मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
लोकोक्ति

अर्थालंकार - लोकोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
लोकोक्ति त्यास ह्णणती जेव्हां लोक प्रवाद अनुकरणें ॥
कांहीं महिने तरि त्वां डोळे मिटुनी उगीचच रहाणें ॥१॥

श्लोक-
आख्या तुझी वरदवांच्छितसिद्धिकारी ॥
जाणोनिया वरदचिन्ह नसे शरीरीं ॥
विश्वप्रसिद्धतरविप्रकुळीं जहाला ॥
यज्ञोपवीत नलगेचि अहो तयाला ॥२॥
कितिक वत्सर वत्सनिमेषसे । समज नेत्र मिटून इथें असे ॥
समजुनी मज तुल्यचि बा तया । शुभरता भरता सुख दे प्रिया ॥३॥
जिंकावयास तुज रावण सिद्ध जाला ॥
सीते तशांत शिवसेवक बाण आला ॥
विघ्नांत विघ्न जरि दुर्विधिनें उदेलें ॥
वाटे विषास विष मारक तेंवि झालें ॥४॥

आर्या-
भीम तयासि पुसे तूं कोण बळी करिशि काय हा कबळ ॥
मद्गति हे अन्यायें येथें मारील काय हाक बळ ॥५॥
वनपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP