मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
मंगलाचरण

गणेश स्तोत्र - मंगलाचरण

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकारणकारणम्‌ ।
गणेशोऽवतु सर्वात्मा सर्वसम्राट्‌ सुसिद्धिद: ॥१॥
य: सर्वादि: स्वतन्त्र: श्रुतिगदितमह: सर्वपूज्य: तथाऽऽदौ
पूज्यो नैवास्ति यस्य प्रकटितसुमहावाक्यदेह: परेश:
विश्वब्रह्मादिनाथ: शिवहरिभुवनार्काजताताधिदेव:
तं श्रीस्वानन्दनाथं मम हृदि सततं भावये श्रीमतिभ्याम्‌ ॥२॥
एको देव: इतिरित: श्रुतिपदै: य: कोटिकोटयण्डप:
स्वानन्देशसुत: गुणेश इति यं वेदा: ब्रुवन्तेऽनिशम्‌
ब्रह्माणं हरिमीश्वरं च भुवनं सूर्यं निजेच्छावशात्‌ ।
य: सृष्ट्‌वा कुरुते जगत्‌स्थितिमह: तं स्वामिनं मे भजे ॥३॥
कूटस्थं रविकेशवृन्दविनुतं गाणेशचूडामणिम्‌
हंसाख्यं गुरुनाथ नाथममलं सद्‌विग्रहं सुंदरम्‌
हस्तै: पुस्तकलेखनीसरसिजश्रीज्ञानमुद्रा: क्रमात्‌
बिभ्राणं प्रियया मुदोपनिषदाश्लिष्टं भजे मद्‌गुरुम्‌ ॥४॥
योगिनं धृतवपुं यतिवेषं । नैजदं स्वकरुणालवयोगात्‌
श्रीगणेश्वरमहं खलु नौमि । मुद्‌गलांशमथ पीठपमाद्यम्‌ ॥५॥
अस्मद्‌गुरुं सत्करुणानिधानं । योगीन्द्रापादादथ लब्धबोधम्‌
वन्दे गुरूणां गुरुराजराजम्‌ । सद्रूपमेवांकुशधारिणं तम्‌ ॥६॥
श्रीमान्‌सिद्धिमतीश्वर: शिवहरिब्रह्मैकशक्तीश्वर:
भूस्वानन्दनिवासकौतुकयुतो भक्तेष्टदानक्षम:
भक्तानां वरद: सुसिद्धिमतियुक्‌ सर्वैर्गणै: संयुत:
देवो विघ्नविनाशदक्षविभव: कुर्यात्‌ च मे मङ्गलम्‌ ॥७॥
गाणेशा भृगुमुद्‌गलादि गुरव: विष्ण्वादयश्चेश्वरा:
सिद्धा नारदगृत्समादिमुनयो बल्लाळनाथादय:
भक्ता: ज्ञानसुखादिदाननिरता: सर्वे च गाणेश्वरा:
देवा मायुरवासिश्च सततं कुर्वन्तु मे मङ्गलम्‌ ॥८॥
॥ इति श्रीमद्‌हेरंबराजयोगीन्द्रानुशासनम्‌ ॥

प्राकृत अर्थ
सर्व मंगलांचे मांगल्या असणारा, सर्व कारणांचे कारण असणारा सर्वात्मा, सर्वसम्राट्‌ आणि सुसिद्धी देणारा गणेश सर्वांचे रक्षण करो अवतु.
जो अनादी आहे, स्वतंत्र आहे, वेदांनी ज्याची महती गायिली आहे, सर्वांना पूज्य, नुसताच पूजनीय नव्हे तर सर्वप्रथम पूजनीय असणारा, ४ वेदांच्या ४ महावाक्यरुपी देहाने प्रकट झालेला ४ वेदांची ४ महावाक्ये आहेत, ऋग्वेदाचे ‘प्रज्ञानं ब्रह्म’, यजुर्वेदाचे ‘अहं ब्रह्मास्मि’, सामवेदाने ‘तत्त्वमसि’ तर अथर्ववेदाचे ‘अयमात्मा ब्रह्म’. आरण्यकातील व उपनिषदातील सारगर्भ तत्त्वज्ञान सांगणार्‍या, या चार वाक्यांना महावाक्ये अशी संज्ञा आहे. परमात्मा, विश्वब्रह्मादिनाथ असा जो शिवही आहे. विष्णूही आहे, जो सूर्य, ब्रह्म, अधिदेवांचाही देव आहे, अशा त्या स्वानन्दनाथाला समृद्धी आणि बुद्धिसाठी मी माझ्या हृदयात नित्य स्थापित करतो.
हा एकमेव देव आहे, की ज्याला श्रुतींनी कोटि ब्रह्माण्डाचा पालनकर्ता म्हटले आहे. ज्याला स्वानन्देश गुणेश म्हटले आहे. जो स्वत:च्या इच्छेने ब्रह्मा-विष्णु-महेश-सूर्य प्रकटित करून जगाचे भरणपोषण करतो अशा त्या परब्रह्माचे मी गुणगान करतो.
अविनाशी अशा गाणेशचूडामणींचे हंस नावाच्या गुरुनाथांना, जे निर्मळ, सद्‌भावसुंदर आहेत, हातांमध्ये पुस्तक, लेखणी, कमळ असून ज्ञानमुद्रेत आहेत ज्यांनी प्रेमाने उपनिषद्‌रूपी प्रियेला आलिंगन दिले आहे अशा गुरुरूपात प्रकटलेल्या त्या गणेशाला मी भजतो.
जे योगी असून यतिवेषात केवळ देहधारी आहेत, स्थिर, करुण आहेत, जे मुद्‌गलांचा अंशच आहेत, पीठांचे पालन करणारे आहेत,  आद्य आहेत अशा गणेश्वररूपी गुरुंची मी स्तुती करतो.
ज्या योगीन्द्राचार्यांकडून उपदेश घेतला, जे आमचे करुणानिधान आहेत, गुरु आहेत, अंकुशधारी अशा गुरूंचेही जे गुरू आहेत त्या गुरुराजांना मी वन्दन करतो.
श्रीमंत, सिद्धिमंत, बुद्धिमंतांचा ईश्वर, ब्रह्मा-विष्णू-महेशाची एकत्र शक्ती असलेले, भूस्वानंदी वास करण्यात कौतुक वाटणारे, भक्तांना इच्छित दान देण्यास सदैव समर्थ असलेले, वरद, सिद्धी व बुद्धी यांनी युक्त, विघ्नांचा विनाश करण्यात सदैव तत्पर असलेल्या श्रीगणेशांनी माझे मंगल करावे ही प्रार्थना.
भृगुमुद‌गलादी गाणेशगुरु. विष्णु वगैरे देव, सिद्ध, नारदगृत्समादी मुनी, बल्लाळनाथ, भक्त, ज्ञान-सुखादी दानात रत असणारे सर्व गाणेश्वर, मोरगावी वास असणारे सर्व देव माझे मंगल करोत.


References : N/A
Last Updated : April 04, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP