मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ६| अध्याय १७ खंड ६ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ६ - अध्याय १७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय १७ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिवादि देव विचारिती । त्या भ्रुशुंडी मुनीप्रत । सांप्रती । सांग आम्हांस रहस्थउक्ति । कैलासप्राप्ती कां प्रथम ॥१॥गणेशास जे महाभाग भजती । ते प्रथम कैलासीं जाती । ऐसें कां घडतें जगतीं । त्याचें कारण सांगावें ॥२॥भ्रुशुंडी म्हणे तयांप्रत । जे गणेशभक्त कामनायुक्त । ते विषयासक्त अंतरांत । म्हणोनि जाती कैलासीं ॥३॥त्यांच्या स्वानंदांत न प्रवेश । निष्काम जे भक्तेश । त्यांचें जन्मनाशक सर्वेश । पद हें स्वानंद नाम असे ॥४॥म्हणोनि कैलासावर जाऊन । सारे भोग भोगून । गणेशाम पूजितां निष्काम । होती ते भक्त निःसंशय ॥५॥जे विघ्नेशास अनन्यमनें भजत । ते पुनः न जन्मत । भुक्तिमुक्तिप्रिय जे असत । कैलासातून पतन त्यांचें ॥६॥कैलासांत गणपासमीप जाती । परी भोगयुक्त चित्तीं । ते पुनरपि मृत्युलोकांत पडती । यांत कांहीं न संशय ॥७॥परी करितां विघ्नेश भजन । अंती निष्पाप होऊन । स्वानंदलोकीं जाऊन । ब्रह्मभूत ते होती ॥८॥गणेशच हें सर्व रचित । त्याची क्रीडा ही चाले अद्भुत । आता क्षेत्रबाह्म जी देवभूमि वर्तंत । तिचें माहत्म्य सांगतसे ॥९॥दंडकारण्यीं शूद्र असत । कोणी एक दरिद्री अत्यंत । तो भटके वसुधातळावरी चिंतित । क्षुधातृषार्त ज्वरयुक्त ॥१०॥देवभूमीच्या पूर्वद्वाराबाहेर । मरून पडला तो शूद्र । वैष्णव गण येती सत्वरा । विमान घेऊन त्या स्थळीं ॥११॥त्या शूद्रास वैकुंठांत । घेऊनि जाती आदरयुक्त । पूर्वद्वारापासून योजनपर्यंत । वैष्णवक्षेत्र ख्यात असे ॥१२॥त्या क्षेत्रप्रभावें सिद्धि लाभत । किती जन त्याची गणना नसत । आतां दक्षिणद्वाराचें चरित । ऐका शिवभावाख्य ॥१३॥देवदेवेशांनो संक्षेपें सांगेन । एका ब्राह्मणाचें जीवन । वृत्तिकारणें संभवून । तेथें कैसें उद्धरलें ॥१४॥तो ब्राह्मण श्रमयुक्त । दुसर्या दिवशीं मृत्युंगत । शैवभूमीच्या महात्त्वें जात । कैलासक्षेत्रीं तो द्विज ॥१५॥पश्चिमद्वारभागीं प्रसिद्ध । शाक्त क्षेत्रसुविशद । त्याचें क्षेत्र दशयोजनाबद्ध । चांडाळ तेथ कोणी आला ॥१६॥तो विदर्भवासीचा निवासी । कार्यार्थ येतां क्षेत्रासी । ज्वरप्रभावें तयासी । पीडा जाहली अत्यंत ॥१७॥तो मेला पाचवे दिनीं । क्षेत्रप्रभावें शक्तिलोकीं जाऊनी । शाक्तसंभव माहात्म्य जनीं । सुप्रसिद्ध हें सतत ॥१८॥उत्तरद्वारीं क्षेंत्र । सौरलोकप्रद पवित्र । तेथ महाभागहो सर्वत्र । पुण्यशाली भूमि असे ॥१९॥तेथ भाग्यगौरवें मृत्यु पावत । सर्पदंशाने तो भिल्ल विनीत । सौरलोकांत तो जात । भोग भोगी आनंदानें ॥२०॥अनेक वर्णांश्रमाचे नरनारी । भ्रष्ट जनांचाही उद्धार करी । ऐसें हे मयूरक्षेत्र जगभरी । सुप्रसिद्ध अवर्णनीय ॥२१॥या मयूरक्षेत्रीं मरण येत । तरी जी सिद्धि जन लाभत । त्या विषयींच महिमा अद्भुत । कथितों तुजला संक्षेयें ॥२२॥परस्त्रीलालस एक चांडाळ । पापात्मा आंध्रदेशीय खल । वनांत गाठोनी लोक दुर्बल । हनन करी सदा तयांचें ॥२३॥तो दुष्ट नाना पापयुत । त्याचे दोष वर्णनातीत । एकदा तो दैवयोगें जात । मयूरक्षेत्रीं मित्रांसह ॥२४॥