TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
रम्य लाली अम्बरीं राहिली ...

गज्जलाञ्जलि - रम्य लाली अम्बरीं राहिली ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


सन्ध्या - वारुणी
रम्य लाली अम्बरीं राहिली ही फाकुनी -
पालथ्या पेल्यांत या कोण साण्डी वारुणी ?

ऐक या पेल्यामधे रङगली सन्ध्या मदें,
‘घ्या !’ रसज्ञांना वदे, ‘घ्या सुरा नानागुणी’.

काय काव्यानन्द तो रोमरोमीं स्पन्दतो !
जाहला सूरीन्द्र जो तो सुरेच्या या ऋणी.

ही जणू विद्युल्लता काचपात्री नाचतां
ऊर्वशीची कां कथा ? मोहिनी वाटे कुणी.

संसृतीची काळजी घालवी तत्काळ जी,
फाटूं द्या आकाशही ही क्षणीं त्याला तुणी.

सिन्धुकन्या सुन्दरी स्वर्ग आणी भूवरी,
आदिशक्तीहूनि या सेव्य आहे का कुणी ?

४ फेब्रुवारी १९२६

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:12.5300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

frugal

  • स्वत्पव्ययी 
RANDOM WORD

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site