मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
दीपक

अर्थालंकार - दीपक

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍-
प्रस्तुताऽप्रस्तुतांचें हो धर्मैक्य तरि दीपक ॥
शोभे मदानें कलभ प्रतापानें महीपतिं ॥१॥

गद्य-
यांत हत्तीचे छाव्याचा मदजलाचे योगानें, व राजाचा प्रतापाचे योगानें, एक धर्म दाखविला आहे. राजाची शोभनक्रिया प्रस्तुत
असून हत्तीचे छाव्याची अप्रस्तुत आहे. याप्रमाणेंच खालीं ही: -

आर्या-
निकषें जरि घासियला तरि मणि, जखमी रणीं जरी विजयी ॥
क्षीण मदें जरि करिवर, शुष्क नदीतीर जरि शरत्समयीं ॥२॥
चंद्रकला मात्र जरी, सुरतीं म्लानांग जरि असे बाला ॥
तरि शोभती तनुत्वें दानें जरि हीन-वित्त नृप झाला ॥३॥

येथें राजाचें वर्णन करणें प्रस्तुत आहे; व मणी, विजयी, करी, नदीतीर, चंद्र व बाला इतक्यांचीं वर्णनें अप्रस्तुत आहेत असें असून
त्यांचे शोभाधर्माचा एक अन्वय केला आहे.

ही कनक पुष्पभूमी संग्रहिती तीन पुरुष जगतांत ॥
जे शूर जेच विद्वान सेवाधर्मास जे समजतात ॥४॥
त्या राघवें पुरीला वियोग दिधला नृपेंहि धरणीला ॥
ईर्षा पुत्रासह ही केली कीं दाखवून करणीला ॥५॥
मंत्ररामायण.

येथें रामाचा व दशरथाचा एक धर्मान्वय केला आहे. ह्णणजे वियोग देण्याची क्रिया सारखीच वर्णन केली आहे.
गद्य-तुल्य योगितेंत एक प्रस्तुत व दुसरें अप्रस्तुत असें नसतें, सर्वच प्रस्तुत किंवा सर्वच अप्रस्तुत असें असतें.
काव्यादर्शकारांनीं दीपकालंकाराचें असें लक्षण दिलें आहे. जाती, क्रिया,गुण व द्रव्य यांपैकीं कोणत्याही एकाला दाखविणारें पद एक
ठिकाणीं उक्त असून त्याचा सर्व वाक्यावर उपकार होतो तेव्हां हा अलंकार होतो.
त्यांनी दीपकाचे उपभेद चार मानिले आहेत.

१  मालादीपक,
२  विरुद्धार्थ दीपक,
३  एकार्थ दीपक,
४  श्लिष्टार्थदीपक

यांपैकीं मालादीपकांविषयीं पुढें लिहिण्यांत आलें आहे. बाकीचे तीन दिपकांची उदाहरणें खालीं देतों.

आर्या-
अभिमान मन्मथाचा पयोद-पटलें बहूत वाढविती ॥
कृश करिती ग्रीष्माचा जरि वायू सलिलबिंदु उडवीती ॥६॥
वि.दी.
हरिते दिग्विस्तारा, ग्रहण करी तारका-गणाला ती ॥
घेते प्राणचि माझा जलधर-पंक्ती कशी पहा गे ती ॥७॥
ए.दी.
गे हृद्य-गंधवह हें शाम जयांची तमालवत्कांती ॥
ऐसे घन आकाशीं मत्त करी भूतलावरी फिरती ॥८॥
श्लि. दी.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP