मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
निष्ठुरतेमुळे तुझ्या काळि...

गज्जलाञ्जलि - निष्ठुरतेमुळे तुझ्या काळि...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


निष्ठुरतेमुळे तुझ्या काळिज हें दुभङगलें.
दोषच काय की तुझ्या हें प्रणयांत रङगलें ?

जाणुनि तू जिवास या सुन्दरतेंत गोवुनी
मोकलितां पुन्हा तुझें चित्त न कां विशङकलें ?

आळविलेंस सुन्दरी, खेळविलेंस हृत्सरीं,
आणिक काय सत्वरी त्वन्मन हाय रन्जलें !

जीव तुलाच भाळला, कां वनवास हा मला ?
आवडती विरक्तिला निर्जन घोर जङगले.

प्रेम जुनें तुटेच ना, आसहि कां सुटेच ना ?
गुप्त असहय वेदना देशि सदैव चञ्चले.

सुन्दरतेंत सापडे प्रेम म्हणून का नडे ?
अन्ध कसा बनूं गडे हे मधुरङगमङगले ?

शब्दहि तू न ऐकशी, द्दग्शरही न फेकशी,
आळवणी करूं कशी ? हाय जिणेंच सम्पलें !

९ में १९२३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP