TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
मुक्ति व अवतार

वेदांत काव्यलहरी - मुक्ति व अवतार

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


मुक्ति व अवतार-मीमांसा
मुक्ती म्हणजे पुनरपि जन्म न घेणें, असा नव्हे अर्थ ॥
भगवान जन्म घेती, शतधा अवतार, नसुनियां स्वार्थ ॥१॥
ज्ञानांत मोक्ष म्हणजे, आत्मा हा नित्यमुक्त हेंच कळें ॥
अज्ञानांतहि आत्मा मुक्त, परी सत्य हें तया न कळे ॥२॥
आत्म्यास कर्धी नाहीं जन्ममरण, हे विकार शरिसाई ॥
आपणची तो  आत्मा नेणुनि, जन मरति व्यर्थ सायासीं ॥३॥
अष्टांग योगसाधन तीर्थव्रतादीक साधनीं पडती ॥
अभ्यास कठिण करिती, नेणो काशास उगिच धडपडती ॥४॥
साधन कवणें, आत्मा अभ्यासानें न होइ निर्माण ॥
तो नित्य, जडशरीरें येतीं जातीं तयावरी जाण ॥५॥
जागृत, स्वप्न, सुषुप्ती, सृष्टीचे सर्व कांहीं व्यवहार ॥
ज्ञानेंचि कळे, ज्ञानचि आत्मा, आत्माच अपण साचार ॥६॥
सर्वांस तो प्रकाशीं, एकाचाही न धर्म घेऊन ॥
केवळ असंग सर्वाठायी, सर्वांस नित्य व्यापून ॥७॥
हा उघड उघड अनुभव, त्यासी अभ्यास कासया करणें ॥
अरसा कशास, कंकण हातांतिल आपणास जरि बघणें ॥८॥
सृष्टी आली गेली किंवा ज्ञान्यास ये शरीर पुन्हा ॥
कोठें काय बिघडलें, ज्ञानी हा नित्य मुक्तची जाणा ॥९॥
सृष्टीव्यवहाराचा मुक्तीचातो विरोध तिळहि नसे ॥
आत्माच सर्व प्रेरक, सर्वहि कर्मांत नित्य मुक्त असे ॥१०॥
बुद्धीमंद तयासी मी वाटे बद्ध, द्दश्य भिन्न दिसें ॥
ऐशा जडमूढासी निरुपावें जगत जाहलेंच नसे ॥११॥
जन्ममरण बंधन वा मुक्तीही काल्पनीक ज्ञान्यासी ॥
तो नित्यमुक्त म्हणुनी, शजन्माचेंहि भय नसे त्यासी ॥१२॥
कालें, कर्म-स्वभावें जग चाले, जन्मही तसे होती ॥
मृगनक्षत्रीं कीटक सहज स्वभावेंच जन्मती मरती ॥१३॥
ते वासनानिमित्तिक येती, जन्मास कर्मकृत-जीव ॥
कालच ऐसा येतो, त्यावेळीं जन्म घेटसे देव ॥१४॥
नख केश जसें येती कालबळें, वल्लि विविध भूमींत ॥
निर्हेतुक भोगेच्छाविरहित, मुक्तास जन्म तैं येत ॥१५॥
ते नित्य तृप्त असती, जीवापरि कर्मबद्ध ते नसती ॥
कालानुसार प्रभुचें मत्स्य वराहादि जन्मही होती ॥१६॥
हा कालकृत प्रभूचा जन्म, तयासी नसे अहंकार ॥
समयोचित सर्व करुनि, कर्तेपण त्या शिवे न साचार ॥१७॥
अवतार प्रभु घेई, येई धर्मास जेधवा ग्लानी ॥
याचा अर्थ असे कां, प्रभु नव्हते मुक्त, नव्हत ते ज्ञानी ॥१८॥
ज्ञान्याचें शरिर मरो, जन्मो शतवेळ,तो करो कांहीं ॥
त्याची नित्य समाधी, विषयेंद्रिय घोळक्यांतही राही ॥१९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T23:09:56.8330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ballooning growth

  • अत्याधिकातिशीघ वृद्धि 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.