मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
ध्यान

गणेशसहस्रनामस्तोत्र - ध्यान

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


श्रीगणेशाय नम: । श्रीमत्सकलगाणेशाचार्यगुरुभ्यो नम: ॥
श्रीमद्‌ अंकुशधारिणे सद्‌गुरवे योगीन्द्राय नम: ॥
श्रीमद्‌ श्रीहेरम्बराजाय सद्‌गुरवे योगीन्द्राय नम: ॥
श्रीगणेशास नमस्कार असो. माझ्या सर्व गाणपत्य गुरुंना नमस्कार असो. श्रीमद्‌ अंकुशधारी सद्‌गुरू योगीन्द्रांना नमस्कार असो. श्रीमद्‌ हेरम्बराज सद्‌गुरू योगीन्द्रांना नमस्कार असो.
गुरु:एव गति: गुरुम्‌ एव भजे गुरुणा एव सह अस्मि नम: गुरवे ।
न गुरो: परमं शिशु: अस्मि गुरो: मति: अस्ति गुरौ मम पाहि गुरो ॥
गुरूच माझी गती आहे, गुरूलाच मी भजतो. गुरूबरोबरच मी असतो. त्या गुरूला माझा नमस्कार असो. गुरूइतकं श्रेष्ठ काही नाही. गुरूचे मी लेकरू आहे. माझी बुद्धी गुरूशीच संलग्न आहे. हे गुरो माझे रक्षण कर.
श्रीस्वानंदेश: ब्रह्मणस्पति:देवता ॥ नानाविधानि छन्दांसि ॥ हुम्‌ इति बीजम्‌ ॥ तुंगम्‌ इति शक्ति: ॥ स्वाहाशक्ति: इति कीलकम्‌ ॥ सकलविघ्नविनाशनद्वारा श्रीब्रह्मणस्पतिप्रीत्यर्थं जपे विनियोग: ॥
श्री स्वानंदेश ब्रह्मणस्पती ही देवता. छंद वेगवेगळे. हुम्‌ हे बीज. तुङ्गम्‌ ही शक्ती. स्वाहा शक्ती हे कीलक. सर्व विघ्नांचा नाश होऊन श्री ब्रह्मणस्पती संतुष्ट व्हावे या उद्देशाने जप करण्यासाठी याचा उपयोग.

विनियोग
श्रीमद्‌गणेशदिव्यसहस्रनामामृतस्तोत्रमालामहामंत्रस्य महागणपतिऋशि: । श्रीस्वानन्देशो ब्रह्मणस्पतिर्देवता । अनुष्टुप्‌छंद: । महागणपतिर्देवता । गं बीजम्‌ । तुङ्गं शक्ति: । स्वाहा कीलकम्‌ । चतुर्विधपुरुषार्थसिद्धयर्थे जपादौ विनियोग: ।
ह्या श्रीमहागणपतिसहस्रनामरूपी मंत्राचा ऋषी आहे महागणपती. छन्द आहे अनुष्टुभ्‌. गं हे बीज आहे. तुंग ही शक्ती आहे. स्वाहा हा कीलक आहे. धर्म-अर्थ-काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठी करावयाच्या जप इत्यादींच्या प्रारंभी या मंत्राचा विनियोग आहे.

अथ न्यासा: ॥
गणेश्वर: गणक्रीड: इति अंगुष्ठाभ्यां नम: ॥
कुमारगुरु: ईशान: इति तर्जनीभ्वां नम: ॥
ब्रह्माण्डकुंभ: चित्‌ व्योम इति मध्यमाभ्यां नम: ॥
रक्त: रक्ताम्बरधर: इति अनामिकाभ्यां नम: ॥
सर्वसद्‌गुरुसंसेव्या: इति कनिष्ठिकाभ्यां नम: ॥
लु्प्तविघ्न: सुभक्तानाम्‌ इति करतलकरपृष्ठाभ्यां नम: ॥

प्रत्येक चरण स्वतंत्रपणे म्हणत असताना त्या त्या स्थानी हाताने स्पर्श करावा.
गणेश्वर - गणक्रीडांना नमस्कार (असे म्हणून दोन्ही अंगठयांना स्पर्श करावा.)
कुमारगुरू - ईशानाला नमस्कार (दोन्ही तर्जनींना स्पर्श करावा.)
ब्रह्माण्डकुंभ - चिद्‌व्योमाला नमस्कार (दोन्ही मध्यमांना स्पर्श)
रक्ताम्बरधराला नमस्कार (दोन्ही अनामिकांना स्पर्श)
सर्वसद्‌गुरुसंसेव्यास नमस्कार (दोन्ही करंगळ्यांना स्पर्श)
नमस्कार (तळहात-मळहातास स्पर्श)
चांगल्या भक्तांची विघ्ने नाहीशी करणार्‍या त्या लुप्तविघ्नाला नमस्कार.

अथ हृदयादिन्यासा: ॥
छन्दश्छन्दोद्‌भव: इति हृदयाय नम: ॥
- छन्दश्छन्दोद्‌भव: असे म्हणून हृदयास स्पर्श करावा.
निष्कलो निर्मल इति शिरसे स्वाहा ॥
- निष्कल निर्मल असे म्हणून मस्तकास स्पर्श करावा.
सृष्टिस्थितिलयक्रीड इति शिखायै वषट्‌ ॥
- सृष्टिस्थितिलयक्रीड असे म्हणून शेंडीला स्पर्श करावा.
ज्ञानंविज्ञानम्‌ - आनन्दम्‌ इति कवचाय हुम्‌ ॥
- ज्ञानविज्ञानआनंद म्हणून कवचाची कल्पना करून त्याला स्पर्श करावा.
अष्टांगयोगफलभृत्‌ इति नेत्रत्रयाय वौषट्‌ ॥
- अष्टांगयोगफलभृत्‌ असे म्हणून त्रिनेत्रांना स्पर्श करावा.
त्रिनेत्रांना स्पर्श करणे म्हणजे डोळे मिटून अनामिकेने डाव्या डोळ्याला तर्जनीने उजव्या डोळ्याला व मध्यमेने दोन्ही भुवयांच्या मध्यभागी एकाच वेळी स्पर्श करणे.
अनन्तशक्तिसहित इति अस्त्राय फट्‌ ॥ इति दिग्बंध: ॥
अनन्तशक्तिसहित अस्त्राय फट्‌ म्हणून डोक्याभोवती चुटक्या वाजवून टाळी वाजवावी. हा झाला दिग्बंध.

ऋष्यादिन्यास
ॐ महागणपतये ऋषये नम: शिरसि । अनुष्टुछन्दसे नम: । मुखे महागणपतिदेवतायै नम: हृदि ।
गं बीजाय नम: गुह्ये । तुङ्ग शक्तये नम: पादयो: । स्वाहा कीलकाय नम: नाभौ ।
अनुक्रमे मस्तक, मुख, हृदय, गुदभाग, दोन्ही चरण व बेंबीस उजव्या हाताने स्पर्श करीत वरील न्यास म्हणावा.
ॐ महागणपतिऋषीस मस्तक लवून नमस्कार (मस्तक) अनुष्टुभ्‌ छंदास नमस्कार. (मुख). महागणपतीस नमस्कार. (ह्रदय). गं बीजास नमस्कार. (गुदभाग) तुङ्ग शक्तीस नमस्कार (दोन्ही पाय). स्वाहा कीलकास नमस्कार (नाभिस्थान).

अथ ध्यानम्‌ ॥
रक्ताम्भोधिस्थ पोतोल्लसत्‌ अरूणसरोजाधिरूढं त्रिनेत्रं पाशं च एव अंकुशाढयं परशुम्‌ अभयदं बाहुभि: धारयन्तम्‌ । शक्त्या युक्तं गजास्यं पृथुतर जठरं सिद्धिबुद्धिप्रसादम्‌ रक्तं चन्द्रार्धमौर्लि सकलभयहरं विघ्नराजं नमामि ॥
लाल समुद्रातील (गणपतीचे सर्व शरीर शेंदुराने माखलेले असते.) हत्तीच्या पिल्लाप्रमाणे असणार्‍या. अरुण कमळावर आरूढ झालेल्या, त्रिनेत्र गजाननाला, हातांमध्ये पाश-अंकुश आणि परशु धारण करून भक्ताला अभय देणार्‍या, शक्तिशाली असणार्‍या, विशाल उदर असणार्‍या, सिद्धिबुद्धिंसमवेत असणार्‍या, रक्तवर्ण असणार्‍या, मस्तकावर चन्द्रकोर असणार्‍या, सर्व भय दूर करणार्‍या, सर्वविघ्नांवर सत्ता गाजविणार्‍या त्या गणपतीला मी नमस्कार करतो.
श्रीसिद्धिबुद्धिसहिताय सलक्षलाभाय श्रीस्वानंदेशाय ब्रह्मणस्पतये सांगाय सपरिवाराय सशक्तिकाय सायुधाय सवाहनाय सावरणाय नम: ॥ इति नाममंत्रेण मानसै: पंचोपचारै: संपूज्य पठेत्‌ ॥
श्रीसिद्धिबुद्धिसह असणार्‍या, लक्ष आणि लाभाबरोबर असणार्‍या, स्वानंदेशास, ब्रह्मणस्पतीस, सर्वांगयुक्तास - सपरिवार असणार्‍या, शक्तिशाली असणार्‍या, आयुधे धारण केलेल्या, वाहनावर असणार्‍या, कवचधारक अशा गणपतीस माझा नमस्कार.
या नामांनी मानसपंचोपचारांनी पूजन करून पठन करावे.

ध्यान
हस्तीन्द्र-आननम्‌ इन्द्रचूडम्‌ अरुणच्छायम्‌ त्रिनेत्रं रसात्‌
आश्लिष्टं प्रियया सपद्यकरया स्वाङ्कस्थया संततम्‌ ।
बीजापूर-गदा-धनु-त्रिशिखयुक्‌ चक्र-अब्ज-पाश-उत्पल
व्रीहयग्र-स्वविषाण-रत्नकलशान्‌ हस्तै: वहन्तं भजे ॥१॥
गजश्रेष्ठाचे मुख असलेल्या, इन्द्राप्रमाणे मुकुटावर तुरा असलेल्या, अरुणकान्ती असलेल्या, तीन पाणीदार डोळ्यांनी सुशोभित असलेल्या आपल्या मांडीवर बसलेल्या, हातात कमलपुष्प धारण केलेल्या, प्रिय सिद्धिदेवीने नित्य प्रेमाने आलिंगन दिलेल्या, आपल्या दहा हातात महाळुंग, गदा, धनुष्य, त्रिशूल, चक्र, रक्तकमल, पाश, नीलकमल, भाताची लोंबी, आपलाच भग्न दात आणि रत्नकलश सोंडेमध्ये धारण केलेल्या गणेशाचे मी पूजन करतो.
गण्डपाली गलद्दान-पूर-लालस-मानसान्‌
द्विरेफान्‌ कर्णतालाभ्यां वारयन्तं मुहुर्मुहु: ।
कराग्र-धृत-माणिक्य-कुम्भ-वक्त्र विनिर्गतै:
रत्नवर्षै: प्रीणयन्तं साधकान्‌ मदविह्वलम्‌
माणिक्यमुकुटोपेतं सर्व-आभरण-भूषितम्‌ ॥
सर्वभक्ताभयकरं श्रीगणेशमहंभजे ।

इति ध्यानम्‌
गण्डस्थळावरून ओघळणार्‍या मदरसाच्या प्रवाहाचे प्राशन करण्यासाठी ज्यांचे मन अत्यंत उत्सुक झाले आहे अशा भुंग्यांना कानाच्या फटकार्‍यांनी पुन्हा पुन्हा दूर करणार्‍या, ज्याच्या हातात माणिक आहे, सोंडेत रत्नकलश आहे. त्यातील रत्नांच्या वर्षावाने साधकांना खूष करणार्‍या, मदरसाने व्याकूळ झालेल्या, माणके जडविलेला मुकुट धारण करणार्‍या, सर्व अलंकारांनी सुशोभित झालेल्या सर्व भक्तांना अभय देणार्‍या गणेशाचे मी ध्यान करतो.

इथे ध्यान संपून सहस्रनामास सुरुवात होते.

गणेश: व: पायात्‌ प्रणमत गणेशं जगत्‌ इदं ।
गणेशेन त्रातं नम इह गणेशाय महते ।
गणेशात्‌ न अस्ति अन्यत्‌ त्रिजगति गणेशस्य महिमा ।
गणेशे मत्‌ चित्तं निवसतु गणेश त्वम्‌ अव माम्‌ ॥
गणेश तुम्हा सर्वांचे रक्षण करो. गणेशाला नमस्कार करा. गणेशाने या सर्व जगाचे रक्षण केलेले आहे. म्हणून गणेशाला नमस्कार असो.
या त्रिभुवनात गणेशाशिवाय दुसरे काहीही नाही असा गणेशाचा महिमा आहे. माझे चित्त नेहमी गणेशाशीच संलग्न राहो. हे गणेशा, तू माझे रक्षण कर.

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP