मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
प्राशितों सौन्दर्य तूझें ...

गज्जलाञ्जलि - प्राशितों सौन्दर्य तूझें ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


प्राशितों सौन्दर्य तूझें मी दुरूनी
प्राशुनी पीयूष कां जातों झुरूनी ?
फाकते ऐन्दुप्रभा चौफेर तूझी
आणि कां माझ्या मनीं ये काहुरूनी ?

आननीं हृद्रम्य सन्ध्याकाल - शान्ती,
नेत्र हे की हासरे तारे दिनान्तीं !

केश - वीची की भुर्‍या या मेघमाला !
की गुलाबांची मिळे देहास कान्ती !

नासिका नामी कळी ही आर्जवाची,
हासतां गालीं खळी रमार्थवाची,

हीं कुडीं कानीं तुझ्या का कृत्तिकांचीं
मौक्तिकें तेजाळ जीं व्योमार्णवाचीं !

हासशी, हास्त्यीं असें गाम्भीर्य कां गे ?
ओढिशी गुम्फूनि चित्तांतील धागे.

राहशी दिव्याङगने, निश्शब्द दूरी,
भोवती तूझ्या भ्रमूं हा जीव लागे.

४ जुलै १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP