TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
स्त्री

वेदांत काव्यलहरी - स्त्री

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


स्त्री
गोलाकार शशीचा, मोहक चाळाच हस्तिशुंडेचा ॥
वेलीची लगट, तसा नेत्रीचा द्दष्टिपात हरिणीचा ॥१॥
हळुवार स्पर्श नाजुक वायूचा, नागमोड नागिणीची ॥
प्रखरपणा सूर्याचा, शीतलता सुखद चंद्रकिरणाची ॥२॥
गुलमोहोर फुलांचा सुंदर तो नवबहार झोकाचा ॥
द्राक्षाची मादकता, नटवेपण डौल मयूर पक्षाचा ॥३॥
आयस्कांतिल चुंबकपण, मधुंतिल माधुरी तसे जाणा ॥
ढोंगीपणा बकाचा, अश्वाचा तेवि एकनिष्ठपणा ॥४॥
पाझरणें ह्रदयाचा जिव्हाळा धर्म चंद्रकेतूचा ॥
काठिण्य हिरकणीचें, कोमलता गूण कमलपुष्पाचा ॥५॥
लज्जा लाजाळूची, शुक, मधुरव, कलकलाट चिमण्यांचा ॥
विश्वासघातकीपण सर्पाचा, मृदुपणा सुकुसुमांचा ॥६॥
भित्रेपणा सशांचा, ढग अश्रूपात, भ्रमर चांचल्य ॥
पूर्व दिशेची हंसरी अरुण छटा जेवि हास्यमांगल्या ॥७॥
कूजन कबूतराचें, चातक आतूरता, समुद्राची ॥
घेउनि अराम्याता, विधि घडवी मूर्ती सुरम्य ललनेची ॥८॥
लय, विक्षेप, कषाया मिसळुनिया आणखी रसास्वाद ॥
स्त्रीविघ्न विधी निर्मी योग्याचें तप करावया बाद ॥९॥
मांस, रुधिर, अस्थीची, कफ, श्लेष्माची जिवंत स्त्री पुतळी ॥
विविध मसाल्याचें हें मिश्रण, तापस कठोर मन वितळी ॥१०॥
असतां अवघड, नसतां अडचण, स्त्री जात शुद्ध मायावी ॥
अष्टगुणें काम जिचा जणु प्रकृती अष्टधाच जाणावी ॥११॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-17T20:59:50.6470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सरागणें

  • अ.क्रि. शोभणे . [ सं . स + राग - ञ्ज् ‍ ] 
RANDOM WORD

Did you know?

मंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.