TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
सहधर्मिणी, तुजवाचुनी दुनि...

गज्जलाञ्जलि - सहधर्मिणी, तुजवाचुनी दुनि...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.

सहधर्मिणीस
सहधर्मिणी, तुजवाचुनी दुनिया सुनी मज वाटते,
फिरतों प्रसन्न ऊन्हांत मी तरि अन्तरीं तम दाटतें !

हसतोंफ़ जनांत वरीवरी करुनी रसाळ विनोद मी
परि ऐकला पडतां घरीं हुरहूर गूढ न हो कमी.

जनता जिथे सुखमद्य पी रसरङगमङल ऐत्सवीं
बघुनी तिथे सुखि जोडपीं हरपे मदीय मुखच्छवी.

भरयौवनींहि म्हणूनि मी फिरतों वनीं हृदयप्रभे,
परि हाय ! राहुनि राहुनि राहुनी सय हो जुनी मज दुर्लभे !

डुबरें सडयावर रान का घनदाट लोकर मर्गजी ?
दिसते हरिद्वसना कशी वनदेवता सुखगर्क जी !

कुसरीस शुभ्र बहार का वनतारका करिती स्मितें ?
बहरूनि रानगुलाब हे मधुराग विस्तरिती ऊथे.

चढती दरीतुनि मेघ अन धरिती द्युमण्डलवाट ते -
फिरतों प्रसन्न ऊन्हांत मी तरि अन्तरीं तम दाटतें !

१९ जून १९२३

Translation - भाषांतर

Last Updated : 2016-11-11T12:50:11.0770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दीक्षा

  • स्त्री. १ एखादे व्रत वगैरे घेतले असतां त्याच्या प्रारंभापासून समाप्तीपर्यंत तत्संबंधी केलेले नियमाचरण . ( क्रि० घेणे ). २ आचरणाची रीत ; नेम ; क्रम . ( क्रि० धरणे ). अलीकडे याने दीक्षा बरी धरली आहे . ३ ( ल . ) मोठ्या कामांत पडणे , ते अंगावर घेणे . ( क्रि० घेणे ). ४ एखाद्या पंथाचा किंवा कलेचा स्वीकार करणे , अनुयायी बनणे . ( क्रि० करणे ; होणे ). ५ व्रत . असेचि धरली नयच्युतदमार्थ दीक्षा करी । - केका १६ . ६ उपदेश ; शिक्षण . विडी ओढण्याची आपणांस कोणी दीक्षा दिली ? [ सं . ] 

  • ०गुरु पु. दीक्षा देणारा , शिकवण देणारा , उपदेश देणारा पुरुष . बरवेयां देवां दीक्षा गुरु । - शिशु १५२ . दीक्षित पु . १ सोमयाग करणारा ; ज्याने यज्ञ केला आहे असा पुरुष किंवा त्याचा वंशज . तेथ सोहंमंत्रे दीक्षिती । इंद्रियकर्माचिया आहुती । - ज्ञा ४ . १३७ . २ ( ल . ) धर्मकृत्यांत गुंतलेला किंवा कलाकौशल्य , शास्त्र यांत प्रविण असलेला . ३ ( ल . ) कुशल ; अतिशय हुषार ; मर्मज्ञ . 

More meanings
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site