मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १|भक्तवत्सलता २| अभंग ६६ ते ७० भक्तवत्सलता २ अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५१ अभंग ५२ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७२ अभंग ७३ ते ७७ भक्तवत्सलता - अभंग ६६ ते ७० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग ६६ ते ७० Translation - भाषांतर ६६. जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुम्हीं संती ॥१॥अहो ज्ञानदेवा असावें तुम्हा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥माझी मज आण सांगतें प्रमाण । सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥जनीव हो बोल स्वानंदाचे डोल । स्वात्ममुखीं बोल दुणावती ॥४॥शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई । अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥हांसोनी ज्ञानदेवें पिटियेली टाळी । जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥६७. जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी ॥१॥नित्य नेमाची लाखोली । गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥मज भरंवसा नामाचा । गजर नामाच्या दासीचा ॥३॥विटेवरी ब्रम्हा दिसे । जनी त्याला पाहतसे ॥४॥६८. सोंग सोंगा जाय । नवल जाउनी हांसताहे ॥१॥हांयोनियां बडवी टिरी । कोण नाठवी हे परी ॥२॥हा नाठवी आपणा । म्हणे जनी भुललें जाणा ॥३॥६९. देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥१॥तया निद्रें जे पहुडले । भवजागृति नाहीं आले ॥२॥ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥३॥त्या एकीं एक होतां । दासी जनी कैंचि आतां ॥४॥७०. एके रात्रींचे समयीं । देव आले लवलहीं ॥१॥सुखशेजे पहुडले । जनीसवें गुज बोले ॥२॥गुज बोलतां बोलतां । निद्रा आली अवचिता ॥३॥उठा उठा चक्रपाणी । उजाडलें म्हणे जनी ॥४॥ Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP