मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
स्वभावोक्ति

अर्थालंकार - स्वभावोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
जाती क्रियादिकांचे स्वभाव कथनीं स्वभाव उक्ति तरी ॥
पाहे कुरंग तेव्हां तरंगसे नेत्र, कान अचल करी ॥१॥

श्लोक-
येतां समोरुन गुरुंस वधूवरांनीं ॥
पाहून घाबरुन वाट परस्परांनीं ॥
देऊन तोंड फिरवीति पुन: पुन्हां तीं ॥
होवोन लज्जित बहूत निघोन जाती ॥२॥
नवे फूटले चारु ज्याला पिसारे । मुदातीशयें नृत्य होतां मयूरें ॥
उभारुनि पुच्छें कदंबावरी हो । प्रियेसंगती फोडिला तेथ टाहो ॥२॥
ग्रीवा सारंग मागें फिरवुन बघतो स्यंदनाचे कडे हा- ॥
बाणांच्या भीतिनें जो निजतनु मिळवी मागली पूर्वदेहा ॥
अर्धेसें चावलेलें श्रम-विवृत-मुख-भ्रष्ट हें घास पाहा ॥
आकाशीं हा उड्यांनीं बहुतचि कमती भूवरी चालतो हा ! ॥४॥

आर्या-
जीचा भ्राता क्रोधें ओंठ मणगटें खळेश खर चावे ॥
चवदा हजार राक्षस आणी प्रभुबाण ह्मणति खरचावे ॥५॥
हनुमत्‍रामायण.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP