मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ६| अध्याय ११ खंड ६ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ६ - अध्याय ११ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ११ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ भ्रुशुंडी सांगे देवांप्रत । स्वानंदक्षेत्राचा विस्तार पूर्वोक्त । जैसा वर्णिला शास्त्रांत । चौकोनी क्षेत्र हें गणेशाचें ॥१॥ब्रह्मभूतमय साक्षात । बारा योजनें हें विस्तृत । गणेशाच्या पूर्वदिशेंत । शंभर धनुष्यें अंतरावरी ॥२॥द्वार अष्टविंशति प्रमाणयुक्त । त्याच्या अर्ध्यानें विहीन वर्तत । दक्षिणेकडे गणेशापासून असत । द्विगुण ते द्वार पूर्वद्वाराहून ॥३॥पश्चिमेस जें द्वार शोभन । तें दक्षिणांगाच्या द्विगुणाहून किंचित न्यून । गणेशाच्या उत्तरेस असून । पश्चिमद्वार पावहीनाहून किंचित अधिक ॥४॥ऐसा हा क्षेत्र विस्तार । देवसत्तमांनो कथिला समग्र । नऊ खंडाहून भिन्न क्षेत्र । गणेशाचें हें असें ॥५॥अन्य क्षेत्रें प्रल्यकाळांत । लय सारीं पावतात । त्यांचें रक्षण न होत । त्या त्या देवतांकडून ॥६॥पंचतत्त्वें त्रिगुणांसहित । काळांच्या वेगें लय पावत । जेव्हां महाप्रलय होत । ऐसा सृष्टिलयख्यात असे ॥७॥तेव्हां आपापल्या देवतांसहित । क्षेत्रें लय पावती निश्चित । ऐसें योगीजन सांगत । यांत संशय कांहीं नसे ॥८॥महाप्रलयकाळांत । हें गणेशक्षेत्र नाशहीन बनत । आपल्या प्रभावें युक्त । सदासर्वदा तें जाणावें ॥९॥देवेश तैं विचारिती । क्षर जे तें क्षेत्र म्हणती । ऐशी या शब्दाची व्युत्पत्ती । करिता वेदपारंगत ॥१०॥तरी हेच क्षेत्र नाशविहीन । योगींद्रा कैसें राहतें नित्यनूतन । स्वानंद सर्वसंयोगें उत्पन्न । निःसंशय हें सत्य असे ॥११॥परी या क्षेत्रास नामाभिधान । स्वानंद ऐसें लाभलें शोभन । तें कोणत्या कारणें हयाचें ज्ञान । आम्हांसी द्यावें महामुने ॥१२॥भ्रुशुंडि तेव्हां त्यांस सांगत । गाणेश्वरक्षेत्र सर्वमान्य शोभत । ब्रह्मणस्पतीचें हें क्षेत्र विख्यात । ब्रह्मरूप ज्ञात अस ॥१३॥जैसा स्वानंदरूप स्मृत । स्वसंवेद्यात्मक विश्वांत । तैसेंच स्वानंदक्षेत्र ज्ञात । ब्रह्माकार या रूपानें ॥१४॥गणेंशाचा देह सगुणात्मक । मस्तक होतें निर्गुण प्रतीक । त्यांच्या योगें जैसा देह एक । तैसें हे क्षेत्र ज्ञात असे ॥१५॥भ्रांतिरूप सिद्धि होत । स्वयं देहधारी जगांत । भ्रांतिधारकरूपा वर्तत । बुद्धि क्षेत्र तैसें ज्ञात असे ॥१६॥संगहीनतेनें स्मृत । स्त्रीपुरुषभावसुक समस्त । गणेशाच्या सिद्धिबुद्धींच्या जगांत । तैसें हे क्षेत्र कीर्तित असे ॥१७॥अधिक काय करावें वर्णन । गणेशाच्या क्षेत्रांचे शोभन । जें जें असतें तें ब्रह्ममय पावन । प्राकृतरूप तें नसे ॥१८॥जें जें गणराज संबंधित । तें तं ब्रह्मवाचक असत । लोकादिक मुनींद्र वर्णित । ब्रह्मणस्पति लोक नावें ॥१९॥या गणेशक्षेत्रापासून । अन्य क्षेत्रें जाहलीं उत्पन्न । आसमंतांत तेथ येतां मरण । देवांनो फलप्रद तीं होतात ॥२०॥ तीं धर्मअर्थकाममोक्षप्रद कथित । गाणेश पांचवें ब्रह्म असत । ब्रह्मभूतप्रद प्रख्यात । ऐसें शास्त्रें सांगती ॥२१॥द्वारयात्रा करितां लाभत । चारही पुरुषार्थ भक्त । क्षेत्रीं मरण येतां होत । त्या चारांच्याही अतीत नर ॥२२॥तो तत्क्षणीं त्या संस्कारें होत । ब्रह्मभूत यांत संशय नसत । सुरासुरमयब्रह्मवाचक असत । गाणेश ब्रह्माचें वाचक ॥२३॥हयाच्या साक्षात्कार शिवादिदेवांप्रत । म्हणोनि हें दैवक्षेत्र ज्ञात । पुढें कमलमस्तकस्थ होत । तदर्नतर आसुर जाहले ॥२४॥त्याच्या योगें स्वसंवेद्य ज्ञात । सर्वारंभीं तेंच असत । चारांतली द्वारयात्रा भावयुक्त । त्यास सर्व प्राप्त होई ॥२६॥जो क्षेत्रस्थ नित्य करित । द्वारयात्रा तो क्षेत्रस्थ लोकांत । वंदनीय होऊन अंतीं होत । ब्रह्ममय निःसंशय ॥२७॥गणेश क्षेत्रासम नसत । अन्य कांहीं ब्रह्मांडांत । चार पुरुषार्थांच्या अतीत । पाचवें हें ब्रह्म चतुर्मय ॥२८॥पंडित गणेश्वर क्षेत्र वर्णित । तिविध ऐसें ग्रंथांत । बाह्यांतरादि क्षेत्रें तैं सांप्रत । देवनायकांनो ऐका ॥२९॥गर्भागार आर्धें योजन । गणेशाचें असे निवासस्थान । तेथ गणपतीचे अवतार शोभन । जाहले असती असंख्य ॥३०॥गणेशभक्त मुद्गल राहत । गणराजाच्या सेवेस्तव तेथ । तें चौकोनी चतुर्द्वारयुक्त । भक्तसिद्धिपूरक क्षेत्र ॥३१॥गणेशापासून पूर्वदिशेंत । सहाशें धनुष्यांहून न्यून अंतरांत । सर्वार्थद द्वार असत । तेथ बुद्धि वसतसे ॥३२॥ती साक्षात विद्यांनी सेवित । कलांनी विविध तिज पूजित । तो पुरुष ज्ञानवान होत । ऐसा पूर्वद्वार महिमा ॥३३॥गणेशापासून दक्षिण भागांत । दुप्पट अंतरावर असत । पूर्वद्वाराच्या अंतराहून गर्भाश्रित । दक्षिणद्वार महान ॥३४॥तेथ प्रमोदकादि गण सतत । ब्रह्ममुखी निमग्न असत । त्यांच्या पूजेनें ते होत । गाणपत्य पददाते ॥३५॥गणेशापासून पश्चिमभागांत । दक्षिणद्वाराच्या दुप्पट अंतरावर वर्तत । पश्चिम द्वारीं त्या सिद्धि वसत । पूजनें तिच्या सिद्धि लाभ ॥३६॥पश्चिमद्वारच्या पादन्यून । अंतरावरीं उत्तरद्वार असून । तें गणेशाच्या संमुख शोभन । चौसष्ट योगिनी तेथ राहतो ॥३७॥त्या सर्व साता परिवारयुक्त । योगसिद्धि तेथ विलसत । त्यांच्या पूजनमात्रें होत । योगज्ञ मानव या जगीं ॥३८॥त्यास अंतर्धानादिक लाभत । नाना योगसिद्धि संशयातीत । गर्भागाराची जो यात्रा करित । नरोत्तम नित्य अथवा चतुर्थीसी ॥३९॥त्याचे सर्व अर्थकाम पूर्ण होत । ऐसी गर्भागार यात्रा असत । मानव देह जेव्हां येत । क्षेत्र यात्रा करण्यासी ॥४०॥ तेव्हां भक्तीनें गर्भगृहाची । यात्रा करावी साची । ऐसी अपेक्षा प्रेमाची । भक्तिभावयुक्त सदा ॥४१॥गर्भागाराच्या पुढें असत । तें क्षेत्र देवालय ख्यात । तेथ स्वर्गस्थ देव वसत । सेवनोत्सुक सर्वदा ॥४२॥देवांचें आलय तें देवालय । वसतिस्थान तें हृदय । चौरस तीन जोजनें होय । विस्तार त्याचा चार दारें ॥४३॥पूर्वेस गणेशापासून । चौदाशें धनुष्याहून किंचित् न्यून । पूर्वद्वार तें महान । तेथ भैरवराजेंद्र वसती ॥४४॥तो नग्न सर्व भयंकर । त्रिशुलधर मोकळे केस उग्र । आपुल्या तेजानें युक्त थोर । त्याच्या पूजनें वांछित लाभ ॥४५॥नाना कर्मांपासून उद्भूत । यातना त्या पूजका न बाधत । पूर्वद्वाराच्या दुप्पट अंतरावर स्थित । दक्षिणद्वार शोभन ॥४६॥तेथ शिव नीलकंठ देवेश राहत । त्याची पूजा जो नर करित । तो बंधनापासून मुक्त । होतो यांत संशय नसे ॥४७॥तो विषबाधेपासून मुक्त । ऐसें माहात्म्य येथ ख्यात । दक्षिणद्वाराच्या दुप्पट अंतरीं असत । पश्चिमद्वार सुंदर ॥४८॥तेथ जो कृत्तिवास राहत । तो द्वारदेव पश्चिम द्वारि स्थित । त्याच्या पूजनमात्रें होत । आसुर कार्य नष्ट सारें ॥४९॥त्या यात्रामात्रें लाभत । ईप्सित सारें मानवाप्रत । पश्चिमद्वाराच्या पादहीन अंतरावर वर्तत । उत्तरद्वार गणनाथाचें ॥५०॥त्या उत्तरद्वारांत । देवांनो भीमेश्वर स्थित । त्याची यात्रा जो करित । तो नर सत्ता समन्वित होय ॥५१॥त्यास आरोग्य निरंतर लाभत । ऐसें हें तृतीय क्षेत्ररूप उक्त । चार द्वारांनी युक्त । मयूरक्षेत्र परमश्रेष्ठ ॥५२॥ह्या मयूर क्षेत्राच्या आसमंतात । चौकोनी योजनपर ज्ञात । देवक्षेत्र पुनीत । आतां ऐका मृत्युनिर्णय ॥५३॥क्षेत्राच्या पूर्व विभागांत । नरास जरी मरण येत । तर तो जाईल वैकुंठांत । तें क्षेत्र जाणा वैष्णव ॥५४॥जो दक्षिणेस योजनमध्यांत मृत । होईल तो जात कैलासांत । तें क्षेत्र शैवक्षेत्र म्हणत । ऐसें परंपरागत असे ॥५५॥मयूराच्या पश्चिम क्षेत्रांत । योजनस्थ जो नर मृत । तो शक्तिलोकास जात । शाक्त क्षेत्र तें जाणावें ॥५६॥मयूराच्या उत्तरेस जो योजन स्थित । मरेल तो नर जात सौरलोकांत । तें सूर्यक्षेत्र विख्यात । ऐसें हें माहात्म्य क्षेत्राचें ॥५७॥प्रमाणासहित तुम्हां सांगितले । त्याचें श्रवण पठण केलें । तरी पाप सारें नष्ट झालें । ऐसा अनुभव येईल ॥५८॥तेथ जाऊन महेशांनो पूजन । मूर्ति स्थापून करा प्रसन्न । तुष्ट होतो गजानन । सिद्धि पावाल निश्चित ॥५९॥ओमिति श्रीमदांत्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडे विकटाचरिते क्षेत्रप्रमाणवर्णनं नाम एकादशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP