मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ६७

उपासना खंड - अध्याय ६७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(साकी)

अतिथीरुपी गणेश बोले त्रिशिरातें ऐक ।

भूपति दांभिक दिसला त्यानें शमविलि नाहीं भूक ॥१॥

धृ० ॥सुन सुन हे कांते श्रवण करिं वृत्तातें ।

आतां तुम्हीं मजला कांहीं खावयास द्यावें ।

भक्तिपुरःसर देतां थोडें पुरतें हें समजावें ॥२॥

भक्तीविरहित देतां त्रिभुवन पुरत नसे तें मजला ।

तदुपरि त्रिशिरा बोले विप्रां काय सांगुं मी तुजला ॥३॥

देवपूजना प्रातःकाळीं अणिल्या होत्या दूर्वा ।

त्यांतिल शिल्लक आहे एकचि देतों ती दूर्वा ॥४॥

स्वीकारावी बहु ममतेनें इच्छितसें भक्‍तीनें ।

वदतां प्रभुनें दूर्वांकुर तो भक्षियला प्रेमानें ॥५॥

तोषुन त्यानें ढेकर दिधली प्रकटे गणेश देव ।

वदतो भागुन मग तो देई वर इच्छित भाव ॥६॥

(गीति)

ऐकुन गणेशवाणी, वदती देवा नसो तुझा विसर ।

इतुकें देतां पुरतो, आम्हांसी हाच आवडे सु-वर ॥७॥

देव गजानन वदले, वचन "तथास्तु" त्वरीत ते गुप्त ।

झाले मुनी सतीला, वदले सुभगे वरेंच हो तृप्त ॥८॥

दूर्वा महात्म्य ऐसें ऐकवि सतिला तिला दिली दूर्वा ।

मागे इंद्रापाशीं, देई सोनें स-तोल ही दूर्वा ॥९॥

इंद्रापाशीं जाऊन वदणें, त्याला स्व-नाथ दे दूर्वा ।

ती घेउनियां द्यावें, नाथांना हेमभार ही दूर्वा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP