TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
प्रेय

अर्थालंकार - प्रेय

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


प्रेय
आर्या-
भाव जरी दुसर्‍याला पोसाया अंगभूत हो तरि ती ॥
प्रेयालंकृति ऐसें ज्ञाते जे ते सदैव वदताती ॥१॥

गद्य-
यांत भाव ह्मणजे देवता, गुरु, शिष्य, द्विज, पुत्र इत्यादि विषयीं जी रती ती.

श्लोक-
कधीं काशीमध्यें अमरनदितीरीं बसुनिया ॥
कसोनी लंगोटी निजकर शिरीं मी धरुनिया ॥
अरे गोरी कांता त्रिपुरमथना हे पशुपते ॥
प्रसीदेत्याक्रोशें निमिषसम नेईन दिन ते ॥२॥

येथें शांतिरसाच्या अंगभूत चिंताख्य व्यभिचारी भाव आहे; आणि तो " कधीं " या पदानें सुचविला आहे.

श्लोक-
अद्री उंच चहूंकडेस दिसती अब्धीहि मोठे तसे ॥
वाहोनी दमलीस ह्यांस न तुला माझी न ती ही असे ॥
ऐसें मी स्तविता कर स्मृति मला विश्वंभरा जाहली ॥
ज्यानें ही धरिली असे मग पुढें वाणी अरे खुंटली ॥३॥

येथें प्रभुविषयक जो रतिभाव त्याचा वसुमती विषयक रतिभाव हा अंगभूत आहे.

श्लोक-
कधीं कांतागारीं शिरुन कुसुमाकीर्ण-शयनीं ॥
निजोनी कांतेचे कुचयुग उराशीं च धरुनी ॥
अगे कांते ! मुग्धे ! कुटिलनयने ? हें प्रणयिनी ॥
प्रसीदेत्याक्रोशें निमिषसम नेईन रजनी ॥४॥

येथें ऋंगाररसाचे अंगभूत चिंताख्य व्यभिचारीभाव आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-02-23T21:26:44.8470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तंडणे

  • अ.क्रि. भांडणे ; कलह करणे ; मोठ्याने आरडाओरड करुन वाद करणे ; शुष्क वादविवाद करुन भांडणे ; झगडणे . वेदांतीयाशी पाषांडी तर्क । भागवताशी तण्डे कोक । - मुरंशु २३६ . [ सं . तड , तण्ड = ताडणे , मारणे ] तंडण - न . भांडण शब्दांबरोबर द्विरुक्तीने हा शब्द येतो . 
RANDOM WORD

Did you know?

जुळी मुले झाली असतां शांति करावी काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.