त्याच्या भाच्याचें लग्न असत । म्हणोनी भगिणीगृही तो खल जात । त्याचीं पापें बाहेर राहत । त्या क्षेत्राच्या प्रभावें ॥२५॥जेथें कोठें पापें घडती । तीं सर्व नरासवें जाताती । परी तीं मयूरक्षेत्राबाहेर थांबती । प्रवेश कोणी करी तेव्हां ॥२६॥ऐसी पापें प्रतिक्षापर । मयूरक्षेत्राबाहेर । पडतां नर बाहेर । पुनरपि प्रवेशती शरीरांत ॥२७॥ऐश्या परी क्षेत्रांत । शुद्ध होऊन जन वसत । परी क्षेत्राबाहेर जात । तरी पुनरपि होई पापयूक्त ॥२८॥म्हणून मयूरक्षेत्राचा त्याग न करावा । पापांचा त्रास टाळावा । हा भावार्थ जाणून घ्यावा । भक्तजनांनो ॥२९॥जेव्हां कोणी नर स्वगृहीं चिंतित । मयूरेशदर्शना जावें विनत । तेव्हां त्याची पापें मनांत । म्हणती भयंकर विघ्न हें ॥३०॥जर हा मनुष्य मयूरक्षेत्रीं जाईल । तर आमचे हाल होतील । आम्हांसी राहण्या स्थळ । कोठें मग मिळेल ? ॥३१॥ऐसा विचार करून । त्याचीं सर्व पापें एकवटून । त्या नरासी पीडा निर्मून । व्यग्र ठेवण्या प्रयत्न करिती ॥३२॥त्याची द्रव्यहानी करिती । पशु पुत्रादींस मारिती । ऐसी नानाविध योजिती । हानि पापें निःसंशय ॥३३॥देवसत्तमहो त्यायोगें पीडित । यात्रेस जाण्याचें करी रहित । म्हणोनि सर्व संकटें उपेक्षून सतत । मयूरेशाचा आश्रय घ्यावा ॥३४॥जरी पापें त्यास छळिती । अति दुष्ट तयांची कृति । परी मयूरक्षेत्रीं भक्त जाती । तेव्हां तीं काय करतील ? ॥३५॥कांहीं करूनी मयूरक्षेत्रांत । निवास करावा सतत । ब्रह्मभूय कारणें जगांत । ख्याती ऐशी जाणावी ॥३६॥अन्यत्र विविध राजभोगें युक्त । मयूरक्षेत्रीं जरी दारिद्रययुत । तरी तें दारिद्रय श्रेष्ठ मानित । गणेशभक्त आनंदानें ॥३७॥मयूरक्षेत्री मरण लाभत । तो नर स्वानंदाप्रत जात । अन्यत्र जरी मृत्यु भोग प्राचुर्यांत । तरी जन्ममृत्यूच्या वश होईल ॥३८॥असतां विषयासक्त चित्त । जो मयूरेशाचा आश्रय घेत। त्या नरा यातना बहु होत । सांगतों कथा याविषयीं ॥३९॥एक अंत्यज होता राहत । बहिणीच्या घरी मयूरक्षेत्रांत । त्या चांडाळास साप चावत । त्या विषानें मरण पावला ॥४०॥गणपतीचे गण विमान । घेऊन आले तेथें तत्क्षण । त्या अंत्यजासी घेऊन । गेले स्वानंदलोकाप्रत ॥४१॥मयूरक्षेत्रीं राहून । केलें नव्हतें पाप म्हणून । तो नीच योनींत जन्मला असून । ब्रह्मस्थ अंतीं जाहला ॥४२॥या क्षेत्रीं जो मृत्यु पांवत । तो होय सदा ब्रह्मभूत । हें चरित्र वर्णनातीत । असंख्य जन मुक्त झाले ॥४३॥पशुपक्षीही मुक्त । मरण पावता झाले मयूरक्षेत्रांत । ऐसेंचि एक विचित्र वृत्त । सांगतो ऐका एकचित्तें ॥४४॥एक वाणी आपले गाढव घेऊन । कार्यास्तव गेला प्रसन्न । अन्नादी भार लादून । गर्दभाच्या पाठीवर ॥४५॥मयूरक्षेत्रीं पोहोचले । तेव्हां तेथ काय घडलें । तें गाढव अतिभारें मेलें । ब्रह्मभूत झालें तत्काळ ॥४६॥पशु जातींत जन्मूनही मुक्त । जरी एक गर्दभ होत । तरी मानव मुक्त होईल यांत । आश्चर्यं कोणतें वाटावें ॥४७॥ऐशियापरी क्षेत्रप्रभावें लाभले । असंख्य नर सिद्धि पावले । हें क्षेत्र माहात्म्य वाचिलें । ऐकिलें वा तरी शुभ ॥४८॥दुसर्यास वाचून दाखवित त्यासही पुण्य लाभत । वक्ता श्रोता लभय लाभत । जें जें मनीं वांछी तें ॥४९॥ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते मयूरक्षेत्रमरणप्राप्तिमाहात्म्यवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP