मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ७१

उपासना खंड - अध्याय ७१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

भृगु भूपतीस सांगे, कथन मनोरम करुन विस्तारें ।

पुसती व्यास विधीला, तें कथितों ऐकणें कथन सारें ॥१॥

पूर्वी व्रतप्रभावें, तरले ते कोण कोण सांगावें ।

ऐकुन प्रश्न तयांचा, सांगे विधि तें सुपद्य ऐकावें ॥२॥

स्कंदाच्या प्राप्तिस्तव, गिरिजेनें त्या व्रतास आचरिलें ।

सिंधू प्राशन करण्या, पूर्वी मुनिंनीं व्रतास या केलें ॥३॥

नळ शोधनास सति ती, पूवी व्रत हें करुन यश मिळवी ।

मी या व्रतप्रभावें, सृष्टीचें जननकार्यिं यश मिळवीं ॥४॥

(ओवी)

प्रल्हादाचा नातू बाणासुर । त्यानें आराधिला शंकर ।

कन्या मागे रुपसुंदर । मग उषा झाली नंदिनी ॥५॥

तिची सखी चित्ररेखा कृष्ण नातू अनिरुद्ध देखा ।

चोरुन नेई विशेखा । कळली मात प्रद्युम्ना ॥६॥

त्याची माता रुक्मिणी । संकष्टीव्रत तेच क्षणीं ।

ऐकूनियां मातृवाणी । व्रतास झाला तो सिद्ध ॥७॥

याविषयीं पुरातन गोष्टी । रुक्मिणी सांगे पुत्रजेठी ।

शंबरें तुजला उठाउठी । चोरुन नेलें जेधवां ॥८॥

तुझा वियोग होतां बाळ । दुःखें होतसे विव्हळ ।

चिंतेनें मनाची तळमळ झाली असे तेधवां ॥९॥

अशा समयीं लोभेश मुनी । येते झाले अपुले सदनीं ।

उपाय पुसतां मुनींनीं । संकष्टी व्रत निवेदिलें ॥१०॥

संकष्टीचतुर्थ्या चार । तेवढा पुण्याई साचार ।

यशस्वी होसी सत्वर । शंबरा वधून आला तो ॥११॥

ऐकुन मातेच्या बोला । उपरी व्रत करुं लागला ।

पर्णोन उषेसी आला । पुत्र भेटला अनिरुद्धा ॥१२॥

याच वेळीं कृष्णाला । उद्धव व्रत सांगता झाला ।

बाणासुराचा वध केला । व्रतप्रभाव जाण हा ॥१३॥

ऐशा संकष्टी व्रतासी । सुरासुरनर संकटसमयसी ।

करुन सत्वर यशासी । पावले कोठवरी सांगावे ॥१४॥

(दिंडी)

पुसे इंद्राला शूरसेन भूप ।

कथन केले इतिहास ते अमूप ।

सूत सांगति शौनकास यागीं ।

दुःखनिरसन हो त्वरें अशालागीं ॥१५॥

करित संकष्टी नेम पूर्णभावें ।

हरित वैर्‍यांना करुन त्या प्रभावें ।

होत निष्कंटक भूप असा शुद्ध ।

घेत राज्याचा उपभोग महासिद्ध ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP