मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
वानिती काव्यांत जेथे भाट ...

गज्जलाञ्जलि - वानिती काव्यांत जेथे भाट ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


वानिती काव्यांत जेथे भाट सत्ता पाशवी.
जी जनांचा नाश ची,

कष्टुनी सञ्जीवनी प्रेरी स्वदेशाच्या शवीं
कोण त्याला ना स्तवी ?

राव होऊनी खपे राष्ट्रोन्नतीच्या साधनीं
तोच चित्तांचा धनी !
आस ठेवी अन्तरीं, येवोत विघ्नें आडवीं  कोण०

वाघिणीचें दूध द्या राष्ट्रास, घ्या त्याच्या बळें
ऋद्धिसिद्धीचीं फळें;
ही दिसे ज्याच्या प्रयत्नें आज आली पालवी कोण०
भूतकालांतील मिथ्या गौरवाच्या कारणें
पाड्णें हीं कां रणें ?
थाम्बवाया जो शिणे ही दुर्मतांची यादवी कोण०

सोङग धर्माचें करूनी वावरे अन्याय की]
मनय हो ही नायकी;
पीडितांना शुद्धरी जो न्हाणुनी प्रेमासवीं कोण०

स्तोम जङगी रूढिचें जो पार भङगाया बघे
तो जनांचे शाप घे;
काळ लोटूनी हिताची संस्कृती येतां नवी कोण०

काळसाहयें जो यशस्वी क्रान्तिकार्यी जाहला
कीर्तिला तो पावला,
खेचुं काळालाच पाही जो प्रयत्नें मानवी कोण०

भूप नक्षत्रांपरी ऊच्चासनीं हे शोभती
भव्य यांच्या नौबती;
शुक्रतारा जो पहाटेचा जणू किंवा रवी कोण०

जन्मदत्त श्रेष्ठतेला जो न डोकें वाकवी
तत्त्वनिष्ठेचा कबी
तो नसेना थोर जेवी बाण किंवा भारवी
तो सयाजीला स्तवी. कोण०

१९ जानेवारी. १९३३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP