मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ६८

उपासना खंड - अध्याय ६८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

पतीआज्ञेनें आश्रया तिथें गेली ।

घेइ दूर्वाही सुरवरां हेम तोली ।

देइ हेमासी याचिलें तुम्हां नाथें ।

असें ऐकुन तो वदत तीस तेथें ॥१॥

जाइ घेउनियां कोशगृहीं दूर्वा ।

देई दूतांसह पाठवी सती दूर्वा ।

दूत सांगे त्या प्रमुख कुबेरास ।

देइ हेमासी हरळिभार हीस ॥२॥

कुबेरानें ती घातली तुला-तकटीं ।

द्वितिय तकटीं हेम भरी ताठीं ।

तकट हेमाचें उंच असे साचें ।

म्हणुन घाली तो हेम सर्व साचें ॥३॥

बसवि तकटीं त्या आपुली सती ऐका ।

नसे दूर्वेचें तकटवई ये का ।

म्हणुन तकटीं तो आपण बसे खास ।

वरी दूर्वेचें तकट न ये खास ॥४॥

बसे हत्तीसह इंद्र जरी त्यांत ।

वरी दूर्वेचें तकट नसे येत ।

बसे विष्णू नी शंभु तयामाजी ।

बघुन कौतुक हें म्लान वदन सहजीं ॥५॥

(गीति)

ऐसें बघून कौतुक, सतिसह सारे त्वरीत सुर येती ।

कौडिण्य मुनी होते, तेथें येउन तयांस ते वदती ॥६॥

कौडिण्य मुनी ऐका, भक्तिपुरःसर मनेंच गणपतिला ।

अर्पण करितां एकचि, दूर्वेचें ये महात्म्य कथि सकलां ॥७॥

ऐसें बोलुन पूजन, देवांनीं त्या स्थळींच तें केलें ।

दूर्वा पाहुन भक्ती, दाखविली साच हें नवल झालें ॥८॥

भक्तजनांना गण ते, सांगति तें वृत्त ऐकती सकळ ।

चांडाळीनें तेव्हां, शेकाया आणिला असे कवळ ॥९॥

त्यांतिल दूर्वा पडती, मस्तकिं प्रभुच्या त्वरीत ही मात ।

होती तिघांजणांची, पुण्याई हें खरोखरी उचित ॥१०॥

गणपति प्रसन्न झाले, उद्धरिलें त्या तिघांस एकसरें ।

ऐकुन भाषण त्यांचें, भक्तांना त्या सभेंत एकसरें ॥११॥

स्नानें करुन त्यांनीं, दूर्वांनीं पूजिलें गणेशाला ।

होई प्रसन्न त्यांना, त्यांचाही मोक्ष हा त्वरें केला ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP