मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
पूर्ण विज्ञान

वेदांत काव्यलहरी - पूर्ण विज्ञान

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


पूर्ण विज्ञान

पद --- (नृप ममता रामावरती)

जें तत्व मनाला पटलें । पाहिजे वोललें केलें । तरि खरें
काया वाचा मन सगळें । एकत्र पाहिजे केलें तरि खरें ॥
चाल :--- यांतुनी, एक वगळुनी, चालता कुणी ।
तयाचे मळलें, विज्ञान पूर्ण नच झाले हें खरें ॥१॥
==
कां मन आवरती

पद --- (जाई परतोनी०)

कां मन आवरती -- न कळे ॥धृ०॥
चाल :--- जलधीवरि जलतरंग ज्यापरी, ।
अग्नीवरती ज्वाला उठती ।
निजरूपीं मन त्यापरि जाणा
सहज उठे स्फूर्ती ॥१॥
ज्योतिविण तो दीप, प्रभेविण सूर्य
कोठूनी दिसेल जगती ।
स्फुर्तीविण तैं कोठुनि आत्मा ॥
मिन्न दोन नसती ॥२॥
==
सद्‌गुरूचे उपकार

पद --- (आदेश गुरुराज)

साष्टांग प्रणिपात । माझा गुरुनाथ ॥धृ०॥
चाल :--- अज्ञान तम घोर । त्वां नाशिले थोर ।
हे फार उपकार । फेडूं कसे तात ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP