TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
“पुरे गडे ! किति सङकोच ? ...

गज्जलाञ्जलि - “पुरे गडे ! किति सङकोच ? ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


कां सङकोच ?
“पुरे गडे ! किति सङकोच ? ये अशी जवळी !
मुखावगुण्ठन सारूनि हृज्जगत ऊजळी !”

- परन्तु दर्शन घ्यावें गमे दुरूनिच मी,
दुरूनि गुञ्जन ऊकेन मी कळी कवळी.

तुम्हांस दावुनि हृद्रङग द्यावया मधुही
असूनि आतुर मी आंत दाबितें कुकळी,

प्रफुल्ल होऊनि होणें पुढे विशीर्णच ना ?
करी मला न पहा भीति ही परी दुबळी.

जगत कृतघ्न असो हें लबाड पोटभरू,
असे पतङगहि, सारेच का अली कमळीं ?

परी मला भय वाटे, दुरूनि रम्य दिसे
दिसेल काय तसें रम्य पोचतां जवळी ?

मला दुरूनि तुम्ही घ्येयमूर्ति की गमतां,
करी बहार जगीं हीच भावना सगळी.

असो कसेंहि जगत, घ्येय त्या परी न दिसो !
जिवास जाळिल नैराश्य वा सदा अनळीं.

हृदीं परन्तु सख्या, हीहि पोखरी चिन्ता -
जिवन्त राहिल कैशी मिटूनि नित्य कळी ?

ऊद्या दिसेल मला तें भलें ऊद्याच दिसो.
लुटूनि घ्या अजि ऐश्वर्य हें सहस्रदळी.

११ सप्टेम्बर १९३०

Translation - भाषांतर

Last Updated : 2016-11-11T12:50:14.2970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दोंद

  • वि. १ मोठे , वाढलेले पोट . ( क्रि० येणे ; वाढणे ; झडणे ). तो उत्सव दोंदी न ब्रह्मांडसमी धरे , किती वदो दीन । - मोकृष्ण ४८ . ८ . जैसा दोंदीकोंदी गुर्जर देशस्थ विप्र चुरम्याते । - मो २ ( ल . ) एकदम मिळालेली संपत्ति , लौकिक , दर्जा , बढती इ० ( क्रि० वाढणे ). [ सं . तुंद ; का . तुंदी ; प्रा . हिं . पं . तोंद ; गु . दुंद ] दोंद येणे - भरुन वाहाणे ; पुराचर पूर येणे ( संपत्तीचे पाट ). म्ह० आईजीचे ( किंवा सासवेचे ) दोंदावर बाईजी ( किंवा जावई ) उदार . दोंदिल - न . दोंद ; मोठे पोट . दोंदाळ , दोंदी , दोंदाल , दोंद्या - वि . ढेरपोट्या ; मोठ्या पोटाचा . तुंदील पहा . आशारसे दोंदिलु । जाला सांता । - ज्ञा ७ . १६८ . 
  • ना. ढेरपोट , ढेरी , तुंदिल , लंबोदर . 
  • n  A pot-belly. Opulence. 
  • आईजीचे दोंदावर बाईजी उदार Men love to be generous with the wealth of others. Robbing Peter to pay Paul. 
RANDOM WORD

Did you know?

Do we have copyrights for everything published on this website?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.