मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
संदेह

अर्थालंकार - संदेह

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
येतो पदार्थ देखुन संशय चित्तीं तयास संदेह ॥
पंकज कीं चंद्रचिहा निर्णय करण्या अशक्त हा देह ॥१॥
प्रथम ह्नणे हें काय द्युति-मंडळ काय उतरला भानु ॥
सानुरु वरीहि दिसतो जाणो चालत असेल मणि-सानु ॥२॥
बृहद्दशम.

गद्य-
ह्यास शुद्ध संदेह ह्णणतात.

श्लोक-
ह्णणावे कीं भास्वान्‍ तरि तुरग त्या सात असणें ॥
ह्णणो कीं अग्नी या तदखिल दिशीं न प्रसरणें ॥
ह्णणावें कीं साक्षाद्यम महिष तद्वाहन असे ॥
रिपूंना संग्रांमीं बहुहि उठती संशय असे ॥३॥

आर्या-
मग नगरी हें कळतां टाकोनि करी विचार उज्वलधी ॥
श्री द्वारका नव्हे हे आलिंगुनि कां इला नसे जलधी ॥४॥
बृहद्दशम.

गद्य-
ह्यास निश्चयगर्भसंदेह असें ह्णणतात.

आर्या-
चंद्रचिकीं ? मृगकोठें ? कुवलय हें. सलिल तें कुठे आहे ॥
मधुरविलास वचांनीं सत्याचे हरिणाक्षि जाणिलें मुख हें ॥५॥
गद्य-ह्यास निश्चयांत-संदेह ह्णणतात.
श्लोक-हा कां गळेचि हरिचंदन-पल्लवार्क ॥
किंवा शशी-किरण-कंदल जातसेक ॥
संतप्त-जीवन-मना- बहु हर्षवीतो ॥
संजीवनीच हृदयीं जणु सिंचितो तो ॥६॥

मूर्च्छित पावलेल्या रामास सीतेचा हस्तस्पर्श झाल्यावर त्याचे
मनांत हे तर्क उत्पन्न झाले आहेत; आणि संशय उत्पन्न झाला आहे.

अनुष्टुप्‍-
जीवनग्रहणीं नम्र घेतां होतांत उद्धत ॥
ज्येष्ठ कोण विचारीचा घटिकापात्र-दुर्जनीं ॥७॥
रहाटगाडग्याचे मोघे पाणी घेत असतां अधोमुख होतात; व घेतल्यावर
तेच वर तोंड करुन चालतात. त्याप्रमाणेंच दुष्ट लोक लीनता
दाखवूनच दुसर्‍य़ाचें जीवित हरण करितात व घेतल्यावर उद्धट होतात.
ह्णणून सादृश्यामुळें दोघांमध्यें ज्येष्ठ व कनिष्ठ कोण याचा संशय उत्पन्न
झाला आहे.

गद्य-
काव्यप्रकाशकारांनीं संदेह व संशय प्रथक्‍ दोन अलंकार
गणले आहेत. तें असें ह्णणतात.

आर्या-
भेद जिथें दर्शविला असतो संदेद तोचि समजावा ॥
भेद जिथें दर्शविला नसतो संशयचि तेथ समजावा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP