खंड ६ - अध्याय २३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ देवेश भ्रशुंडीस विचारिती । मयूरक्षेत्रांस तीर्थें किती । त्यांत मुख्यत्वें कोणाची गणती । सांगावें योगींद्रमुख्या ॥१॥
जें तीर्थांचें तीर्थरूप असत । सर्व सिद्धी देई सतत । भ्रुशुंडी तेव्हां त्यांस सांगत । संपूर्ण क्षेत्र ब्रह्ममय ॥२॥
तेच तीर्थांचें तीर्थ ख्यात । गाणेश तीर्थ तें मुख्य पुनीत । महेश्वरही चतुर्विध जग वसत । पांचवें ब्रह्म तें हेंचि असे ॥३॥
विविध अर्थांनी भासत । पंच विध सर्व जगतांत । गंगा यमुना सरस्वती ज्ञात । महानदी त्रिगुणरूपा ॥४॥
त्यांच्यापासून उत्पन्न । सर्व नद्या वाहती प्रसन्न । चवथी नदी ब्रह्मकमंडलूतूउन । उत्पन्न होते स्र्वतीर्थांख्या ॥५॥
त्या चौघांच्या संयोगें होत । पांचवें संपूर्ण ब्रह्मजात । तेंच तीर्थरूपें प्रकटत । गणेशतीर्थ नांवानें ॥६॥
गणेशाच्या मायेनें कल्पित । भूस्वानंदमय क्षेत्र प्रख्यात । तेथे वघ्नेश स्नानास जात । अंकुशें पृथ्वी भेदिली ॥७॥
तेव्हां ब्रह्ममयतीर्थ प्रकटात । त्याच्या सेवेस्तव विनीत । तेथ तो स्नानादि सर्व कार्ये करित । अक्षय जळपूर्ण कुंड असे ॥८॥
आदरानें त्याचें नांव ठेवित । गणेशकुंड ऐसें विख्यात । त्याच्या दर्शनमात्रें लाभत । भुक्तिमुक्ति नरांसी ॥९॥
जरी त्यातील जळाचा स्पर्श धडत । तरी पुण्य जोडें अगणित । त्या साक्षात्‍ ब्रह्ममयाचें संचित । माहात्म्य वर्णनातीत असे ॥१०॥
ब्रह्मकमंडलूंतून जी उत्पन्न । जी मुक्तिदा तुरीया पावन । स्नान करितां तिच्यांत जन । मुक्त होती ही शास्त्रोक्ती ॥११॥
भागीरथी तिसरी नदी असत । स्नान करितां तिच्यांत । स्वर्गदात्री स्वर्नदी ज्ञात । विशेषानें महेश्वरांनो ॥१२॥
त्यानंतर सरस्वती ख्यात । द्वितीयपद धारिणी ती शोभिवंत । तीन दिवस स्नान करित । नर तींत तरी त्यास स्वर्ग मिळें ॥१३॥
त्यानंतर स्थूलरूपा यमुना असत । महानदी ही साक्षात । सात दिवस स्नान करितां तिच्यांत । स्वर्गप्रद होत असे ॥१४॥
त्या प्रमुख नद्यांपासून । अन्य नद्या असंख्य शोभन । संक्षेयें पंच नद्याचें वर्णन । केलें असे संक्षेपें ॥१५॥
ह्याविषयीं इतिहास पुरातन । सांगतों ऐका तो पावन । गुर्जन देशांत राजा महान्‍  । भद्र नामक आचारहीन ॥१६॥
स्वधर्म सोडून तो नित्य भोगित । विषय मांसस्त्रीमद्यरत । नाना पापें स्वैर करित । ऐसा दुर्बुद्धी दुष्ट होता ॥१७॥
एके दिनीं मद्य पिऊन । झिंगला होता तो नृप दुर्मन । आपुल्या तरुण पुत्रीस पाहून । कामासक्त जाहला ॥१८॥
एकांतांत तिज पकडित । तिच्या सवें कामक्रीडा करित । हाहाकार ती करित । परी रतिसुख भोगिलेंच त्यानें ॥१९॥
ऐसी बहुविध पापें घडत । किती वर्णावीं मी येथ । त्याचा निर्देशही पीडा देत । ऐसा होता भद्र राजा ॥२०॥
तो मृत होतां यमदूत । पकडून त्यास यमगृहीं नेत । बांधून त्यासी ताडित । तों एक आश्चर्य तेथ घडलें ॥२१॥
यमसदनीं त्यास जेव्हां नेती । तेव्हां सूर्यसदृश तेजस्वी अती । विमान उडालें अंतराळीं शीघ्रगति । गणेशकुंड द्रष्टयाचे ॥२२॥
त्याच्या अंगवायूनें भद्रनृपति । पापी संस्पृष्ट झाला जगतीं । त्यायोगें पापहीन होऊनही नेती । यममंदिरीं यमदूत तयासी ॥२३॥
यमानें त्यास नरयोनींत । जन्मास घातले वैश्यकुळांत । देवधर्माख्य़ नामें तो सतत । स्वधर्मापालन करीतसे ॥२४॥
स्वर्गांतून जेव्हां तो पडला । तेव्हां तें उत्तम कुंड स्मरता झाला । त्या संस्कारयोगें गेला । मयूरेशाच्या सन्निध ॥२५॥
गणेशकुंड पाहून । त्यास झालें पूर्वजातिस्मरण । तदनंतर क्षेत्रांत जाऊन । त्यानें कुंडपूजा केली ॥२६॥
कुंडसान्निध्यांत मरत । तैं तो ब्रह्मभूत होत । ऐसे संस्कार महिमान असत । देवपांनो पूर्वजन्मींच्या ॥२७॥
देवेश तेव्हां विचारित । गणेशकुंडी तो दुष्ट असत । त्याची जाति कोणती असत । सांगावें आश्वर्य सारें ॥२८॥
भ्रुशुंडी तेव्हां सांगत । चांडाळ कोणी पापी वर्तत । तो नित्य पापें करित । द्रव्य चोरी जनांचें ॥२९॥
एकदा तो मयूरेशक्षेत्रीं जात । द्र्व्यलोभें लोकांस मारित । परी त्यास मयूरेशसान्निध्यें भय वाटत । आपणास मारील म्हणोनी ॥३०॥
तो तेथून पळून जात । लोक यात्रेंत मग्न असत । ते मज मारण्या न येत । ऐसा विचार तो पापी करी ॥३१॥
पळत असतां गणेश्वराचें कुंड पाहत । तेथचि तो मरण पावत । क्षेत्र सोडून दूर जात । त्या दुष्टासी देव स्वर्गीं नेती ॥३२॥
विषय प्रिय भोगबुद्धियुत । परी गणेशकुंड दर्शनें पुनीत । पापें सर्व जाहलीं विनष्ट । भक्ति मुक्ति प्राप्त झाली ॥३३॥
ऐसेंच एक चरित । ऐका देवहो कुंडसंबंधी अद्‍भुत । कोणी एक द्र्व्यलोभी येत । वैश्य मयूरक्षेत्रांत ॥३४॥
तो जेव्हां क्षेत्रांत प्रवेशत । तेव्हां त्याचीं पापें बाहेर थांबत । तो शुद्ध होऊन हिंडत । द्रव्याकारणें क्षेत्रांत ॥३५॥
तेथ यात्रा करणारे जन । सांगती परस्परांसी प्रसन्न । गणेशकुंडाचें महिमान । तें ऐकिलें त्या वाण्यानें ॥३६॥
तो मंदबुद्धि मनीं विचार करित । गणेशकुंड दर्शनें लाभत । भक्तिमुक्ति त्वरित जगांत । हें वचन सत्य असेल का ॥३७॥
म्हणून तेथें विक्रीसाठी जाईन । तेव्हां कुंडाचें दर्शन घेईन । ऐसा विचार करून । खाद्य पदार्थ घेऊन गेला ॥३८॥
तें कुंड पाहून म्हणत । देवा मज मुक्ति लाभो त्वरित । तदनंतर मयूरक्षेत्र सोडून जात । पुनरपि आपुल्या गृहासी ॥३९॥
तेथ स्वल्प कालांतरें मृत्यु पावत । तै विमान आलें अवचित । त्यांत बसून शुक्ल गतीनें जात । मोषधामास तो वैश्य ॥४०॥
गणेशकुंडाचें घेतां दर्शन । ऐसें फळ लाभे महान । दुसरें एक वृत्त पुरातन । सांगतों तें ऐकावें ॥४१॥
मेघमणी नांवाचे दोन शूद्र जन । मालवदेशीय सेवारत विनीतमन । कोणा क्षत्रियाच्या आश्रया जाऊन । सेवा करिती पुत्रासहित तयाची ॥४२॥
ते एकदा प्रेमसंयुक्त । यात्रार्थ काशीस जात । ते शूद्र पुत्रा सहित ने । स्वसेवेस्तव प्रवासांत ॥४३॥
मेघ मार्गात मरत । त्याचा पुत्र त्याचें दहन करित । तेव्हां आवंतीय द्विज गोळा करित । अस्थि आपुल्या पित्याच्या ॥४४॥
मणि त्यास विचारित । अस्थि कोठें टाकशील सांग आम्हांप्रत । तो म्हणे गणेशकुंड अद्‍भुत । तेथ अस्थि मीं सोडिन ॥४५॥
ऐसें करितां मुक्ति लाभत । म्हणोनि मी पित्याच्या अस्थि नेत । तेथेंचि हें ऐकून ठरवित । तो शूद्रही तैसेंचि करण्याचें ॥४६॥
काशींत दुःखयुत मणि मरत । त्याचा पुत्र अस्थिसंचय करित । मयूरक्षेत्रीं जाण्या निघत । तेव्हां क्षत्रिय त्यास म्हणे ॥४७॥
त्या शूद्रपुत्राची निर्भर्त्सना करून । म्हणे काशी सोडून । मयूरक्षेत्रीं अस्थि विसर्जन । करण्या मूढा कां जासी ॥४८॥
तेव्हां तो त्यास सांगत । पित्याची आज्ञा ऐसी असत । ती निरंतर मज मान्य असत । तेवढयांत तो बाह्मण आला ॥४९॥
त्या शास्त्रवेत्या ब्राह्मणास । करून नम्रपणें वंदनास । क्षत्रिय गृहस्थ विचारी तयास । पहाहो दुराग्रह या शूद्राचा ॥५०॥
तो सर्व वृत्तान्त ऐकून । जनार्दननामा तो ब्राह्मण । वेदसारज्ञ बोले वचन । क्षत्रियास त्यास वेळीं ॥५१॥
चतुर्विध तीर्थे असतीं । तैसींच क्षेत्रें या जगती । पांचवें गणराजाचें शोभतें अती । क्षेत्र तैसें तीर्थ जाण ॥५२॥
ब्रह्मणस्पति नामक जो असत । तो गणेश वेदोक्त । त्याचें लीलामात्र । वर्तत । सर्व नाना ब्रह्ममय ॥५३॥
काशींत शास्त्रवादज‘झ असतीं । ते अस्थि तेथेंचि नेती । अन्य क्षेत्रवासी ही जगतीं । अस्थि विसर्जिती मयूरक्षेत्रीं ॥५४॥
तें ऐकतां ब्राह्मणवचन । शुद्र झाला संशयहीन । जनार्दनासी त्या प्रणाम करून । परतला आपुल्या घरासी ॥५५॥
क्षत्रिय यात्रा संपवून । घरी गेला परतून । ते शूद्र अस्थि घेऊन । मयूरक्षेत्रांत नंतर गेले ॥५६॥
गणेशकुंडाची पूजा करून । त्यांनीं केलें अस्थिविसर्जन । शास्त्रविधान अनुसरून । यात्रा करिती आदरें ॥५७॥
जेव्हां शूद्र ते घरीं परतत । तेव्हां अस्थिविसर्जनप्रभावें येत । मेघास नेण्या स्वानंदलोकांत । कैलासांतून गणेशगण ॥५८॥
शंकर लोकास त्यास नेती । मणिशूद्रासही अति प्रीति । ब्रह्मभूत ते करिती । मणिमेघांसी पुण्यप्रभावें ॥५९॥
ऐसे नानाविध जन पावले । तेथ विशेष सिद्धि पुण्यबळें । त्याचें वर्णन जाणा झालें । शब्दातीत अपार ॥६०॥
हें गणेशकुंडाचें महिमान । ऐकेल वा वादिल जो जन । त्यायोगें पुण्यवान होऊन । त्यास सर्वही ईप्सित लाभे ॥६१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते गणेकुंडचरितवर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP