TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
वहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...

गज्जलाञ्जलि - वहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


क्षात्रवर्म
वहवा रे वाचिवीर प्रेमपाठी फाकडे !
वाहवा रे शूर राघू वेषवेडे भाबडे !

बन्धुनाशीं दावितां शास्त्रोक्त औदासीन्य वा !
आणि पाळी आपुली येतांच लोटे कां रडे ?

या कुणी वन्द्य स्मृती केल्या कुणासाठी पहा,
काळलेखांचा करा अभ्यास, वाचा, घ्या धडे.

दुर्बळांची नागमोडी चाल ती शोभो तयां,
वीर पातळांतुनीही खेचुनी दे हासडे.

संस्कृतीच्या रक्षणाला शक्ति कोठे दाण्डगी ?
जिङकिते आर्यांस पूर्वीं कां जहाले राङगडे ?

रोमचें साम्राज्य तें कां रानटयांनी झोडिलें ?
संस्कृतीचें ओज जातां केवढा घाला पडे !

आपुल्या संरक्षणाची काळजी अन्यावरी ?!
देवही पाही, न वारी भेकडांचें साकडें.

स्वर्गवासी देव तो पाही परीक्षा तूमची,
का प्रतीक्षेने वहाती शत्रुपापाचे घडे ?

बोलतां आम्ही सुपर्ण व्योमसञ्चारी, परी
जुम्पिले घाण्यास जातां आणि नेत्रीं झापडें !

जन्मलां शार्दूलवंशीं, स्वत्व जाणा, आचरा;
धूर्तता ये घेऊनी का जम्बुकाचें कातडें ?

शान्ततावादी बना सामर्थ्य अङगीं आणुनी,
व्यर्थ आत्मानात्मचिन्ता कां ? बघा देहाकडे.

काय हो शेळ्या हजारों ऐकटया वाघापुढे
देववत निश्चेष्ट देखा कागदींचे आकडे ?

देश - धर्म - स्त्री - त्रयीची या प्रतिष्ठा साण्डुनी
वाचवूं स्वप्राण पाही आर्य तो हें ना घडे.

मार खाऊनी जगावें - अप्रतिष्ठा ती नको !
क्षत्रियाला क्षेत्र - तीर्थी मृत्यु कार्यीं आवडे.

२१ ऑगस्ट १९२६

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:11.7970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दगाफटका

 • पु. १ कपट ; लबाडी ; खोटा व्यवहार ; ठकबाजी ; लुच्चेगिरी . २ भय ; कूटघात ; अपाय ; धोका ; धोक्याची अथवा गुप्त नुकसानीची जागा . ३ जादू , विष , मूठ ( यांपैकी जेव्हा एकादे मरणाचे किंवा आजारीपणाचे कारण आहे अशी कल्पना असते तेव्हा हा शब्द योजतात ). ४ कपटाचा अथवा दग्याचा वहीम ; फसवेगिरीचा संशय . तुमच्या मनांत दगा गेला . [ फा . दघा ] दगाई - वि . दगेखोर . पांच पन्नास दगाई होते ते काहडून दिले . - हौके ११६ . [ फा . दघाई ] 
 • ०खाणे फसणे . 
 • ०देणे करणे फसविणे ; घात करणे . दगेखोर वि . दगलबाज ; लुच्चा ; कपटी ; अप्रामाणिक . दगेखोरी स्त्री . दगलबाजी ; विश्वासघात . दगेबाज बाजी वि . दगलबाज - जी पहा . [ फा . ] 
 • ना. अपाय , कूटघात , गुप्तहल्ला , धोका , भय ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

प्रासंगिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.