मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
व्याजोक्ति

अर्थालंकार - व्याजोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
हेत्वंतरें लोप खर्‍या स्थितीचा । व्याजोक्त्यलंकार तशा वचांचा ॥
मदंग उद्यानपरागयोगें । हें दीसतें धूसरसें सखी गे ॥१॥
प्रियाधराखंडन पाहतां तें । कोणा न ये राग अहो पतीतें ॥
आतां मीं सांगितलें सखीला । का हुंगिसी निर्भर पंकजाला ॥२॥

येथें उपपतींने अधराला दंश केला ही गोष्ट लपवून कमलाला हूंगित असतां भ्रमरानें दंश केला असें सांगितलें आहे.

येतां सखीचे पुढती हरीला । देखोन साष्टांग नमी तयाला ॥
रोमांच कंपादिक भाव झांकी । प्रीतीहि तेणें प्रमदा तदां कीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP