TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
अपार शास्त्रीं रमे म्हणो ...

गज्जलाञ्जलि - अपार शास्त्रीं रमे म्हणो ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


स्व-भाव-गीत
अपार शास्त्रीं रमे म्हणो तो निरर्थ सुक्लिष्ट त तराणे,
रुचे मला हें सदैव साधें खुल्या दिलाचें रसाळ गाणें.

मनांत गाणें स्वयेंच जागे; न सूर मागे, न ताल लागे;
प्रफुल्ल व्हावें नवानुरागें, स्फुरूनि गावे खगाप्रमाणे,

अलङकृतींची जरूर कां ती जिवन्त जेथे स्वरूपकान्ती ?
रसज्ञतेची कशास शिक्षा ? रुची मधूची न कोण जाणे ?

कुणास गोडी विचित्र गीतीं. न भावनेची जरी प्रतीती;
असेंच घेती बघूनि नाणें - कसें ठशाचें, कसें खणाणे.

सभोंवती या प्रचण्ड हाटीं शहाणियांची अलोट दाटी;
गमे बसूनी प्रसून - वाटीं क्षणैक व्हावें जरा दिवाणें

प्रसन्न व्हावें सहानुभावें, स्व -भावरीतप्रबन्ध गावे,
कुणीहि यावें, जरा बसावें - ऊथे कुणाला सदा रहाणें ?

२३ सप्टेम्बर १९३१

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:09.7330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कैवल्य

  • न. १ ( सायुज्य ; मोक्ष ; मुक्ति ; जीवात्मा वपरमात्मा यांचे ऐक्य ' तें कैवल्य पर तत्त्वता । पातलें जगीं । ' - ज्ञा ३ . १५१ . ' मांथा पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय । ' - तुगा २१९७ . २ केवळपणा ; एकटेपणा . ' कैवल्य म्हणजे केवळपणा एकटेपणा किंवा प्रकृतीशीं संयोग नसणें असा असून ...' - गीर १६२ . ( सं .) 
  • ०दानी पु. ( मोक्ष देणरा ) ईश्वर ; गुरु ; ईश्वराचें एक अभिधान . ' सुखानंद आनंद कैवल्यदानी । ' - राम ३६ . 
  • ०निधान धाम - न . मुक्तिसदन ; मोक्ष . ' मुमुक्षुस कैवल्यधाम । ' - यथादी १ . ४६ . २ मोक्षाचें स्थान , जो परमेश्वर तो . हुंबुरती गाय तयांकडें कान । कैवल्यनिधान देउनि ठाके । ' - तुगा २४१ . 
  • ०पद न. सायुज्य मुक्ति ; कवल्यधाम . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.