मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
सम

अर्थालंकार - सम

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या -
अनुरुप पदार्थाचा संबंध तिथें अलंकृती सद्म हो ! ॥
हारानें स्तनमंडल केलें कीं स्वानुरुप सध्म अहो ॥१॥

श्लोक-
चंद्रिका जशि सुता पिनाकिला ॥
त्यापरि यश तुह्मांस आश्रितें ।
शोभतेंहि नरासिंह भूपते ॥२॥
आर्या-योग्या तीअ तयाला तोचि तिला योग्य जेंवि कामरती ॥
अनुरुप योग सन्मत साधूत्कर्षं असाधु कां मरती ॥३॥
वनपर्व.

कार्य तथा कारन जरि अनुरुप तरी अलंकृतीसम ते ॥
नीचाकडे वळण गे जलनिधितनये ! तुझें उचित तुज तें ॥४॥

श्लोक-
दावानलापासुन धूम झाला ॥
मेघाकृती होउनिया तयाला ॥
तो शांतवी योग्यचि तें तयाशीं ॥
जाळीतसे कीं वणवा वनाशी ॥५॥

आर्या-
ज्यासाठीं यत्न करी तत्सिद्धि अनिष्टविण तरी समची ॥
वारणलोभ धरुनिया आलासी त्यास योग्य वारणचि ॥६॥
गद्य-यांत वारण शब्द श्लिष्ट आहे. कारण=हत्ती किंवा निवारण.

श्लोक-
मी उच्च हस्तिवरुनी अटना कराया ॥
आश्रा धरुनि बसलों तुजपाशि राया ॥
उच्चाटनैव मजला दिधलें तुवां कीं ॥
हो सेविल्या न महतांशि वृथा विलोकी ॥७॥

आर्या-
सुगतिद तप सत्यचि हें; सरसिज उदकीं रवीसमोर उभें ॥
राहुनि तव पद होउनि कमलापेक्षांहि बहुतसें शोभे ॥८॥
जो सकला विद्येची लक्ष्मीसह योजना स्वयें करितो ॥
रुद्रनृपालीं ब्रह्मा सुसदृश घटनें कृतार्थ हो तरि तो ॥९॥

श्लोक-
पूर्वी हालाहल - हुतभुजें दीधलें आश्रयाला ॥
बालूयीं याला नयन तिसरा शंकराचा मिळाला ॥
प्रौढत्वीं जो वदन-कुहरीं राहुच्या चंद्र जाई ॥
तो दे पीडा मजशिं किरणीम यांत नाहीं नवाई ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP