करणारानें आचार संपन्न राहून ज्‍या दिवशी रिक्ता (४।९।१४) तिथि असेल त्‍या दिवशी संध्याकाळी किंवा अपराण्हांत दोन, तीन, चार, पाच, सात किंवा दहा असे अग्‍निहोत्री ब्राह्मण, किंवा दुसरे ब्राह्मण अथवा आत्‍मवेत्ता असा एकटाच ब्राह्मण त्‍यास सभासद मानून त्‍यांस एक गाय व बैल किंवा त्‍यांच्या किंमती एवढें द्रव्य देऊन जमिनीवर साष्‍टांग नमस्‍कार घालून प्रदक्षिणा करून ‘‘सर्वे धर्मविवेक्तारो गोप्तारः सकला द्विजाः। मम देहस्‍य संशुद्धिं कुर्वंतु द्विजसत्तमाः। मया कृतं महाघोरं ज्ञातमज्ञातकिल्‍बिष। प्रसादः क्रियतां मह्यं शुभानुज्ञां प्रयच्छथ। पूज्‍यैः कृतपवित्रोऽहं भवेयं द्विजसत्तमैः’’ या दोन मंत्रांनीं आचाराप्रमाणें त्‍यांची प्रार्थना करावी. नंतर सभ्‍यांनी (सभासदांनी) त्‍याच्या शक्तीचा विचार करून सर्वांच्या संमतीनें त्‍या त्‍या प्रायश्चित्ताचें विविवाक्‍य सांगावे. अशक्त, स्त्री, बाळक, वृद्ध व रोगी यांच्यावर अनुग्रह करावा. नंतर सभासदांवाचून दुसर्‍या अनुवादक ब्राह्मणाकडून ‘‘अमुककर्मजन्यपापनाशार्थमिदं प्रायश्चित्तं त्‍वया कार्यं तेन त्‍वं शुद्धो भविष्‍यसि’’ असें प्रायश्चित्त करणारास सांगवावे. जर प्रायश्चित्त करण्यास शक्ति नसेल तर ---‘‘अमुक प्रत्‍यम्‍नायेन त्‍वया कार्यं तेन त्‍वं शुद्धो भविष्‍यसि’’ असें सांगवावें. सर्व प्रायश्चित्तांत तरअनुवादकाकडून प्रायश्चित्त करणारास ‘‘तव जन्मप्रभृति अद्ययावत्‌ ज्ञानाज्ञानकामाकामसदकृसकृत्‌ कायिकवाचिकमानसिकसांसर्गिकातिपातकलघुपातकसंकलीकरणमलिनीकरणापात्रीकरणजातिभ्रंशकरप्रकीर्णकपापानांमध्ये संभावितांना नाशार्थं षडद्बं’’ करण्यास सामर्थ्य नसेल तर ‘‘त्र्यद्बं’’ असें लावावें. तें (त्र्यद्ब) करण्यास सामर्थ्य नसलें तर ‘‘सार्धाद्बं’’ असें लावावें. नंतर याच्या पुढें ‘‘प्रायश्चित्तं त्‍वं कुरु’’ याप्रमाणें सांगवावे. हा उपदेश प्रायश्चित्त करणारास पुस्‍तकाच्या पूजेच्या वेळी व सभासदांस प्रायश्चित्ताच्या उद्देशानें गाय देण्याचें वेळी तीनदा करावा असा सांप्रदाय आहे.
नंतर प्रायश्चित्त करणारानें मास पक्ष वगैरेंचा उच्चार करून ‘‘मम जन्मप्रभृतिअद्य यावत्‌ पासून---‘‘प्रायश्चित्त’’ पावेतों पूर्वीं सांगितल्‍याप्रमाणें म्‍हणून पुढें ‘‘अहं करिष्‍ये’’ असें म्‍हणून याप्रमाणें संकल्‍प केल्‍यानंतर ‘‘यानि कानि च पापानि ब्रह्महत्‍यासमानि च। केशानाश्रित्‍य तिष्‍ठंति तस्‍मात्‍केशान्वपाम्‍यहं’’ हा मंत्र म्‍हणून दोन बगला, उपस्‍थ (इंद्रिय) व शेंडी यांवाचून क्रमानें श्मश्रु (दाढी), उपपक्ष (दोन कानाजवळचे दोन प्रदेश) व डोकी यांवरील केस हे उदक्‌संस्‍थ असे काढवावे. संन्याशी, विधवा वगैरेंचा शेंडीसकट वपन करवावे. ब्रह्महत्त्यादिकांच्या ठिकाणींही शेंडीसकट शरीरावरील सर्व केसांचे वपन करवावें. ज्‍यांस पति आहे अशा स्त्रियांस केसांची टोकें दोन अंगुळे पर्यंत कापवावी. राजा, राजपुत्र व बहुश्रुत ब्राह्मण यांची इच्छा वपन करविण्याची नसेल तर त्‍यांनी दुप्पट प्रायश्चित्त करून दुप्पट दक्षिणा द्यावी. याप्रमाणें वपन करवून ‘‘आयुर्बलं’’ इत्‍यादि मंत्रानें दंतधावन करून दहा स्‍नानें करावी.

भस्‍माचे स्‍नानाचा विधि.
त्‍यांत पूर्वीं भस्‍माचें स्‍नान---भस्‍म घेऊन ‘‘ईशानः सर्व विद्याना०’’ असा मंत्र म्‍हणून डोकीस लावावें. ‘‘तत्‍पुरुषाय०’’ हा मंत्र म्‍हणून तोंडास लावावें. ‘‘अघोरेभ्‍योथ घोरेभ्‍य०’’ याने हृदयास ‘‘वामदेवाय नमः’’ यानें गुह्यास ‘‘सद्योजातं’’ यानें दोन पायांस व प्रणवानें सर्वांगास लावावें. किंवा ‘‘ईशानाय नमः’’ असें म्‍हणून डोकीस लावावें. ‘‘तत्‍पुरुषाय नमः’’ यानें मुखास, ‘‘अघोराय नमः’’ याने हृदयास, ‘‘वामदेवाय नमः’’ याने गुह्यास, ‘‘सद्यो जाताय वै नमः’’ यानें दोन पायांस व ‘‘प्रणवानें’’ सर्वांगास लावावें. किंवा ‘‘अग्‍निरिति भस्‍म’’ ‘‘जलमिति भस्‍म’’ ‘‘स्‍थलमिति भस्‍म’’ ‘‘व्योमेति भस्‍म’’ ‘‘सर्व ँ हवा इदं भस्‍म’’ या मंत्रांनी मस्‍तक इत्‍यादिकांस भस्‍म लावावें.

शेणाच्या स्‍नानाचा विधि.
नंतर शेण घेऊन त्‍याचे तीन भाग करून सूर्यास दाखवून ‘‘अग्रमग्रं चरंतीनामोषधीनां वने वने।
तासामृषभपत्‍नीनां पवित्रं कायशोधनं। तन्मे रोगांश्र्च शोकांश्र्च नुद गोमय सर्वदा’’ यामंत्रानें त्‍या तीन भागांपैकी एक भाग बेंबीच्या खालच्या भागास लावावा. दुसरा भाग बेंबी पासून गळ्या पर्यंत लावावा तिसरा भाग मस्‍तकास लावावा. अथवा ‘‘मानस्‍तोके’’ या मंत्रानें शेणाचें स्‍नान करावे.

मातीच्या स्‍नानाचा विधि.
नंतर ‘‘अश्र्वक्रांते रथक्रांते विष्‍णुक्रांते वसुधरे। मृत्तिके हरमे पापं यन्मया दुष्‍यकृतं कृतं’’ या मंत्राने मातीचें अभिमंत्रण करून उध्दृतासि वराहेण कृष्‍णेन शतबाहुना। मृत्तिके ब्रह्मदत्तासि काश्यपेनाभिमंत्रिता। मृत्तिके हर तत्‍सर्वं यन्मया दुष्‍कृतं कृतं। मृत्तिके देहिमे पृष्‍टि त्‍वयि सर्व प्रतिष्‍ठितं। त्‍वया हृतेन पापेन जीवामि शरदां शत’’ या ‘‘ब्रह्मांडापुराणांत’’ सांगितलेल्‍या मंत्रानें माती खणून ‘‘नमो मित्रस्‍य’’ याने सूर्यास दाखवून तिचे तीन भाग करावे. नंतर एका भागांतून सहा वेळ किंवा चार वेळ माती घेऊन दोन पायांस लावावी. पोटर्‍या, गुडघे,  कमर, व ओटीपोटी या प्रत्‍येकास चारदा माती लावावी. गुह्यास (इंद्रियास) सहादा, पोट, कुशी, पाठ, छाती, हात व गळा यांस दोन दोन वेळ व डोकीस एकदा माती लावावी. ओल्‍या आवळ्या एवढें मातीचें प्रमाण असावें. नंतर ‘‘आपो अस्‍मान्मातरः’’ आपो अस्‍मान्मातरः’’ ‘‘इदं विष्‍णुः’’ या दोन मंत्रांनी किंवा ‘‘देवस्‍य त्‍वा’’ या मंत्रानें स्‍नान करावे.

पंचगव्यांचे स्‍नान.
गायत्रीमंत्र म्‍हणून गोमूचानें ‘‘गंधद्वारा’’ या मंत्रानें शेणानें ‘‘आप्यायस्‍व’’ यानें दुधानें, ‘‘दधिक्राव्णः’’ यानें दह्यानें ‘‘तेजोसि शुक्रमस्‍यमृतमसि धाम नामासि प्रियं देवानामनाधृष्‍यं देवयजनं’’ यानें तुपानें आणि ‘‘देवस्‍यत्‍वा’’ यानें दर्भांनी मिश्र अशा पाण्यानें स्‍नान करावें, अथवा ही दहाही स्‍नानें मंत्रां वाचून करावी.

स्‍नानाचा विधि व विष्‍णुश्राद्ध.
नंतर ‘‘हरिण्यश्रृंगं वरुणं प्रपद्ये तीर्थं मे देहि याचितः। यन्मया भुक्तमसाधूनां पापेभ्‍यश्र्च प्रतिग्रहः। यन्मया मनसा वाचा कर्मणा वा दृष्‍कृतं कृतं। तन्न इंद्रो वरुणो बृहस्‍पतिः सविता च पुनंतु पुनः पुनः’’ या मंत्रांनीं तीर्थाची प्रार्थना करून ‘‘ॐ नमो नारायणाय’’ या आठ अक्षरी मंत्रानें तीर्थाची कल्‍पना करून ‘‘ॐ भूर्भुवः स्‍वः’’ या व्याहृतींनी तीनदा आचमन करून एकदा पाण्यांत बुडी मारून नंतर ‘‘आपः प्रवत’’ या ॠचेनें व्याहृतींनीं व गायत्री मंत्रानें पाण्याचें अभिमंत्रण करून आघाडा, दूर्वा व दर्भ यांच्या योगानें ‘‘कांडात्‌’’ या दोन ॠचांनी प्रणव, व्याहृति, गायत्रीमंत्र, आपोहिष्‍ठा इत्‍यादिकांनी मार्जन करून पाण्याच्या आंत ‘‘ॠतं च०’’ या तीन ॠचा म्‍हणून तीनदा पाण्यांत बुडी मारून स्‍नान केल्‍यावर देव, ॠषि व पितर यांचे तर्पण करून वाळलेलें वस्त्र नेसावें. नंतर तिघांपेक्षा अधिक ब्राह्मण बोलावून आवाहन, अग्‍नौकरण, व स्‍वधावाचन यां वाचून पार्वणविधीनें श्राद्ध करावें. त्‍या श्राद्धांत सर्वही ब्राह्मणांच्या ठिकाणीं विष्‍णुचीच पूजा करावी.

विष्‍णुश्राद्धा नंतर करावयाचा होम, ब्रह्मकूर्च करणे व त्‍याचा होम.
नंतर एक गाय व सोनें देऊन व्याहृतींनी शालाग्‍नीवर प्रत्‍येकीं आठ किंवा अठ्ठावीस वेळ क्रमानें अग्‍नि, वायु, सूर्य व प्रजापति या दैवतांच्या उद्देशानें तुपाचा होम करून ब्रह्मकूर्चाचा होमही आपल्‍या आचाराप्रमाणें करावा.
ब्रह्मकूर्च करणें.---तांब्‍याचे भांडे किंवा पळसाचें किंवा कमळाचें पात्र (द्रोण) घेऊन त्‍यांत तांबड्या किंवा काळ्या गाईचें गोमूत्र एक पळा एवढें किंवा आठ मासे गायत्री मंत्राने घ्‍यावे. नंतर पांढर्‍या गाईचें अध्या्र अंगठ्या एवढें किंवा सोळा माशा एवढें शेण ‘‘गंधद्वारा’’ या मंत्रानें घ्‍यावे. नंतर तांबड्या किंवा पिवळ्या गाईचे दुध सात पळें, बारा मासे, शेणाच्या आठपट किंवा गोमूत्राच्या तिप्पट ‘‘आप्यायस्‍व’’ या मंत्रानें घ्‍यावें. नंतर तांबड्या किंवा काळ्या गाईचें दहि तीन पळें, दहा मासे, शेणापेक्षां पांचपट किंवा गोमूत्राच्या दुप्पट ‘‘दधिक्राव्णः’’ या मंत्रानें घ्‍यावें. नंतर कपिल किंवा निळ्या रंगाच्या गाईचें तूप एक पळ, आठ मासे किंवा शेणाच्या चौपट ‘‘तोजोसि शुक्रं’’ या मंत्रानें घ्‍यावें. अथवा गोमूत्र वगैरे कपिला गाईचें घ्‍यावें. तें न मिळाल्‍यास साधारण गाईचेंच घ्‍यावें. या मंत्राच्या शेवटी ‘‘गृण्हामि’’ असें पद लावावें. नंतर ‘‘आपोहिष्‍ठा’’ यानें हातानें कालवून ‘‘मानस्‍तोक’’ या मंत्रानें समिधेनें ढवळून सातांपेक्षा अधिक अशा दर्भांनी किंवा तीन पळसांच्या पत्रांनी त्‍याचा होम पुढील मंत्रांनी करावा. ते मंत्र ‘‘ॐ इरावती धेनुमतीहि भूतं’’ हा मंत्र म्‍हणून शेवटी ‘‘पृथिव्या इदं नमम’’ म्‍हणून अग्‍नींत टाकावें. याप्रमाणें ‘‘इदं विष्‍णुः’’ ‘‘विष्‍णव इदं न मम’’। मानस्‍तोके० रुद्राय इदं न मम। शन्नो देवी० अभ्‍द्यः इदं न मम। अग्‍नये स्‍वाहा। सोमाय स्‍वाहा। इंदवते स्‍वाहा। गायत्री मंत्र म्‍हणून सवित्रे स्‍वाहा। प्रजापते नत्‍वदेतान्यन्यो विश्र्वा० प्रजापतये स्‍वाहा प्रजापतय इदं न मम। हा ब्रह्मकूर्च होम शेवटी करावा असें प्रमाण आहे.

ब्रह्मकूर्च होमानंतर करावयाचें कृत्‍य.
नंतर ‘‘स्‍विष्‍टकृत्‌’’ इत्‍यादि होमशेषाची समाप्ति करून नक्षत्रें उगवली म्‍हणजे होम करून शिल्‍लक राहिलेलें पंचगव्य प्रणवानें खालवर करून व प्रणवानें ढवळून प्रणवानें प्यावे. नंतर सभासदांनी सांगितलेलें संकल्‍पित केलेलें प्रायश्चित्त प्रत्‍यक्ष किंवा जसा संभव असेल त्‍याप्रमाणें प्रत्‍याम्‍नायानें करून नंतर पूर्वी सांगितल्‍याप्रमाणें व्याहृतींनी तुपाचा होम, ब्रह्मकूर्चाचा होम व विष्‍णुश्राद्ध करून गाय, सोनें वगैरे दक्षिणा देऊन डोकीवर घासाचा भारा आणून तो गाईंस घालावा जर त्‍यांनी खाल्‍ला तर तो (प्रायश्चित्त करणारा) शुद्ध होईल.

याप्रमाणें मीमांसक शंकरभट्टांचा पुत्र नीलकंठ यांनी केलेल्‍या भास्‍करांत प्रायश्चित्तमयूखांत साधारण प्रायश्चित्ताचा प्रयोग सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP