मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय २५

उपासना खंड - अध्याय २५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कुंडिनपुरांत भूपति, भूपति नामें प्रसिद्ध कौंडिन्य ।

दैववशें तो भूपति, अ-सुत असा असुन पावला निधन ॥१॥

ऐकुन वार्ता कानीं, भार्या सुलभा तसेच ते मंत्री ।

तैसे अश्रित सर्वहि शोकानें गाळिती असूं नेत्रीं ॥२॥

दुर्धर प्रसंग येतां, सुचत नसे त्यास त्या प्रसंगाला ।

पाहून पातला तो, राज-गुरु शांतवीत सकलांला ॥३॥

उपदेश करी त्यांना, स्वार्थासाठीं करुं नका शोक ।

मर्त्याच्या वदनीं तें, पडतें नयनांमधील कीं उदक ॥४॥

मर्त्याचा देह पडे भूमीवर फार वेळ अग्न्य विधी ।

वाचून भार होतो, भूमीला शास्त्रमार्गिं हाच विधी ॥५॥

जे जे जन्मा येती, ते ते मरती अशी असे रीति ।

शशि-मित्र कुलामाजी, जे नृप मृत ते तयां नसे गणती ॥६॥

सतिला सहगमनाची, शास्त्रामाजी अशी असे आज्ञा ।

सांगे राज-गुरु तो, सुलभेला धर्म-शास्त्रिं जी आज्ञा ॥७॥

भूप-शवाच्या गुरु तो, सांगे सकलां करा तयारीला ।

षोडस विधींस आधीं, योजावा धर्म-सूत या विधिला ॥८॥

उत्तरकार्य करावें, धर्मापरि धर्म-सूत होऊन ।

भूपति अ-पुत्र म्हणुनी करणें आहे तुम्हांस जाणून ॥९॥

ऐसें ऐकुन वचना, सर्वांनीं शोक पूर्ण आवरिला ।

मंत्री मुख्य सुमंतें, पुत्रापरि सारिला असे विधिला ॥१०॥

सर्व जनांनीं दिधल्या, तीलांजलि भूप-रुप अश्म्याला ।

सुलभेस शांत करुनी, गेले सारे निवास-स्थानाला ॥११॥

सिंहासनिं कोणासी, स्थापावें हा विचार लोकांस ।

पडला असतां तेथें, मुद्गल आला त्वरीत नगरास ॥१२॥

मुद्गल वदे प्रधाना, राजाचा भव्य एक गज-महन ।

फिरवा समाजवृंदीं, शुंडांग्रीं रत्‍नमाल देऊन ॥१३॥

तो गज ज्याच्या कंठीं, अर्पिल ही माळ त्यास लोकांनीं ।

राज्य तयाला देऊन, राजा करणें असे वदे ज्ञानी ॥१४॥

मुद्गलवाणी रुचली, सर्वांनीं मानिली मनोभावें ।

नूतन भूपति होतां, सर्वांनीं त्या अभीष्ट चिंतावें ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP