TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
मोठा बाप

वेदांत काव्यलहरी - मोठा बाप

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


मोठा बाप, छोटा पाप
मोठाच बाप बनतो, छोटयाचें ओढवें सदा पाप ॥
मोठा धनी सुखाचा, छोटयाचा भोग सर्व संताप ॥१॥
नकटा थोर बरा, परि वाइट जरि छान धाकुटा खोटा ॥
सानावरीच फिरतो, शास्त्राचा विधिनिषेध वरवंटा ॥२॥
जीवाभिमान छोटा म्हणुनी तो बद्ध, ईश अभिमान ॥
मोठा, मुक्त म्हणोनी; छोटा असणेंच महत्‌ अज्ञान ॥३॥
अल्पाभिमान त्यासी बंधन, ज्याचा असेल तो मोठा ॥
द्दढबंध त्यास व्हावा, मुक्त परी, खास ! न्याय हा उलटा ॥४॥
उलटा न्याय दिसे, परि नियम अबाधीत हा निसर्गाचा ॥
अल्पांत घाण सारी, व्यापक अतिशुद्ध धर्मची त्याचा ॥५॥
भांडयांतील विटाळें पाणी जें, तेंच शुद्ध गंगेंत ॥
अत्यंत रजत्वलेच्या स्पशानें, उलट पुनित जी स्नात ॥६॥
घालील जो दरोडा छोटासा, बद्ध तो गुन्हेगार ॥
राष्ट्राची लूट करी तो डाकू नृपति, वंद्य साचार ॥७॥
एका दोघा मारी ठार, ठरे तो जर्गी बडा खूनी ॥
रणकंदनीं जगाचा करितां संव्हार, शूर मुगुटमणी ॥८॥
एका परनारीशीं रमता, व्यभिचार म्हणुनि ओरडती ॥
गोपी अनंत भोगी, हरिचा व्यभिचार भक्तिनें गाती ॥९॥
मोठयानें जरि केलें पाप, तरी तो करोनि नच कर्ता ॥
छोटयाचें पुण्यहि तें, अभिमानें देह त्यास बंधकता ॥१०॥
जीवाचें कर्म करी बंधन, देहाभिमान त्या म्हणुनी ॥
ईश करोनि अकर्ता, कारण तो थोर विश्वअभिमानी ॥११॥
छोटयांत अती छोटा ‘मी आहे देह’ जीव अभिमान ॥
मोठयांत अती मोठा, ‘मी आहे ब्रह्म’ ईशाभिमान ॥१२॥
देहाभिमान त्याहुनि, मोठा आहे कुटुंबअभिमान ॥
ग्रामाभिमान त्याहुनि, मोठा आहे स्वदेशअभिमान ॥१३॥
देशाभिमान त्याहुनि, विश्वाचा फार थोर अभिमान ॥
विश्वचि ढर किंबहुना विश्व असे मीच, शुद्ध हें ज्ञान ॥१४॥
सारांश अल्प तेथें पाप, जरी थोर तेंच पुण्य असे ॥
संसारी, परमार्थीं न्याय असा सरखाच हा विलसें ॥१५॥
याकारण सोडावें, जीवानें क्षुद्र जीव बुद्धीला ॥
म्हणजे जीवचि होतो ईश्वर शिवरूप; काय भय त्याला ॥१६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T23:11:24.2530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

protection/s

  • संरक्षण 
RANDOM WORD

Did you know?

जननशांतीचे महत्व स्पष्ट करा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.