TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
खरा ब्राह्मण

वेदांत काव्यलहरी - खरा ब्राह्मण

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


खरा ब्राह्मण
ब्राह्मण त्यांस म्हणावें, जो जाणे ब्रह्म इतर ते सारे ॥
जन्मांत शूद्र असती वर्णानें. उच्च होति संस्कारें ॥१॥
ब्राह्मण सद्‌गुरुबोधापोटीं उपजे, अयोनिसंभव रे ॥
योनीसंभव तितुके समजावे, खास शूद्र ते सारे ॥२॥
जातीनें ब्राह्मण करि जरि ब्राह्मण कमीस, काय फल त्याला ॥३॥
ब्राह्मण खरा जरी जो, “मम दैवत” त्यास म्हणति भगवंत ॥
जातीनें ब्राह्मण जों “मम दैवत,” त्यास कोणरे वदत ॥५॥
मूळ नदीचें तैसें कूळ ऋषीचें, बघुं नये कोणीं ॥
कारण उगम तयांचा क्षुद्र; परी मान्य जाहले भुवनीं ॥६॥
“आम्हीं वसिष्ठ गोत्री” ब्राह्मण जातींत म्हणति अभिमानें ॥
काश्यप, विश्वामित्री गोत्र कुणी सांगतात डौलानें ॥७॥
गोत्राच्या आधारें, ठरवूं जरि कूल ब्रह्मंवृदोच ॥
ब्राम्हण सारे ठरतिल, शूद्र अतीशूद्र मित्र जातीचे ॥८॥
जातीचे मिश्र परी, सर्व ऋषी श्रेष्ठ ब्रह्मज्ञानानें ॥
ब्राम्हण ठरलें; झाले वंद्य जगा सर्व, ब्रह्मकर्मानें ॥९॥
क्षत्निय कुळांत राघव, गवळ्याचा कृष्ण पूज्य कां झाले ॥
ब्राह्मण कैसे भजती अब्राम्हण देव, काय गूढ भलें ? ॥१०॥
एकचि उत्तर याला, जातीजन्मांत श्रेष्ठता नाहीं ॥
जाणे ब्रह्म, स्वरा तो ब्राम्हण, उरला न संशयो कांहीं ॥११॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T23:38:21.4100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

असुरी खाणें

  • n  Demon-food, applied to flesh, meat, spirituous liquor &c. Gluttony. 
RANDOM WORD

Did you know?

गणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site