मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ८२

उपासना खंड - अध्याय ८२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

सहस्त्रार्जुनें शरांनीं, वधिलें दंपत्य रेणुका मुनिसी ।

उत्तरकार्य करी सुत, दत्तात्रय सांगती जशा विधिसी ॥१॥

सारुन विधीस जाती, कोल्हापुरिं भोजनास ते दत्त ।

सुतकान्न वर्ज्य शास्त्रीं, करण्यासी लिखित वर्तती दत्त ॥२॥

कृत्य करुन ते गेले, व्याघ्र शिरें दिवस पांचवा होता ।

जननीस परशुरामें, आठविलें भिउन त्यांस कीं वधतां ॥३॥

मातेचा देह तिथें, झाला नव्हता सुपूर्ण तो व्यासां ।

नुसतें शीर बघे हा, प्रकार घडला अपूर्ण कृत्य असा ॥४॥

होतां सपिंडिकरणा, आठवितां जर सुपूर्ण ती माता ।

दिसली असती त्याला, कृत्याचें तत्त्व साच तो बघतां ॥५॥

तेरा दिवसांवेरी, कृत्य करी सांगतें यथाविधिनें ।

दानें बहूत विप्रां, देउन ऐका सुवृत्त मोदानें ॥६॥

जननीस परशुरामें, आठवितां प्रकट रेणुका शीर ।

आहे तेथें अजुनी, स्कंदपुराणीं लिखीत विस्तार ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP