मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
अधिक

अर्थालंकार - अधिक

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
विशाल आधार तयाहुनी जरी ।
आधेय जास्ती अधिकाख्य हो तरी ॥
अनेक ब्रह्मांड - तती जलीं जिथें ।
माती न देवा गुण सर्व रे तिथें ॥१॥
ज्याचें शरीरीं प्रलयीं अहो तीं ।
जगें जशीचि तशी लीन होती ॥
देवर्षिचे आगमनें जहाला ।
आनंद तो त्या शरिरीं न माला ॥२॥
विशाल आधेय तयाहुनी जरी ।
आधार जास्ती अधिकाख्य हो तरी ॥
भतर्क्य वाग्ब्रह्म पहा किती हें ।
जेथें तुझा हा गुणराशि राहे ॥३॥

श्लोक-
(१) यांत जल हें आधार आहे, व गुण हे आधेय आहे. ज्या जलांत अनेक ब्रह्मांडे मातात अशा विशाल आधारांत गुण मात
नाहीत. ह्णणजे आधारापेक्षांही आधेय जास्ती मोठें झालें असें होते.
याप्रमाणेंच:-

आर्या-
कितितरि विशाळ सांगूं ? त्रिभुवन मज भासते अगा राया ॥
ज्यामध्यें मातो तो तव यशसागर अशक्य जो माया ॥४॥
गीतध्वनि स्तुतिध्वनि वाद्यध्वनि पुष्पवृष्टि लक्षाया ॥
न पुरे ब्रम्हांड प्रभु रुचिसहि शक्रादि-दृष्टि लक्षाया ॥५॥
(हनुमंत रामायण)

गद्य-
आधार व आधेय यामध्यें जेव्हां अनुरुपता दृष्टीस पडत नाहीं तेव्हां अधिकालंकार होतो, असें कितीएकांचे मत आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP