मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
प्रहर्षण

अर्थालंकार - प्रहर्षण

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
यत्नेंविना इष्ट फलाप्ति होते । प्रहर्षणालंकृति जाण बा ते ॥
ध्यानीं जिच्या तो जन मग्न झाला । तिलाच ती पाठवि दूतिकेला ॥१॥
आले मेघ नभीं तमालतरुंनीं काळी दिसे ही धरा ॥
झाली रात्रहि राधिके वरतनो कृष्णास ने तूं घरा ॥
होता नंदिनिदेश चालति पथीं कूजद्रुमा भीतरीं ॥
जाऊनी करिती विलास यमुनातीरींच राधाहरी ॥२॥
तीन चार कण चातक मागे । अंबुदा जयिं तृषा बहु लागे ॥
तृप्त तो करि जर्लोहि जगातें । पाहि या महदुदारपणातें ॥३॥
आर्या-यत्नें प्राप्त फल जरी उपायसिद्धी अधींच तरिही तो ॥
निध्यंजनार्थ औषधिमूलां खणतां निधीच सांपडतो ॥४॥
श्लोक-तोडोनी प्रथमचि खालच्या फुलातें ॥
डाळींचीं वरतनु घ्यावया पहाते ॥
लागे जो मग वरती चढावयाला ॥
तों आलें कुसुम अशोकवृक्षमूला ॥५॥
छळी नृपबळी बळी तरिच तो नसे आटला ॥
गमे बहु भला मला न सकळासही वाटला ॥
परीक्षक करी तसें जडहि सोशिते हेमही ॥
न केवळ विरोचनात्मज तरे पदें हे मही ॥६॥
केकावली.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP