सर्वेश्वराची आरती
चाल --- [आरती भुवन सुंदराची]
आरती कृष्ण खिस्त प्रभुची । राम जो तोच रहिम त्याची ॥
प्रभू झोर्यास्तर बसवाची । पारसनाथ जिनेंद्राची ॥
चाल --- गुरु गोविंद बुद्ध भगवान । महानुभाव, आदि
गुरुदेव, आमुचा भाव, एक प्रभुची ॥
सकलमत खूण जाण हेची ॥१॥
जरी आकार नाम भेदें । विविध नग, एक हेम नांदे ॥
जगीं परब्रह्म एक नुसधे । बोधिले हेच तत्व वेदें ॥१॥
चाला ॥ जरी हे पंथ भेद दिसती । एक गांवास, नेति सर्वास ॥
नेणुनी त्यास, व्यर्थ लढती । उगी मतभेद वाढवीतीं ॥२॥
सकल मत काडसिद्धप्रभुनें । तसे गुरुलिंग जंगमानें ॥
भाउ उमदीश सद्नुगुरूने । स्थापिले सिद्धरामप्रभुने ॥२॥
चाल --- सुजन हो करा मनीं सुविचार । मार्ग ना अन्य
विचारें धन्य, व्हाल प्रभुमान्य, गुरू बोधें ।
सांगतो दत्त घोषनादें ॥३॥
ग्रंथसमर्पण
सौभाग्यवती सैदाबाई वेदान्तप्रिय बहिण माझी ॥
निजधाम पावली जी, ग्रंथसमर्पण तिलाच करितो जी ॥१॥
Translation - भाषांतर
N/A