मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
तुकाराम

वेदांत काव्यलहरी - तुकाराम

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


तुकया सदेह गेला वैकुंठीं, बैसुनी विमानांत ॥
वाच्यार्थ असे परि हा, भाविकजन यापरी जरी वदत ॥१॥
धाडी विमान विष्णू एका तुकयास, तोच कां मुक्त ॥
आजवरि तुकयाहुनि, विष्णुचें जाहले न कां भक्त ॥२॥
संत मनोमार्गगतीं, श्रीपति येणेंत पंथ आकळिती ॥
ज्ञानेश हरीपाठीं, निजग्रंथीं रामदासही वदती ॥३॥
हा गुप्त पंथ योगी जाणे, इतरा कळें न गुह्यार्थ ॥
आकाशामार्ग क्रमिती, तुकयाचें हें विमान कीं सार्थ ॥४॥
मार्ग विहंगम म्हणती, कुणि यासी ज्ञानयोगही म्हणती ॥
देहांत असुनि झाले मुक्त, क्रमुनि पंथ संत हा, जगतीं ॥५॥
या देहीं या डोळा, मुक्तीचा सोहळा जरी बघती ॥
गेले सदेह तेची वैकुंठीं, हीच ती विमानगती ॥६॥
माझें मरण स्वता मी डोळ्यानें पाहिलें, तुकाच म्हणे ॥
देहास मरण, आत्मा शाश्चत मी, यापरीच तो जाणे ॥७॥
देहांत असुनि मरणें, वैकुंठीं हें सदेहची जाणें ॥
वैकुंठ पीठ आत्मा, त्यासी निजधाम श्रीहरीच म्हणें ॥
यापरि जे जें गेले निजधामी, देहप्राण असतांना ॥८॥
परतुनि कधिं नच आले; तुकयासम सर्व संतही जाणा ॥९॥
गेले निजधामीं ते आले नाहीं कसे, फिरोन पुन्हां ॥
“मी ब्रम्ह” जाणल्यावरि, परतुनि ते देहभाव घेती ना ॥१०॥
मी देह नव्हे, “निश्चित आत्मा मी नित्यमुक्त” हें कळतां ॥
शतवेळ येइना कां जन्म पुन्हा, काय त्यास भय ताता ॥११॥
विसर तुझा नच व्हावा, देवा मज हेंच देइगा दान ॥
तुकया म्हणे सुखें मग, येवो मज गर्भवास चिता न ॥१२॥
मोक्षदशा म्हणजेची, द्दढ निश्चय ज्यास आत्माबुद्धी ती ॥
“अहमात्मा” या देहीं विसर कधींही पडो न, ती मुक्ती ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP