मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक १९० ते २०३

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १९० ते २०३

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


महागणपते: स्तोत्रं सकाम: प्रजपन्‌ इदम्‌ ॥१९०॥
इच्छया सकलान्‌ भोगान्‌ उपभुज्य इह पार्थिवान्‌ ।
मनोरथफलै: दिव्यै: व्योमयानै: मनोरमै: ॥१९१॥
चन्द्रेन्द्र भास्कर उपेन्द्र ब्रह्म शर्वादि सद्‌मसु ।
कामरूप: कामगति: कामत: विचरन्‌ इह ॥१९२॥
भुक्त्वा यथा ईप्सितान्‌ भोगान्‌ अभीष्टान्‌ सह बन्धुभि: ।
गणेश अनुचर: भूत्वा महागणपते: प्रिय: ॥१९३॥
नन्दीश्वरादिसानन्दी नन्दित: सकलै: गणै: ।
शिवाभ्यां कृपया पुत्र निर्विशेषं च लालित: ॥१९४॥
शिवभक्त: पूर्णकाम: गणेश्वरवरात्‌ पुन: ।
जातिस्मर: धर्मपर: सार्वभौमो अभिजायते ॥१९५॥
ज्याला काही इच्छा असते त्याने महागणपतिच्या या स्तोत्राचा जप केला असता त्यास या इहलोकात त्याने इच्छिलेले सर्व ऐहिक भोग याच जन्मी भोगून तो मनोरथफलस्वरूप दिव्य व मनोरम विमानांच्या योगाने चन्द्र इन्द्र भास्कर, उपेन्द्र, ब्रह्मदेव, रुद्र इत्यादिकांच्या गृही जातो. पहिजे त्या रुपात, पाहिजे त्या गतीने यथेच्छ फिरणारा तो भाग्यवान्‌ अतिप्रिय बांधवांसह यथेष्ट भोग भोगून गणपतीस प्रिय असा गणेशाचा अनुयायी होतो. नन्दीश्वर वगैरेसारखाच जो आनंदी आहे असा सर्व गणांनी ज्यास संतुष्ट केले आहे, शिव व पार्वती यांच्या कृपेने पुत्राप्रमाणे ज्याचे लालन केले आहे, जो शिवभवक्त गणपतिच्या कृपेमुळे पूर्णकाम होऊन पूर्वीच्या सर्व जन्मांचे स्मरण राहून तो धार्मिक व सावभौम राजा होऊन पुनरपि जन्मास येतो. ॥१८९-१९५॥
निष्काम: तु जपन्‌ नित्यं भक्त्या विघ्नेशतत्पर: ।
योगसिद्धिं परां प्राप्य ज्ञानवैराग्यसंस्थित: ॥१९६॥
निरन्तर उदितानन्दे परमानन्द संविदि ।
विश्वोत्तीर्णे परे पारे पुनरावृत्ति-वर्जिते ॥१९७॥
लीन: वैनायके धाम्नि रमते नित्य-निर्वृत: ।
य: नामभि: यजेत्‌ एतै: अर्चयेत्‌ पूजयेत्‌ नर: ॥१९८॥
राजान: वश्यतां यान्ति रिपव: यान्ति दासताम्‌ ।
मन्त्रा: सिध्यन्ति सर्वे सुलभा: तस्य सिद्धय: ॥१९९॥
पण जो भक्तिभावाने विघ्नेश्वराचे ठायी लीन होऊन या स्तोत्राचा सदा जप करतो, तो श्रेष्ठ योगसिद्धी प्राप्त करून विश्वाहून विलक्षण व पुनर्जन्मरहित अशा अव्यक्ताहूनही पलीकडे असलेल्या विनायकांमध्ये लीन होऊन नित्य तृप्त होऊन स्वस्वरूपभूत तेजामध्ये निमम्न होतो. जो पुरुष या सहस्रनामाने हवन करतो व पूजन करतो त्याला राजे वश होतात व शत्रू त्याचे दास होतात. त्याचे सर्व मन्त्र सिद्ध होतात. त्याला सर्व सिद्धी सुलभ होतात. ॥१९६-१९९॥
मूलमन्त्रात्‌ अपि स्तोत्रम्‌ इदं प्रियतरं मम ।
नभस्ये मासि शुक्लायां चतुर्थ्यां मम जन्मनि ॥२००॥
दूर्वाभि: नामभि: पूजां तर्पणं विधिवत्‌ चरेत्‌ ।
अष्टद्रव्यै: विशेषेण जुहुयात्‌ भक्तिसंयुत: ॥२०१॥
तस्य ईप्सितानि सर्वाणि सिध्यन्ति अत्र न संशय: ।
इदं प्रजप्तं पठितं पाठितं श्रावितं श्रुतम्‌ ॥२०१॥
व्याकृतं चर्चितं ध्यातं विमृष्टं अभिनन्दितम्‌ ।
इह अमुत्र च सर्वेषां विश्वम्‌-ऐश्वर्यं-प्रदायकम्‌ ॥२०३॥
(श्रीगणेश सांगतात) - मूलमन्त्रापेक्षाही हे सहस्रनाम स्तोत्र मला अधिक प्रिय आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस, माझ्या जन्मदिनी दूर्वांसह सहस्रनाम अर्पण करून यथाविधी पूजा व तर्पण करावे. भक्तिभावाने विशेषत: आठ द्रव्यांनी हवन करावे म्हणजे या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतील यात शंका नाही. सहस्रनाम स्तोत्र नित्य जपावे. पठन-पाठन करावे, दुसर्‍यास ऐकवावे व आपण ऐकावे, व्याख्यान, विवरण करावे, चर्चा करावी, ध्यान करावे, विचार आणि अभिनंदन करावे. हे केले असता हे स्तोत्र इहलोकी सर्वांस सर्व ऐश्वर्य देणारे आहे. ॥२००-२०३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP