मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ६| अध्याय ४५ खंड ६ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ६ - अध्याय ४५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ४५ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति कथा पुढें सांगत । ऐसे नाना अवतार घेत । महात्मा विकट ते असंख्यात । वर्णनातीत महादेवींनो ॥१॥भक्तिप्रिय स्वभावें घेत । अवतार भक्तविघ्न निवारणार्थ । मयूरक्षेत्रीं सांप्रत । जावें तुम्हां सर्वांनीं ॥२॥तेथ मीही पूर्णं ख्पें वसत । येथ कलांशें संस्थित । क्षेत्रीं जाऊन विश्वेश्वरा सतत । शक्तींनो भजा भक्तीनें ॥३॥त्यानें योगींद्रवंद्य व्हाल । विषयभावांत चित्तावर मळ । साठतो म्हणून विमल । व्हावें तुम्हीं शक्तींनो ॥४॥गणेशमार्गांचा आश्रय घेऊन । विकटास भजा एकमन । वेदादींतही कर्म शोभन । कीर्तिलें जें गणेशपर ॥५॥तेच नित्य भक्तियुक्त । आचरावें तुम्हीं श्रद्धायुक्त । गणेशमूर्तीचें चिंतन ह्रदयांत । सदैव करा प्रिय शक्तींनो ॥६॥मानसी तैसी बाह्म पूजा । करून गणेशा तोषवा सहजा । विषयांत विरक्त होऊन भजा । विकटास तीच उत्तम भक्ति ॥७॥गणेशावरी होऊन आसक्त । करावी भक्ति ऐसी अविरत । मुद्गल सांगती दक्षाप्रत। आदिशक्तित तैं देई ॥८॥एकाक्षर मंट्र शक्तींप्रत । विधियुक्त गणराजाचा उदात्त । नंतर ती मौन धरित । शक्ती करिती प्रणाम ॥९॥तदनंतर त्या भक्तियुक्त । महाकाळीं प्रमुख त्यांत । दक्षा मयूरक्षेत्रीं त्वरित । तेथ पाहसी आदिशक्तीसी ॥१०॥तिची पूजा करून । ढुंढीस पूजिती एकमन । तदनंतर तप महान । आचरिलें त्यांनी शंभर वर्षें ॥११॥तेव्हां त्यांच्या पुढें प्रकटत । मयूरेश्वर हर्षित । त्यास प्रणास करून पूनित । नानाविध उपचारांनीं ॥१२॥मनोरम सोळा संस्कारयुक्त । पूजा करून वंदित । कर जोडून स्तवन करित । महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ॥१३॥मयूरेशासी विघ्नेशासी । भक्तविघ्नहर्त्यांसी । विघ्नदाता तूं अभक्तासी । गणेशा तुला सदा नमन ॥१४॥लंबोदरासी देवासी । मूषकध्वजासी अनाथनाथासी । नाथांच्याही नाथासी । परेशा तुला नमोनमः ॥१५॥महेशासी सिद्धिदात्यासी । गजाननासि अनंतासी । सदा स्वभक्तां सर्वदासी । ब्रह्मपतीसी तुज नमन ॥१६॥शांतिमयासी महात्म्यासी । शांतीच्या शांतिरूपासी । हेरंबासी कवीसी । कविरूपा तुज नमस्कार ॥१७॥कवीस कविपददात्यासी । कवीशासी सिद्धिबुद्धिपदासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । सिद्धिबुद्धिचालका तुज नमन ॥१८॥माया मायिक चिन्हांनीं । खेळ करिसी प्रतिदिनीं । योगशांतिस्थ भाव ठेवूनी । शांतिप्रद तूं तुज नमन ॥१९॥शक्तीस भानूस विष्णूस । शंकराच्या नाना रूपधरास । नाना खेळ करणार्यास । पुनःपुनः नमन करितसे ॥२०॥वेदादीही जेथ मौन । धरिती तेथ काय करूं स्तवन । शिवादी देवही धरिती मौन । तेथ पाड काय आमुचा ॥२१॥मयूरध्वजा करितों नमन । भक्ति दे तुझी एकमन । सर्वेशा तुझ्या क्षेत्रीं निवास पावन । देई देवा गणाधीशा ॥२२॥गणेश ते सर्व वर देती । भक्तितुष्ट त्यांसी म्हणती । जो हें स्तोत्र वाचील जगतीं । अथवा ऐकेल भावयुक्त ॥२३॥तो इहलोकीं भोग भोगून । अंतीं स्वानंद लाभून । ब्रह्मपदाचा लाभ होऊन । धन्यत्वर पावेल अक्षय ॥२४॥दक्षा महान चरित । कथिलें विकटाचें संक्षेपें तुजप्रत । श्रद्धा ठेवितां सतत । सर्वसिद्धिप्रदायक हें ॥२५॥यासम अन्य कांहीं नसत । कोठेंही कांहीं जगांत । हें साक्षात ब्रह्मपद पूर्ण असत । अधिक काय वर्णाचें ॥२६॥हें विकटाचें महिमान । करील पठण अथवा श्रवण । तो नरोत्तम सिद्दि लाभून । धन्य होईल निश्चयें ॥२७॥एक आवर्तन नित्य करील । तो विकटरूप होईल । त्याचें दर्शनही अमल । पावन सर्व जनां होत ॥२८॥जेवढीं अन्य साधनें असत । त्यांनीं जेवढे पुण्य लाभत । त्याहून शंभरपट प्राप्त । पुण्य या खंडाच्या श्रवणानें ॥२९॥कांहीं करितां होमहवन । तैसेंची भजनपावन । अथवा तळीं धर्मशाळा बांधून । सार्वजनिक सेवा करी ॥३०॥तें इष्टपूर्तादिक कर्म । करिता भक्तिपूर्ण मनोरम । त्याहूनही शतगुण पुण्य शोभन । लाभतें खंड हा ऐकता ॥३१॥अन्य पुराणें इतिहासयुक्त । ऐकतां पुण्य जें लाभत । त्याहून अधिक पुण्य प्राप्त । ह्या खंडाच्या वाचनानें ॥३२॥काय वर्णांवें बहुत । जेथ ब्रह्मपति असे वर्णित । त्या विकटाच्या सम जगांत । अन्य कोण संभवेल ॥३३॥सूत म्हणे शौनकाप्रत । ऐसें सांगून मुद्गल थांबत । महायोग्यांस त्या नमित । दक्षप्रजापति हर्षानें ॥३४॥तेव्हां मुद्गल त्यास म्हणत । सांगितलें तुजला विकटचरित । कामासुराचा नाशकर पुनीत । द्विजोत्तमा दक्षा हें पूर्ण ॥३५॥धर्मार्थकाममोक्षदायक । ब्रह्मपर हें पावक । ह्यासम अन्य न सौख्यदायक । आणखी काय ऐकूं इच्छिसी ॥३६॥ऐसें मुद्गलें विचारिलें । तेव्हां दक्षें काय सांगितलें । तें पुढील खंडीं वर्णिलें । सीताराम विनम्र गणेशचरणीं ॥३७॥ओमित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडें विकटचरितसमाप्तिवर्णनं नाम पंचचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।॥ इति श्रीमुद्गलपुराणे षष्ठः खंडः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP