मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १|भक्तवत्सलता २| अभंग ५६ ते ६० भक्तवत्सलता २ अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५१ अभंग ५२ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७२ अभंग ७३ ते ७७ भक्तवत्सलता - अभंग ५६ ते ६० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग ५६ ते ६० Translation - भाषांतर ५६. माझा नामा मज देईं । जीव देईन तुझे पायीं ॥१॥पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया बाळा केलें ॥२॥तें गा न चले मजपाशीं । दे गा माझ्या नामयासी ॥३॥तुझ्यासंगें जे जे गेले । ते त्वां जितेचि मारीले ॥४॥विठ्ठल म्हणे गोणाबाई । नामा तुझा घेवोनी जाईं ॥५॥हातीं धरोनियां आली । दासी जनी आनंदली ॥६॥५७. धरा सतराचा हो मेळा । कारखाना झाला गोळा । वाजविती आपुल्या कळा । प्रेमबळा आनंदें ॥१॥झडतो नामाचा चौघडा । ब्रम्ही ब्रम्हारूपीचा हुडा । संत ऐकताती कोडां । प्रेमबळा आनंदें ॥२॥नामदामा दोनी काळू । नामा विठा दमामे पैलू । चौघी सुना चारी हेलू । कडकडां बोल उमटती ॥३॥गोंदा म्हादा करणी करी । नादें दुमदुमली पंढरी । आऊबाई तुतारी । मंजुळस्वर उमटती ॥४॥गोणाबाई नोबतपल्ला । नाद अंबरीं कोंदला । राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळ स्वर उमटला ॥५॥जनाबाई घडयाळ मोगरीं । घटका भरतां टोला मारी । काळ व्यर्थचि गेला तरी । गजर करी आनंदें ॥६॥५८. विठोबा चला मंदिरात । गस्त हिंडती बाजारांत ॥१॥रांगोळी घातली गुलालाची । शेज म्यां केली पुष्पांची ॥२॥समया जळती अर्ध रात्नीं । गळ्यांमध्यें माळ मोत्यांची ॥३॥नामदेवाला सांपडलें माणिक । घेतलें जनीनें हातांत ॥४॥घेउनी गेली राउळांत । गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥५९. लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा ॥१॥आदि ठाणें पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर ॥२॥गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देईं मला ॥३॥शुद्ध देखोनियां भाव । पोटीं आले नामदेव ॥४॥दामाशेटी हरुषला । दासी जनीस आनंद झाला ॥५॥६०. नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ॥१॥आंगडें टोपडें पेहरण । शेला मुंडासा घेऊन ॥२॥माझ्या जीवीच्या जीवना । नाम ठेवी नारायणा ॥३॥जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवूं सांगा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP