TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
जरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...

गज्जलाञ्जलि - जरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


सानुली
जरि यौवनीं शिरलीस चञ्चल पाऊलीं
गमशी मला परि तू अजूनिहि सानुली,

वघतां सतेज सुवर्ण ऊन्दुमुखीं तुझ्या
रमणीय हेमलताच तू पडते भुली.

कुरळिई तुझी बट ये पुढे निटिलावरी
तिज सारितां किति कौतुकें बघशी मुली !

अपुल्या वयांमधि हें न अन्तर थोडकें,
न बघे परी वय मैत्रिकी शुभ आपुली.

तव नाव सुचवि शान्ति, बण्ड तुझें सदा,
करिशी समान विनोद दावुनि वाकुली.

दिसतां विषाद परी मुखीं कधि माझिया
करिशी सचिन्तच चौकशी जणु माऊली !

तव सङगतींत तरडगती सुख - वीचि गे,
तव भावना बहरूनि होय सदाफुली.

किती दूर मी ? परि दे तुझी स्मृति शान्तता;
मजला पुरे स्मृतिचीहि सौख्यद आऊली.

१९ नोवेम्बर १९२२

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:11.1870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

राशीस बसणें-असणें-लागणें

  • ग्रह ज्याप्रमाणें अशुभ राशीस आला असतां त्रासदायक होतो त्याप्रमाणें. 
  • त्रास देणें 
  • छळणें 
  • पीडा देणें. ‘ ताराः - नाहीं तरी सुभद्रा सुनंदेच्या फारच राशीला लागल्यासारखें करते. ’ -गुप्तमंजूष. ‘ आहेर सर्वोच्या राशीला आहेच. ’ -दाजी १.२०४. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

प्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.