TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
परोक्षज्ञानाची महती

वेदांत काव्यलहरी - परोक्षज्ञानाची महती

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


परोक्षज्ञानाची महती
आत्मा अपरोक्ष असे सर्वांना, नित्य त्यांत ते रमती ॥
नाहीं परोक्ष त्याचें ज्ञान, म्हणुनि नेणतात मंदमती ॥१॥
परसांत अमृतवल्ली, दिनरात्रीं पाहतो परी नेणें ॥
शाब्दिक ज्ञान तयाचें नाहीं, शोधार्थ जातसें तेणें ॥२॥
शाब्दिक परोक्षज्ञानें, वृत्ति प्रथम पाहिजेच तरबेज ॥
त्यावांचुनि जरि भेटे आत्मा प्रत्यक्ष ना पडे उमज ॥३॥
बाह्म पदार्थांचें, कैं होई वृत्तीस ज्ञान, ती प्रक्रिया ॥
समजे तरी, कळे मग आत्मा, अज्ञान जाउनी विलय ॥४॥
प्रत्येक वस्तु असते अच्छादित, जाण दोन पटलानें ॥
वृत्तीव्याप्तीत निघे एक, दुजे चितूप्रकाश जे तेणें ॥५॥
घटज्ञानव्हावयासी, वृत्तीची आणि चि‍त्‌प्रकाशाची ॥
परि आत्मज्ञानासी आहे ती गरज फक्त बुद्धीची ॥६॥
जैशि अंधारांतील वस्तू बघण्यास दीप नेत्राची ॥
लागे गरज, परंतु दीप पहायास फक्त नयनाची ॥७॥
कारण स्वयंप्रकाशी दीप, इतर वस्तुजात जड जाण ॥
याकारण जड वस्तूज्ञानासी, दीप नेत्र हे दोन ॥८॥
व्यापी घटास बुद्धि, नाशी अज्ञान पटल जें प्रथम ॥
बुद्धिस्थ चिदाभासें घट स्फुरणें, हें दुजे असें काम ॥९॥
कारण स्वयंप्रकाशी घट नोहे, स्फुरवि तें न अपणासी ॥
बुद्धिस्थ निदाभासावीण, स्फुरद्रूप जड न कोणासी ॥१०॥
व्याप्ति जशी वृत्तीची, फलव्याप्ति पाहिजे जड-ज्ञान ॥
बुद्धिस्थ चिदाभासा म्हणती फल, तो नको स्वरुप ज्ञाना ॥११॥
आत्मा स्वयंप्रकाशी दीप जसा, त्या नकोच फळव्याप्ती ॥
परि आत्मज्ञानासी, उपयोगी शुद्ध बुद्धिची व्याप्ती ॥१२॥
बुद्धी शुद्ध म्हणावी, जी ऐके गुरुमुखें महावाक्य ॥
असल्याच बुद्धिनयनें, आत्म्यासी जाणणें असे शक्य ॥१३॥
शाब्दिक ज्ञान निराळें, अनुभव तो वेगळा बहू म्हणती ॥
हेही शब्दचि त्यांचें, तोंडा येईल तेच बडबडती ॥१४॥
अपणाहून निराळ्या वस्तूविषयींच संभवे ऐसे ॥
अज्ञाननाश करण्या, शद्धाची फक्त एक गरज असे ॥१५॥
जैसे दहा प्रवासी, मोजति आपणास सोडूनि, दशम ॥
मेला एक म्हणोनी रडती, शद्वेच जाहलें काम ॥१६॥
निभ्रांत ज्ञान झालें गुरुशब्दें ज्यास, “कोण मी आहे” ॥
अपरोक्ष ज्ञान त्याचे अनुभवही तोच कीं असें पाहे ॥१७॥
यास्तव अनुभव अपुला आपणासी व्हावया दुजें कांहीं ॥
साधन नलगे ‘शब्द्रें ठसणें निजरूप, कार्य हें पाहीं ॥१८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T23:08:30.1500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

make an assertion

  • ठासून सांगणे 
  • ठाम विधान करणे 
RANDOM WORD

Did you know?

How do I contact you?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.