TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
दिसणें म्हणजे कळणें

वेदांत काव्यलहरी - दिसणें म्हणजे कळणें

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


दिसणें म्हणजे कळणें
अंबा डोळ्यास दिसे, तैसा नाकास आणि कानाला ॥
स्पर्शास कळे अंबा, अनुभव येई तसाच जिंव्हेला ॥१॥
ज्ञानेंद्रिय पंचक हे थकलें, मन तेथ देखणा होई ॥
लागे भूक दुखे वा पोट, मनालाच कळतसे पाहीं ॥२॥
संकल्प विकल्पात्मक चंचल मन त्यांसही कळेना ती ॥
वस्तू बुद्धीस कळे, बुद्धीलाही कळे न कीं प्रीती ॥३॥
अंत:करणास कळे, भक्ती वा प्रेम, जें न बुद्धीला ॥
सुखदु:ख लेकराचें मातृह्रदय जाणतें शिशूलीला ॥४॥
प्रेमाचा सागर जो ईश्वर, येथेंच कळतसे जाण ॥
हे कळणें सुद्ध नव्हे, म्हणती यांसीच कीं शबलज्ञान ॥५॥
अंत:करणउपाधी सुटतां, हें ज्ञान ज्ञानमात्र स्वयं ॥
पाही स्वतास आपण निरुपाधिक शुद्ध स्वरुप ज्ञान अयं ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T23:18:37.1970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लुटुलुटु

  • क्रि.वि. लुटलुट पहा . 
  • क्रि.वि. चटपट ; चुटुचुटु ; झपझप जवळ जवळ परंतु हलके टाकलेल्या पावलांच्या अवाजाचा दर्शक शब्द . [ ध्व . ] 
RANDOM WORD

Did you know?

प्रासंगिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site