TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
सार

अर्थालंकार - सार

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


सार
अनुष्टुप्-
उत्तरोत्तर उत्कर्षी सारालंकृति जाणिजे ॥
मध गोड तयापेक्षां सुधा त्याहुन काव्य कीं ॥१॥

श्लोक-
विष्णूच्या राहतें तें त्रिभुवन उदरीं, नागराजा वरी तो ॥
निद्रा घे, तोहि राहे जलनिधिकुहरीं, शुष्क त्याला करी तो ॥
लोपामुद्रापती, तो गगनिं चकमक, हे नृसिंहा नृपाला ॥
त्वकीर्तीच्याच वाटें श्रुति सरसिजवव्द्योम तें रे अह्माला ॥२॥

आर्या-
पर्वत मोठा भासे त्याहुन जलधी तयाहुनी गगन ॥
गगनाहून ब्रह्म आशा मोठी अहो तयाहून ॥३॥
राज्यीं सार वसुमती, पृथ्वीवर पुर, पुरींच मंदीर ॥
पर्यंक मंदिरांतचि पर्यंकीं बा वरांगना सार ॥४॥

श्लोक-
विश्वव्यापी अखिल कलुषध्वंसकृत्तो हरी गे ! ॥
त्याचे पेक्षां अधिक महिमा वाटतो हा वरांगे ॥
जीवाच्या हा सतत हृदयीं राहतो वासुदेव ॥
त्यांच्याही तूं वससि हृदयीं शुद्ध सत्वीं सदैव ॥५॥
पटुत्व सकलेंद्रियीं, मनुजता, सुवंशी जनी ॥
द्विजत्वहि दिलें बहु अलभ्य जें कीं जनीं ॥
अश: श्रवण कीर्तनीं रुचि दिली तरी हा वरा ॥
ह्णणे अधिक द्याच कीं अखिल याचकीं हावरा ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-02-23T20:33:20.6670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

preconceive

  • पूर्वकल्पना करणे 
  • पूर्वकल्पना करणे 
RANDOM WORD

Did you know?

देव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site